कोकणातील उत्कृष्ठ दर्जाच्या नारळाच्या ताज्या दुधापासून “अक्षत” हे 100% शुद्ध तेल सेंट्रीफ्यूज पद्धतीने काढले जाते. जसे दुधापासून क्रीम/साय घुसळून वेगळे करतात तश्याच प्रकारच्या परंपरागत व नैसर्गिक प्रक्रीयेतून “अक्षत व्हिसीओ”ची निर्मीती आहे. रसायने व उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील सर्व पोषणतत्वे तेलात जशीच्या तशी उतरतात व निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ मिळते. बाजारात मिळणाऱे “कोल्ड प्रेस्ड व्हिसीओ” हे खोबरे सुकवून घाण्यातून काढले जाते. ह्यामधे केवळ स्निग्धता असते पण उष्णतेमुळे नैसर्गीक पोषणमूल्ये विरून गेलेली असता. अक्षत हे “नारळाच्या दुधापासून काढलेले” एकमेव “आर्टीसन” दर्जाचे प्रॉडक्ट आहे. ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक ऍसिड अन्यथा केवळ मातेच्या स्तन्य दुधामध्ये आढळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात लक्षणीय ठरते. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय पातळीवर “Mother of All Oils” म्हणून गौरवप्राप्त आहे. ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे केटोन्समध्ये स्मृती वाढविण्यास मदत करतात तर पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते..

तान्ह्या बालकांना मसाज करण्यासाठी अक्षत व्हिसीओ सर्वोत्तम औषधी तेल आहे. अत्यंत हलके व पोषक असे अक्षत व्हिसीओ त्वचा आणि टाळूमधून सहज झीरपत खोलवर जाते आणि तान्ह्या बाळांची हाडे-स्नायू बळकट करते व रोगप्रतिकार शक्ती सुधारते. केवळ १५ दिवसांच्या मसाजने तुमच्या बाळाची त्वचा तुकतुकीत होते व छान बाळसे धरते. बुद्धी तल्लख होऊ लागते. केवळ १५ दिवसातच विवीध परीणाम दृष्य होऊ लागतात. अक्षत व्हिसीओमधे असलेले विषाणू/जिवाणू/बुरशी रोधक गुणधर्म तान्ह्या बालकांभोवती संरक्षक कवच निर्माण करतात. नॅपी/डायपर मुळे त्वचेवर येणारे रॅशेस, चट्टे इ. चा प्रतिकार करतात. मुलांना शांत झोप लागते, पर्यायाने त्यांची वाढ पूर्ण होते.

३ वर्षाखालील अक्षत व्हिसीओ (व कुठलेच तेल) तोंडावाटे द्यायचे नसते. हे केवळ लहान मुलांच्या मसाजसाठी वापरायचे आहे.

अक्षत व्हिसीओ जसे लहान बाळांना मसाजसाठी वापरतात तसेच ते स्तनदा मातांना देखील मसाजसाठी व तोंडावाटे प्राशन करण्यासाठी वापरतात. ओल्या बाळंतणी/स्तनदा मातांची बाळंतपणा दरम्यान झालेली झीज लवकर भरून निघावी, त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे व तान्ह्या बाळाला दूध कमी पडू नये ह्यासाठी अक्षत व्हिसीओ महत्वाची भुमिका निभावते. स्तनदा मातांना शरीराला व स्तनांना मसाज करण्यासाठी तर हे उत्तम आहेच पण दररोज उपाशीपोटी 2 ते 3 चमचे तोंडावाटे प्राशन केल्याने मातेची रोगप्रतिकार शक्ती वाढते, स्ट्रेस कमी होतो, शांत झोप लागते व स्वस्थ्य सुधारते.

Your valuable comment please..