आवाज आषाढीचा..

प्रत्येक आषाढीयनची एक गोष्ट आहे.. प्रत्येकाला काही सांगायचे आहे. आणि प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे...

आषाढी व्हेंचर्स प्रायवेट लिमीटेड

"आषाढी व्हेंचर्स प्रायवेट लिमीटेड" क्वोरा मराठीवरील समविचारी मराठी लोकांनी एकत्र येऊन चालू केलेला भारतातील पहिला आणि एकमेव सामाजिक उद्योग (social startup) आहे. भारत सरकारच्या कंपनी अधिनियमांनुसार २ मे २०२१ रोजी स्थापन झालेली ही कंपनी आता चांगला आकार घेत असून "मुक्त उद्यमशिलता" ह्या अत्यंत अभिनव संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत. हे सोशल वर्क नाही की ही सामाजिक संस्था नाही. "सोशल स्टार्टअप" ही आषाढी व्हेंचर्सच्या प्रवर्तकांनी जन्माला घातलेली एक अनोखी संकल्पना आहे जिथे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो.