-7%

Red Rice Flakes

(1 customer review)

585

Out of stock

3KG Pack

Description

पूर्ण पॉलीश न करता, थोडेसे ब्रान ठेवून जो तांदूळ आसडला जातो त्याला लाल तांदूळ म्हणतात. ह्यावरील ब्रानमुळे काही प्रमाणात फायबर व लोह शरीरात जाते व त्याचे अनेक फायदे होतात. ह्या तांदळाचे जे पोहे बनवतात त्यांना लाल पोहे म्हणतात. लाल तांदळामधे असलेले सारे गुणधर्म लाल पोह्यांमधे मिळतात. सकाळच्या पहिल्या नाष्त्यामधे ह्याचा समावेश केल्यास “हेल्दी ब्रेकफास्ट” होतो व त्याचे सुपरीणाम दिवसभर मिळतात.

हे पोहे आपण कुठल्याही तांदळाचे बनवत नाही. केवळ वालई ह्या मूळ वाणाच्या भाताचेच हे पोहे बनतात. वालई तांदूळाचे आरोग्यवर्धक गुणधर्म जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

हा तांदूळ वालय (मूळ उच्चार : वालई) नावाने कोकणात आढळतो. लाल तांदूळ किंवा पोह्यांसाठी ही सर्वोत्तम जात. हा तांदूळ उंच वाढतो आणि ह्याच्या तृणांकुरामधे सत्व पटकन उतरते. ह्यामुळे ह्याच्या लोंब्या जड होतात व मोडून पडतात. ह्यामुळे ह्याचे खूप उत्पन्न फुकट जाते. त्यामुळे कोकणात देखील अत्यंत मर्यादीत प्रमाणात, अपवादानेच ह्याची शेती आढळते. पण हे भाताचे मूळ वाण असून ह्यामधे अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळतात. असे असतानाही कमी उत्पन्न आणि नुकसानीमुळे “वालई” हा उत्तम दर्जाचा तांदूळ संकरीत वाणांच्या शर्यतीत मागे पडत आहे, नाहीसा होत आहे…

ह्या तांदळामध्ये जलद ऊर्जा प्रदान करण्याची, आतड्यांच्या हालचालींचे नियमन आणि सुधारणा करण्याची क्षमता आहे. ह्याच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते आणि वार्धक्याची प्रक्रिया देखील मंदावते. तसेच मानवी शरीराला अत्यावश्यक असे “व्हिटॅमिन बी १” चा हा नैसर्गिक स्रोत आहे. म्हणूनच ह्या वाणाला सर्वश्रेष्ठ वाण समजतात.

विशेष सूचना : हा तांदूळ व पोहे धान्यातील फक्त वरील तूस काढून बनवला जातो. आतील ब्रान आहे तसे ठेवले जाते. हे अत्यंत पौष्टीक असल्याने ह्याला सहज टोका लागतो. पण आपण कुठलेही किटकनाशक, बोरीक पावडर इ. वापरत नाही. त्यामुळे तांदूळ निट निवडून घ्यावा. ह्या मधे टोका आढळणे हे नैसर्गिक आहे. दोष नाही.

Additional information

Weight 3 kg

1 review for Red Rice Flakes

  1. tushar

    one of the best rice flakes..

Add a review

Your email address will not be published.