This Article In in “Marathi” Language

“अक्षत” हे 100% शुद्ध तेल सेंट्रीफ्यूज पद्धतीने नारळाच्या ताज्या दुधामधून काढले जाते. रसायने व उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील पोषणतत्वे तेलात जशीच्या तशी उतरतात व निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ मिळते. बाजारात मिळणाऱ्या “कोल्ड प्रेस्ड व्हिसीओ” पेक्षा “नारळाच्या दुधापासून काढलेले” अक्षत व्हिसीओ हे एकमेव खात्रीलायक व दर्जेदार व्हर्जीन तेल आहे.

ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक ऍसिड अन्यथा केवळ मातेच्या स्तन्य दुधामध्ये आढळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात लक्षणीय ठरते. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय पातळीवर “Mother of All Oils” म्हणून गौरवप्राप्त आहे. ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे केटोन्समध्ये स्मृती वाढविण्यास मदत करतात तर पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते. अत्यंत तरल व त्वचेतून सहजपणे झिरपणारे हे तेल निसर्गातील “सर्वोत्तम औषधी तेल” गणले जाते.

🥥 वृ्द्धापकाळात कमी होत जाणारी आंतरीक शक्ती व रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे विस्मृती, अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.

🥥 तणावपूर्ण जीवनशैली असणाऱ्या (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हिसीओचे दररोज रात्री सेवन केल्यास खूप फायदा होतो.

🥥 तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हिसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरीक ऍसीड मुलांची सुदृढ प्रकृती घडवण्यास मदत करते.

🥥 सांधेदुखी वर व्हीसीओने मसाज केल्यास त्वरीत आराम मिळतो.

🥥 व्हिसीओ ने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.

🥥 कोरोना साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत प्रभावी सिद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी हे नक्की वाचा – Virgin coconut oil is effective in lowering C-reactive protein levels among suspect and probable cases of COVID-19 . कोरोना काळात केवळ आयुर्वेद आणि नेचरोपथीच्या नावाखाली उपलब्ध निकृष्ठ उत्पादने वापरण्यापेक्षा दररोज २ चमचे उपाशी पोटी असे १५ दिवस “अक्षत व्हिसीओ” घेऊन प्रत्यक्ष खात्री करा.

“अक्षत व्हीसीओ” तोंडावाटे प्राशन करण्यासाठी बनवले असून रोज रात्री 2 ते 3 चमचे घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात! “अक्षत व्हिसीओ” हे आषाढी व्हेंचर्स ह्या मराठी उद्योजकसमूहाचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन असून देशांतर्गत वापरासाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध केले आहे.

🌴🥥 अक्षत व्हीसीओ : घेण्याची पद्धत 🥥🌴

  • नारळाच्या दुधाला घुसळून शास्त्रीय पद्धतीने काढलेले अक्षत व्हिसीओ हे १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मुख्यत्वे तोंडावाटे घेण्यासाठी बनवले आहे. अक्षतचे सर्वोत्तम परीणाम मिळवण्यासाठी ते सकाळी उपाशी पोटी घेणे सर्वात उत्तम. फ्रेश वाटते व परीणाम जलद होतात. नाहीतर रात्री जेवण्यापूर्वी उपाशी पोटी घ्यावे. ह्या वेळा पाळणे शक्य होत नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. ह्यापैकी एकच वेळ ठरवून न चुकता किमान २० दिवस सातत्याने घेणे आवश्यक आहे.
  • तीन वर्षाखालील बाळांना तोंडावाटे देऊ नका. लहान बाळांना डॉक्टरला विचारल्याशिवाय कुठलेच तेल/औषध किंवा काहीही द्यायचेच नाही. इतक्या लहान मुलांना मसाज करायला, मुख्यत्वे हाडे, स्नायू, मणका-पाठ व टाळूवर घालायला उत्तम. हे तेल खोलवर झिरपते, शरीरात छान उब निर्माण करते, त्वचेवरील रॅशेस, कोरडेपणा नाहीसे करते. झोप चांगली येते व वाढ पूर्ण होते.
  • तीन वर्षापेक्षा मोठी मुलांना आधी एक चमचा द्यायला सुरूवात करा व नंतर हळूहळू वाढवत २ चमचे करा. रोज रात्री डोक़यावर घाला. चेहरा, हात-पाय मसाज केले तर छान टवटवी येते. झोप चांगली मिळते.
  • मोठ्या माणसांना २-३ चमचे रोज. वयस्कर लोकांना २-३ चमचे रोजत. डोक़यावर घालायला व चांगली झोप लागायला उत्तम. सांधेदुखीवर खूप आश्वासक व दीर्घ परीणाम मिळतात. रोज मसाज करा आणि परीणाम पहा. शरीर निरोगी राखायला व पचनसंस्थेसाठी उत्तम.
  • व्हिसीओ मुख्यत्वे थेट प्राशन करण्यासाठी बनवलेले औषधी तेल आहे. पदार्थ तळायला, फोडणी घालायला व्हिसीओ वापरत नाहीत. त्यासाठी घाण्याचे किंवा इतर रिफाईंड तेल वापरतात. उष्णतेशी संपर्क आल्यास व्हिसीओचे औषधी गुणधर्म लोप पावतात.

Leave a Reply