काळ्या हळदीच्या कंदांची पूर्वपिठीका माहित नसेल तर आधी खालील लेख वाचा. नाहीतर तुम्ही खालील सेक्शनमधील माहिती डायरेक्ट पाहू शकता.

आषाढीच्या वेबसाईटवर दाखवलेले किंवा तुम्ही मागवलेले हे कंद मेघालयमधून मागवलेले मूळ, अस्सल कंद असून "जिवंत" आहेत. सुकवलेले किंवा प्रक्रीया केलेले नाही. अनेक जण सुकवलेले - काळपट दिसणारे, शाईत बुडवलेले, रंगीत वा काळेकुट्ट दिसणारे कंद काळ्या हळदीचे कंद म्हणून विकत आहेत. खूप फसवणूका चालू आहेत. तेव्हा कंद घेताना खात्रीच्या सप्लायरकडूनच घ्या. मी वर शेतातला फोटो दिला आहे पहा. हा माझा कोकणातील शेतातला कंद आहे. त्यातही तुम्हाला निळ्या रंगाचे दोन व्हेरिएशन आहेत पहा.
जो मनुष्य तुम्हाला विकतोय त्याला त्या कंदाबाबत काही माहिती विचारा. हे पूर्ण आर्टिकल वाचून होईपर्यंत तुम्हाला काळ्या हळदीबाबत बरेच काही कळले असेल. ते त्याला विचारा, मग तुमच्या लक्षात येईल की काय खरे आणि काय खोटे. काळ्या हळदीवर रील्स बनवून टाकणे सोपे आहे. इकडून तिकडून काहीतरी मटेरीअल कॉपीपेस्ट करून टाकणे देखील सोपे आहे. सोशल मीडियावर आता सारे काही मिळते आणि AI वापरून अनेक व्हिडीओ रेडीमेड बनवून मिळतात. हल्लीच मी पहिल्यांदा काळ्या हळदीच्या एका गुणधर्माबाबत सोशल मीडियावर सर्वप्रथम प्रकटपणे लिहीले, "काळ्या हळदीमधे २८% पर्यंत कापूर आढळतो". हे तुम्हाला एकाही इंफ्लुंएंसरच्या लेखात, व्हिडीओमधे, कुठेच आढळणार नाही. कुणाला माहितच नाही हा प्रकार. अनेक विद्वान इंफ्लुएंसर तर काळ्या हळदीमधे कुर्कुमीन असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे काही हुष्षार काळी हळद अभिमंत्रीत करून देत आहेत. पण कुणालाच माहित नाही की काळ्या हळदीमधे असे काय आहे जे तिला एकाच वेळेस अध्यात्मिक आणि वैद्यकीय अशा दोन्ही प्रकारे अद्वीतीय आणि श्रेष्ठ बनवते. तो आहे कापूर. आणि त्या कापरा सोबत असलेले अनेक पॉलीफेनल्स, फ्लेवलॉडस आणि इतर घटक वातावरणही शुद्ध करतात, सकारात्मकता प्रदान करतात आणि सेवन केल्यास अद्भुत औषधी फायदे देतात. काळी हळद हे एक प्रकारे काळे अमृतच असल्यासारखे आहे..
ह्याची सुरूवात झाली जानेवारी २०२५ मधील माझा केरळ दौऱ्यापासून आणि "अलप्पी" हळदीपासून. अलप्पीचे वाटप करता करता आम्ही येऊन ठेपलो काळ्या हळदीवर. खूप वाचन केले, अभ्यास केला आणि एका खात्रीलायक सोर्सच्या माध्यमातून थेट मेघालयमधे कॉन्टॅक्ट काढला आणि सँपल काळी हळद मागवली. विवीध प्रकारे चेक केली. जादूटोणा करून नाही. लॅबटेस्ट केली. हो!! काळ्या हळदीची लॅब टेस्ट करूनच तुम्हाला कळेल की ती खरी की खोटी. काळ्या हळदीच्या प्रॉपर्टीज काही औरच आहे. अनेक सोशल मीडिया इंफ्लुएंसर घोर अज्ञानातून काळ्या हळदीमधे कुर्कुमीन कसे सर्वाधीक आहे असे सांगून मग त्याच्या औषधी उपयुक्ततेच्या वाट्टेल त्या कहाण्या बनवत आहेत. काळ्या हळदीमधे कुर्कुमिन चे प्रमाण ०.०४% इतके कमी म्हणजे नगण्य आहे. तेव्हा जेव्हा कुणी इंफ्लुएंसर तुम्हाला सांगेल की काळ्या हळदीमधे कुर्कुमिन आहे तेव्हा काय ते समजून जा! दुसरे म्हणजे त्यांना काळ्या हळदीचा एकही औषधी गुण माहित नाही. कारण उडत उडत मिळालेली माहिती पुढे ढकलण्याचे काम चालू आहे.
काळ्या हळदीचे एकूणच कंपोजिशन इतके पॉवरफूल आहे की विषबाधेसारख्या विषयात देखील काळ्या हळदीचा वापर करतात, अगदी आधुनिक विज्ञानात देखील. आम्ही केलेल्या प्रयोगात डायबिटीज, वेट लॉस, स्नायुदुखी अशा अनेक विषयावर आम्हाला काळ्या हळदीचे चमत्कातीक म्हणावे असे रिझल्ट मिळाले आहेत. त्यादृष्टीने वैज्ञानिक रित्या योग्य प्रकारे प्रोसेस केलेली "काळ्या हळदीची पूड" आम्ही आषाढीच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे आणि केवळ २ महिन्यात शेकडो लोकांनी ह्याचा फायदा घेतला आहे.
काळ्या हळदीच्या वैद्यकीय फायद्यांसोबतच दुसरा महत्वाचा विषय तिचे अध्यात्मिक महात्म्य आणि त्याभोवतालचे रहस्य! अनेक इंफ्लुएंसर ह्यावर वाट्टेल ते सांगत आहेत. जादूटोणा, ग्रहबाधा, करणी-मूठ, दाभण वाकडी होते, काळा साप येतो, धनवर्षाव होतो इ इ. काळी हळद म्हणून अक्षरश: आल्याची मुळे देखील शाईत बुडवून, सुकवून लोकांना विकत आहे. काही महाभागांनी स्वत:च स्वत:चे "संशोधन केंद्र" काढून लोकांना "अभिमंत्रीत केलेली हळद" विकायला सुरूवात केलेली आहे. मुळात अभिमंत्रीत केलेले काहीच कधी विकता येत नाही हा अध्यात्मशास्त्राचा मूळ प्रघात आहे. आणि जनसामान्यांना ह्याची कल्पना देखील नाही.
काळ्या हळदीबाबत आजवर कुणालाही माहित नसलेले अध्यात्मिक सत्य जे तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येते ते हे की काळ्या हळदीमधे २८% पर्यंत "कापूर" आहे. आणि त्याची नैसर्गिक रचना अशी आहे की वैद्यकीय दृष्ट्या आणि अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी बनते. कापूराचे जसे अनेक वैद्यकीय आणि अध्यात्मिक फायदे आहेत ते सारे आणि अजूनही अनेक काळ्या हळदीचे आहे. हीला नरकाचूर असेही म्हणतात. "नरक" ह्या शब्द ती जमीनीखालील मूळ असल्याने आहे. त्याचा नकारात्मक अर्थ घेऊ नका. पण जमीनीखालील अत्यंत प्रभावी अशी ही वनस्पती वातावरणची शुद्धता, सर्व नकारात्मक शक्तींचा नाश, स्ट्रेस-टेंशनचा नाश करून विवीध प्रकारे शांतता, समृद्धता प्रसान करते.
आणि सर्वात महत्वाचे, ह्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही. काळ्या हळदीचे कंद एकतर देवघरात ठेवा, किंवा कपाटात-तिजोरीत ठेवा, घरात प्रत्येक खोलीमधे एक ठेवा (दिशेचा काही फरक पडत नाही), व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफीसटेबल/केबिनमधे ठेवा आणि परीणाम पहा. वाटल्यास एखाद्या कुंडीत लावा आणि रोज थोडे थोडे पाणी घाला म्हणजे त्याला कोंब फुटतील आणि काळ्या हळदीची रोपे येतील. छान दिसतात. मधली शीर जांबळट काळी असते..
अनेकवेळेस आपले काम अगदी व्हायला आले असते आणि शेवटचे थोडे बाकी असते.. पण होतच नसते.. कुठली तरी नकारात्मकता मधे अडथळे आणत असते. किंवा भरल्या चांगल्या घरात अकारण वाद-भांडणे होत असतात, शांतता मिळत नाही, सारे चांगले चालू असताना देखील सतत काही भितीचे सावट असते, चिंता-भुणभुण असते.. अशा वेळेस काळी हळद छान काम करते. अनुभव घेऊन पहा.
कुठल्याही जादूटोण्याचे समर्थन नाही. काळी हळद लावल्याने तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडणार नाही की लॉटरी लागणार नाही की अचानक नशीब उघडणार नाही. कर्म अटळ आहे आणि प्रचंड यश मिळवायला तर कर्माचा डोंगर उभा करावा लागतो. त्यात काही डिस्काऊंट होत नाही. पण प्रचंड कर्म करूनही कधीकधी नशीब आडवे येते किंवा एखादी नकारात्मकता, कुणाची तरी हाय-द्वेष-असुया आपल्याला मागे खेचत असते, अशा वेळेस काळ्या हळदीचे कंद सोबत असणे हा मोठा प्लस असू शकेल.
कंदांमधे एकदम मोठे, मध्यम आणि अगदी छोटे असे विवीध प्रकारचे कंद असतात. साधारण ६-७ चांगल्या दर्जाचे, मध्यम आकाराचे कंद ज्यांचे एकूण वजन १००-१२५ ग्रॅम भरेल असे निवडले जातात. कोकोपिट, राख आणि वर्मिकंपोस्टच्या मिश्रणात चांगले पॉटिंगमिक्स तयार करून त्यात हे कंद पाठवत आहोत. ह्यामुळे कंद न सुकता, न कुजता, आहेत तसे जिवंत आणि सुरक्षीत तुमच्यापर्यंत पोचतील. १५-२० दिवस जरी ट्रान्सपोर्टमधे गेले तरी ह्यांना काही होणार नाही, काळजी करू नका. हे कंद तुम्ही आहेत त्या पिशवीत रुजवू शकता. किंवा बाहेर काढून घरात देवघर व इतर निरनिराळ्या ठिकाणी ठेवू शकता.
"भाग्योदय" करणारी कृष्ण हरिद्रा" ... "काळ्या हळदीची पूजा करा आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडा" ... "काळ्या हळदीचे कंद घरी आणा, गुप्तधन मिळवा" ... "कोर्टकज्जाच्या कामात हमखास यश - काळी हळद" .. "घरात समाधान नांदावे ह्यासाठी हमखास उपाय - काळी हळद" .. अशा किती प्रकारच्या फसव्या जाहिराती पहायला मिळतात. लॉक उघडल्याचे व्हिडीओ, दाभण वाकडी झाल्याचे व्हिडीओ, काळ्या हळदीजवळ साप असल्याचे व्हिडीओ .. काही लोक तर ४ वर्षे संशोधन केंद्र चालवल्याचे दावे करत आहेत जे संशोधन केंद्र त्यांनी त्यांच्याच घरी उघडले आहे. स्थानिक इंफ्लुएंसर थोड्याशा पैशासाठी अशांचे व्हिडीओ बनवतात आणि व्हायरल करतात. तुम्ही तुमच्या विवंचनेमधे अडकलेले असता आणि तुम्हाला एक आशेचा किरण दिसतो. तुम्ही ऑर्डर करता. त्यातून काही लोकांना वाटते की २-४ कंदांनी काय होणार, मग ते मोठ्या प्रमाणात ऑर्डर करतात. म्हणजे आपल्या सगळ्या अडचणी होलसेलमधे निघून जातील.. असे कसे होईल? थोडा विवेक जागा ठेवायची गरज आहे. हे जे सारे काळी हळदवाले तुम्हाला फसवत आहेत ते केवळ त्यांचा धंदा करत आहेत. त्यांचा दोष नाहीये. ते पोटापाण्याचे उद्योग करत आहेत. भारतात हे पूर्वीपासून चालू आहे. कधी वासूदेव येतो, कुणाच्या अंगात देवी येते, कुणी कौल लावतो, कुणी पाषाणाला नाणे चिकटवतो ... आता काय तर काळी हळद आणि सगळ्या अडचणी भुर्र!
चूक तुमची आहे. मुळात हे लक्षात घ्यायला हवे की जे तुमच्या "भाग्यात" लिहीले आहे ते बदलणार नाही. काळी हळद, रुद्राक्ष, सकारात्मकता तुम्हाला संकटातून तरूण जायची क्षमता देतात, धीर देतात आणि संकटातही तुमचे पाऊल वाकडे पडणार नाही ह्याचे भान जागे ठेवतात. म्हणजे तुमचे हे भाग्य भोगून संपले की पुढील जीवन सुरळीत व्यतीत करता येईल. समाधान नांदेल. मला केवळ काळ्या हळदीचे कंद आणि चमत्कार बाबत अनेक फोन आले. कुणाला रत्नागिरीमधून कुणी कंद अभिमंत्रीत करून दिले, कुणाला कुठल्या बाबाने दिले, कुणी औरंगाबादहून मागवले, कुणी थेट काशीमधून कुठल्या बाबाकडून मागवले.. आणि कुणालाही "रिझल्ट" काही आले नाही. ... आणि तरी त्यांना माझाकडून कंद ऑर्डर करायचे आहेत.. अरे बाबा कशाला?? मी प्रत्येकाला समजावतो आहे की तुमच्याकडे ऑलरेडी काळ्या हळदीचे कंद असतील तर परत घ्यायची गरज नाही. माझे ते ओरिजीनल आणि इतरांचे फालतू असे काही नसते. आणि माझे कंद ऑर्डर केले की लगेच काही तुमच्या घरी धनवर्षा होणार नाही.. पण लोकांना हवेच आहे.. तुमच्या ह्या अगतीकतेचा धंदा केला जातो आहे ह्याचा विचार करा. मला फोन करणाऱ्यांना ह्या लबाड लोकांनी हजारो रुपयांना डुप्लिकेट कंद, पावडर विकलेत. सोबत कसली कसली धनवर्षा यंत्र, कलह निवारण यंत्र वगैरे विकलेत. आणि बहुतेकांनी किमान २-३ जणांकडून कंद मागवले.. तरी परत माझाकडून देखील कंद हवेत...
दोन तिन महाभागांनी तर मला विचारले देखील की तुम्ही काळ्या हळद वापरून लाईव्ह व्हिडीओ कॉलमधे लॉक ओपन करून दाखवा किंवा दाभण वाकवून दाखवा. माझा हळदीमुळे असे काही होतच नाही. तर मग त्यांचे म्हणणे की माझी हळद डुप्लीकेट आहे किंवा तितकी पॉवरफूल नाही. मला एकाने तर असेही सांगीतले की माझी काळी हळद ही शेती करायची आणि भाग्योदयवाली मात्र निबीड जंगलात मिळते. ती ही नाहीच. तिचे ७ फण्यांचा नाग रक्षण करत असतो..
मी परत सांगतो, असल्या भूलथापांना बळी पडू नका. काळी हळद ही जनरल सकारात्मकता मिळावी ह्यासाठी आहे. तितपतच तिचा उपयोग आहे. काहीही चमत्कार होणार नाही. कुणीही माझी काळी हळद नाही ऑर्डर केलात तरी चालेल पण खोट्या समजूतीला, अंधश्रद्धेला बळी पडून असे काही करू नका.
मला अनेक फोन, मेसेजेस वैयक्तिक अडचणी सांगणारे आले. कुणाचे मूल खूप आजारी आहे, कुणाच्या लग्नाची अडचण आहे, नवरा-बायकोचे वाद आहेत, सासू-सुनेचे पटत नाही, मूल होत नाहीये. काही वयस्कर लोकांना अध्यात्मिक विषयात प्रश्न असतात. मला तुमच्या अडचणींबाबत खूप सहानुभुती आहे पण मला तुम्हाला निक्षून सांगायचे आहे की अनोळखी लोकांसोबत अडचणी शेअर करू नका. अहो तुमच्या अडचणींचा, त्रासाचा, श्रद्धेचा अक्षरश: बाजार मांडला जातो आहे. अभिमंत्रीत करून कंद काय देतील, उपासना सांगतील, अध्यात्मिक तोडगे सांगतील. आणि ह्या सर्वाचे पैसे घेतील. आता तर प्रवचनकार देखील "सुपारी" घेतात. तमाशाची असते तशी डबलबारी देखील करायला लागले आहेत. हा सारा आपल्या श्रद्धांचा बाजार आहे.
मी स्वत: कीर्तनकार घरण्यातून आहे. माझा आईचे मामा, त्यांचे वडील रामनवमीची कीर्तने करत. माझा आईच्या जिभेवर सरस्वती आहे. कुठल्याही विषयावर अगदी प्रभावी, सर्वांना समजेल असा विषय मांडू शकते. पण कधीही पैसे घेऊन किर्तन केले नाही. आता सगळा बाजार झाला आहे. आणि सर्वजण तुमच्या अडचणींचा फायदा घ्यायला बसले आहेत. एक ताई काल सांगत होत्या की, त्यांनी दोन जणांकडून अभिमंत्रीत करून कंद घेतले पण त्यांना काही फायदा झाला नाही. कसा होईल फायदा? काळ्या हळदीचे कंद म्हणजे काय जादूची काडी आहे का लगेच चमत्कार व्हायला. जर तुम्ही कठोर कर्म करत असाल, योग्य मार्गावर असाल आणि थोड्याशा नकारात्मकतेमुळे मागे पडत असाल तरच काळी हळद, रुद्राक्ष सारख्या गोष्टी तुम्हाला कामी येतात. चमत्कार कधीच होत नाही. काही वेळेस योगायोग होतो आणि आपण त्याला चमत्कार समजून बसतो, वहावत जातो. कृपया आपल्या अडचणी कुणासोबतही शेअर करू नका. श्रद्धांचा बाजार होऊ देऊ नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका.

काळी हळदीचे कंद एकतर उपासना करताना आपल्या सोबत ठेवू शकता, अभिमंत्रीत करून सोबत बाळगू शकता, देवघरात-ऑफीसमधे किंवा तिजोरीत
ठेवू शकता किंवा रुजवू शकता..
रुजवायचे असल्यास पॅकींगची ती पिशवी काढून तिला भोके पाडा व रोज थोडे थोडे, अगदी अर्धा कप पाणी द्या. चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी पिशवी ठेवा म्हणजे तिला उब मिळायला हवी. जोवर त्यांना कोंब येणार नाही तोवर कंद पिशवीतच असूदे. कोंब चांगले वर आले आणि हिरवट दिसायला लागले, पाने फुटतील असे दिसायला लागले की तुम्ही ते कुंडीत शिफ्ट करू शकता. कोकोपिट मधून रोप जेव्हा तुम्ही जमिनीत किंवा कुंडीत शिफ्ट करता तेव्हा मुळे तुटत नाही आणि त्याला "शॉक" बसत नाही म्हणून कोकोपिट मुद्दाम वापरले आहे. आणि कोकोपिट हा सर्वोत्तम पॉटींग मीडीअम आहे.
अत्यंत महत्वाचे: हा काळ्या हळदीचे कोंब फुटायचा किंवा रूजायचा सिझन नाही. ती पावसाळ्यापूर्वी रुजत घालतात. त्यामुळे तुम्ही कंद रूजत घातले आणि कोंबच आले नाही तर खट्टू होऊ नका. उशीरा का होईना कोंब हे येणार. काही अपवादात्मक परिस्थितीमधै कोंब न येता कंद कुजून जाऊ शकतो. असे होऊ शकते. पण ह्यात काही निगेटिव्ह नाही. हे सारे नैसर्गिक आहे.
रुजवणार ते कंद मोडणार नाही ह्याची काळजी घ्या. खूप महत्वाचे आहे. हळदीच्या रोपाला उन्हाची गरज असते. त्यामुळे रोप आले असेल तर रोज किमान ३-४ तास उन्हात किंवा भरपूर सूर्यप्रकाशात ठेवायला हवे. आपल्याला ज्या नैसर्गिक साधनापासून काही अभिलाषा आहे त्याला न दुखावता, त्रास न देता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अभिमंत्रीत करणार तर शक्यतो रुजवू नका. रुजवलेत तर मात्र ते जिवंत रोप असल्याने त्याची तशी काळजी घ्या. काळ्या हळदीच्या पानांना मधली शीर छान जांभळट काळ्या रंगाची असते..
काळी हळदीचे कंद एकतर उपासना करताना आपल्या सोबत ठेवू शकता, अभिमंत्रीत करून सोबत बाळगू शकता, देवघरात-ऑफीसमधे किंवा तिजोरीत
ठेवू शकता किंवा रुजवू शकता. मुळात हे कंद सकारात्मकतेसाठी घरी ठेवायला किंवा सोबत बाळगायला म्हणूनसच दिलेले आहेत. हा कंद रुजायचा सिझनही नाही. त्यामुळे ते रिजत घालण्या ऐवजी असेच किंवा मंत्रीत करून सोबत बाळगाल तर उत्तम!
ज्यांना देवघरात, तिजोरीत किंवा घरी/ऑफीसमधे कुठेही ठेवायचे आहेत ते हे कंद कोकोपिटमधून काढा. कोंब आले असतील तरी ते मोडू नका. एकदोन दिवस साधारण उन्हात सुकवा म्हणजे अतिरीक्त पाणी सुकून जाईल. मग ते एका चांगल्या कॉटनच्या कपड्यात गुंडाळून तुम्हाला हवे तिकडे ठेवा. इतकेच पुरेसे आहे. मी आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे “अभिमंत्रीत” करणे हे निव्वळ थोतांड आहे. कुणीही तुम्हाला काहीही वस्तू अभिमंत्रीत करून देऊ शकत नाही. विक्री तर शक्यच नाही. हे पोटार्थी मंडळींचे चाळे आहेत. पण तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही स्वत:च घरच्याघरी कंद किंवा काहीही अभिमंत्रीत करून उजळू शकता. ह्याचा विधी अत्यंत सोपा-सरळ आहे. आणि फक्त निस्सिम श्रद्धा सोडून कसलीही गरज नाही.
कंद अभिमंत्रीत करण्याचे विधी पूर्णपणे वैकल्पिक (optional) आहे. अजिबात करायची गरज नाही. पण माहिती असावे, कधीही वाटले तर करता यावे ह्यासाठी हे देत आहे. कंद अभिमंत्रीत करण्यासाठी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसा. नेहमीची पुजा करून देवासमोर संकल्प करा की कशासाठी तुम्ही कंद अभिमंत्रीत करत आहात आणि त्यात यश मिळावे अशी प्रार्थना करा. कंद निट धुवून, पुसून घ्या. मुळे/कोंब मोडणार नाही ह्याची काळजी घ्या. मग कंदांवर उजवा हात ठेवून तुम्हाला येत असलेले गणपतीचे कुठलेही स्तोत्र म्हणा व विघ्नहर्त्या गणेशाला आवाहन करा. त्याच्यासाठी कंदांवर हळद-कुंकू व फूल घाला. तुमच्याकडे इतर कुठले पुजासाहित्य असेल तर ते देखील वापरा जसे की चंदन, अत्तर, वस्त्र इ. काहीही नसले तरी हळद-कुंकू व फूल इतकेच पुरेसे आहे. थोड्या अक्षता घाला. मग निरांजन ओवाळा. असल्यास कापूर पेटवून आरती करा, नाही केली तरी चालते. मग परत कंदांवर उजवा हात ठेवून “ॐ श्रीं नम:” हा “श्री” म्हणजे समृद्धीचा मंत्र आहे त्याचा ११ माळा जप करा. ह्याचा उच्चार “ओम श्रीम नमहा” असा आहे. श्री वर अनुस्वार आणि नम नंतर विसर्ग आहे. जप पटापट करायचा आहे. जप करताना माळ ओढायची नाहीये. त्यासाठी घड्याळ लावून १६ मिनीटे जप करायचा आहे. ज्यांना गायत्रीमंत्र येतो ते सुरूवातील एक माळ गायत्री करू शकता. सूर्याचे कुठलेही मंत्र एक माळ केलेले चालतात. अथर्वशीर्ष येत असल्यास ते म्हणा. पण हे सारे वैकल्पिक आहे. नाही केले तरी चालेल. ह्यानंतर हात जोडून देवाची प्रार्थना करा की, तुम्ही तुमच्या कामामधे कुठेही कमतरता ठेवणार नाही. सचोटीने व्यवहार कराल. त्यामुळे तुम्हाला श्रीकृपेने यश मिळावे. काही चुकले असेल तर क्षमा मागा. मग हे कंद एक दोन तास उन्हात ठेवा ह्यासाठी की त्यातील अतिरीक्त पाणी उडून जावे. आणि मग तुम्हाला वाटेल असे कुठेही ठेवू शकता. कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवाल तर ते सुरक्षीत राहतात. जनरली देवघरात, तिजोरीत, ऑफीस किंवा धंद्याच्या ठिकाणी टेबलवर, पेढीवर ठेवण्याची पद्धत आहे.
तुम्ही रुजलेले कंद देखील देवघरात ठेवू शकता. पण हळदीच्या रोपाला उन्हाची गरज असते. त्यामुळे रोप असेल तर रोज किमान ३-४ तास उन्हात किंवा भरपूर सूर्यप्रकाशात ठेवायला हवे. आपल्याला ज्या नैसर्गिक साधनापासून काही अभिलाषा आहे त्याला न दुखावता, त्रास न देता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अभिमंत्रीत करणार तर शक्यतो रुजवू नका. रुजवलेत तर मात्र ते जिवंत रोप असल्याने त्याची तशी काळजी घ्या.
काळ्या हळदीच्या कंदाबद्दल लिहीताना मी स्पष्टच लिहीले आहे की अध्यात्मात "अभिमंत्रीत" करून वस्तू विकताच येत नाही. असे काहीही अस्तित्वातच नाही. "काळ्या हळदीचे कंद अभिमंत्रीत करून देतो" हा काही लबाड माणसांनी चालवलेला धंदा आहे. काळी हळद स्वत:च अत्यंत पवित्र व प्रभावी आहे. कारण तिच्यामधे कापूर आहे. आणि इतरही अनेक चमत्कारीक गुणधर्म. ह्यामुळे ती सर्व प्रकारचा नकारात्मकतेचा नाश करते. आणि मी हे अधिकारवाणीने, माझा गुरूंना व त्यांनी मला जे मार्गदर्शन केले त्याला स्मरून सांगतो आहे. रुद्राक्ष, काळी हळद, भस्म, सफेद रूई अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला कसल्याही अभिमंत्राची गरज नाही. ह्या वस्तू जर सिद्धव्यक्तीने किंवा गुरूतुल्य व्यक्तीने दिल्या तर त्यांचा प्रभाव अनेक पट वाढतो. गुरू देखील हे आशिर्वाद म्हणून देतात आणि त्यांना वाटल्यास अभिमंत्रीत करूनही देतात. पण ह्याचा व्यवहार केला तर त्यातील सत्शक्ती तात्काळ अंतर्धान पावते हा त्रिकालबाधीत सत्य आहे.
... पण तुम्ही रुद्राक्ष, काळी हळद सारख्या गोष्टी अभिमंत्रीत करू शकता व स्वत:सोबत बाळगू शकता, पुजेत ठेवू शकता, ऑफीस प्लेस, तिजोरी, कपाट अशा ठिकाणी ठेऊ शकता. मला अनेकजण विचारत आहेत की घरच्याघरी काळी हळद अभिमंत्रीत कशी करायची? किंवा नकारात्मकतेपासून संरक्षण व्हावे, वाईट शक्ती, नजर लागणे इ. पासून संरक्षण करण्यासाठी काळी हळद कशी वापरायची. मुख्यत्वे लहान मुल असलेल्यांना, मातांना ही चिंता भेडसावते आहे. मी परत सांगतो, विशेष काही करायची गरज नाही. पण तुमची खरेच ह्यावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला सारे सोपस्कार करायची तयारी असेल तर काळी हळद घरच्याघरी अभिमंत्रीत करून तिचा प्रभाव वाढवायची अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो.
काळ्या हळदीचे अखंड कंद मिळवा. कुणाकडूनही घ्या. तुकडे झालेले, मोडलेले, खराब झालेले नको. ओले, जिवंत असतील तर जास्त चांगले. पण सुके असतील तरी चालतील. माझाचकडून घ्यायला पाहिजे असे अजिबात नाही. तुमच्या ओळखीच्या कुणाकडे असतील, कुणी तुम्हाला देत असेल, स्वस्त कुठे मिळत असतील तर तिकडून घ्या काही प्रॉब्लेम नाही. कुणी तुम्हाला देताना मंत्र टाकून देईल का, जादूटोणा करेल का? अशी भिती बाळगू नका. असे काहीही करता येत नाही.
कंदांसोबत थोडी राख मिळवा. कंद त्यात कव्हर होईल इतकी राख असायला हवी. राख ही पेपर, प्लास्टिक वगैरे जाळून बनवलेली नको. लाकडाचीच राख हवी. ह्यासाठी तुम्ही कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानातून समिधा आणून घरच्याघरी राख बनवू शकता. विशेष काही करायची गरज नाही. अभिमंत्रीत झाल्यावर कंद ह्या राखेत ठेवायचे आणि सोबत बाळगायचे. राखेचे महात्म्य समजून घ्यायचे असल्यास गुरूचरित्र अध्याय २९ पहा...
कंद अभिमंत्रीत करण्याचा विधी पूर्णपणे optional आहे. अजिबात करायची गरज नाही. पण माहिती असावे, कधीही वाटले तर करता यावे ह्यासाठी हे देत आहे. कंद अभिमंत्रीत करण्यासाठी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसा. नेहमीची पुजा करून देवासमोर संकल्प करा की कशासाठी तुम्ही कंद अभिमंत्रीत करत आहात आणि त्यात यश मिळावे अशी प्रार्थना करा. कंद निट धुवून, पुसून घ्या. मुळे/कोंब मोडणार नाही ह्याची काळजी घ्या. मग कंदांवर उजवा हात ठेवून तुम्हाला येत असलेले गणपतीचे कुठलेही स्तोत्र म्हणा व विघ्नहर्त्या गणेशाला आवाहन करा. त्याच्यासाठी कंदांवर हळद-कुंकू व फूल घाला. तुमच्याकडे इतर कुठले पुजासाहित्य असेल तर ते देखील वापरा जसे की चंदन, अत्तर, वस्त्र इ. काहीही नसले तरी हळद-कुंकू व फूल इतकेच पुरेसे आहे. थोड्या अक्षता घाला. मग निरांजन ओवाळा. असल्यास कापूर पेटवून आरती करा, नाही केली तरी चालते. मग ज्यांना संरक्षणासाठी किंवा नकारात्मकतेसाठी विशेषत्वाने कंद अभिमंत्रीत करायचा आहे त्यांनी विष्णूसहस्त्रनाम, स्वत:, मोठ्याने - स्वत:ला निट ऐकू येईल इतपत म्हणायचे आहे. ज्यांना विष्णूसहस्त्रनाम कठीण वाटते किंवा जमणार नाही त्यांनी ४० वेळेस रामरक्षा म्हणायची आहे. हे करत असताना मधे उठायचे नाही. दुसऱ्या कुणाशी बोलायचे नाही. पाणी वगैरे प्यायचे नाही. बैठक बदलायची नाही. मधेच शिंक किंवा जांभई आल्यास जप परत चालू करावा. लघवी किंवा शौचाला आल्यास आंघोळ परत करून सारे परत करायचे आहे. म्हणून शक्यतो आधी काही खाऊ नका.
मग हे कंद एक दोन तास उन्हात ठेवा म्हणजे पाणी सुकून जाईल. आणि मग तुम्हाला वाटेल असे कुठेही ठेवू शकता. जनरली देवघरात, तिजोरीत, ऑफीस किंवा धंद्याच्या ठिकाणी टेबलवर, पेढीवर ठेवण्याची पद्धत आहे. ज्यांनी कंद अभिमंत्रीत केला ते आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा एका विशिष्ठ तिथीला हा विधी परत करून परत तेज देऊ शकतात. जर असे केले तर फायदाच होतो, पण नाही केले म्हणून काही नुकसान नाही..
हे सारे करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण सात्विक शक्तींची उपासना करतो आहोत. घोर काही नाही. त्यामुळे जरी तुमची चूक झाली, एखादी गोष्ट विसरलात किंवा क्रम चुकला तरी काहीही "त्रास होत नाही". सात्विक शक्ती ह्या नेहमीच मातृस्वरूप असतात. आपण उपासना करताना देखील तिला आई म्हणून हाक मारूनच तिची उपासना करायची असते. त्यामुळे ती कधी कोपत नाही आणि आपल्याच लेकराचे अकल्याण कधी करत नाही. कधी दुर्दैवान सात्विक उपासना करताना देखील अप्रिय, अघटीत काही घडल्यास तो केवळ तुमच्या पूर्वसंचीताचा विपाक असतो. देवतेचा कोप नाही. हे पक्के लक्षात ठेवा. शंका घेऊ नका, चुक झाली म्हणून घाबरू नका..
काळ्या हळदीवर काम करताना अनेकांशी सातत्याने बोलणे होते आहे. अनेकांनी पर्सनल अडचणी शेअर केल्या. अनेकांची फसवणूक झालेली आहे. काहींना गैरसमज आहे की काळ्या हळदीच्या कंदांमुळे एकदम काही चमत्कार होईल.. पण एक लक्षात येते आहे की अनेकांना चांगल्या सकारात्मक उर्जेची, थोड्याशा आधाराची गरज आहे. छोटी छोटी कामे अडकली आहेत, अडचणी आहेत. आणि काळी हळद काय तुमच्या अडचणी सोडवू शकत नाही. हो, हे मी परत परत सांगतोय आणि तुम्ही देखील निट लक्षात घ्या. काळी हळद चमत्कार करणार नाही. ज्यांना काळी हळद चमत्कार करेल असे वाटते त्यांनी कृपया कंद घेऊ नये. मी स्वत:च सांगतोय... पण काळी हळद नकारात्मक उर्जेचा नाश करते, वातावरण प्रसन्न करते हे मात्र त्रिकालबाधीत सत्य आहे. जर तुम्ही कर्मप्रधान असाल तर नक्की परीणाम होणार. ह्याला थोडी उपासनेची जोड द्याल तर अजूनच फायदा होईल. हे १००% सत्य आहे..
मी तुम्हाला फिल्मी स्टोरी सांगत नाही. पण गेले काही वर्षे मी अनेक अडचणीतून जात होतो. मुळात ज्या आर्थिक अडचणी मला आल्या त्या माझामुळे नाही. माझा सिएने मला फसवले आणि नातेवाईकांपैकी काहीजणांकडून खूप वाईट अनुभव आले ज्यामुळे मी प्रचंड आर्थिक अडचणीत आलो. जे मला कोरावर फॉलो करत होते त्यांना हे सारे माहित आहे. त्यातून मला AVN झाला. ह्या सर्व प्रकारात तुमचा आर्थिक तोटा किती होतो ह्यापेक्षा मानसिक खच्चीकरण किती होते हे महत्वाचे. आर्थिक अडचणी आणि AVN मुळे मी खूप खचलो होतो. त्यातून माझे नायजेरीया सारखे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट अडकले होते. मी स्वत: टॅरो रिडर आहे. स्वत:च स्वत:ची अनेक निगेटिव्ह रिडींग घेऊन पार निराश झालो होतो. २०२४ मध्यात खरे तर मला गाडी घ्यायची होती. ती घ्यायचीच होती एक throw-back म्हणून. पण काही शक्यता नव्हती. माझा व्यवसाय, असलेली कामे ह्याचा हिशोब घालता किंवा माझे टॅरो रिडींग पाहता मला काय गाडी घेणे शक्य नव्हते. किमान २०३० पर्यंत. हे मी तुम्हाला खरेच सांगतो आहे. पण मी कर्मात कसूर केली नाही. काळ्या हळदीचा आणि विष्णूसहस्त्रनामाचा मला प्रचंड फायदा झाला आहे. इतरही काही प्रकार केले पण ते मला वैयक्तिक लागू पडतात म्हणून इकडे देत नाही. पण पूर्णपणे बेडरिडन असलेला मी आता ९५% रिकव्हर झालो, ऑपरेशन न करता. खरे तर ऑपरेशन करायची ऐपतच नव्हती. २०२५ मधे माझे ५ नायजेरीया दौरे झाले. २ मोठी कामे झाली. शेअरमार्केटमधे एका वर्षी कमवले पैसे पण दुसऱ्याच वर्षी घालवले. पण सोन्याने चांगली साथ दिली. आणि आमची काळी गाडी फायनली आली.. बरोब्बर ३१ डिसेंबर २०२५ - भागवत एकादशी. योगायोग समजा, चमत्कार म्हणा.. काय ते समजा.. वास्तव बदलत नाही. "कर्म + उपासना + काळी हळद" नक्की बदल घडवू शकते. पण हा क्रम निट लक्षात घ्यायला हवा. नुसतेच काळ्या हळदीच्या कंदाने काही होणार नाही हे परत सांगतो आहे..
मला जशी सकारात्मकतेची नितांत गरज होती तशी अनेकांना आहे. माझा हा लेख आवर्जुन वाचणाऱ्या तुमच्यासारख्या अनेकांना आहे. मग आपण सर्वांनी मिळून सकारात्मकता अजून थोडी पसरवूया का? आषाढी स्थापन करतानाच आमच्या डोक्यात पक्के होती की मारवाडी धंदा करायचा नाही. नुस्त्या प्रॉफीट साठी धंदा करायचा नाही. माणसे कमवायची. जिवाभावाची. ह्यालाच अनुसरून माझी एक विनंती आहे पटते तर पहा.
मी सध्या आषाढीच्या वेबसाईटवरून १००ग्रॅम कंद थोडे कोकोपिट, राख, वर्मिकंपोस्ट असे मिक्स करून २५०/- ने उपलब्ध केले आहे. अनेक भामटे इंफ्लुएंसर, लबाड लोक कंद अभिमंत्रीक करण्याचा ड्रामा करून ते १०००-१५०० असे वाटेल त्या किमतीला विकत आहेत. माझा संपर्कात काही जण आले ज्यांनी काळ्या हळदीचा "एक कंद" ११००० ने विकत घेतलाय. प्रचंड फसवणूक चालू आहे, अक्षरश: तुमच्या श्रद्धांचा, भावनांचा बाजार चालू आहे. इतके करून रिझल्ट येतच नाही कारण खोटाच दिलासा दिलेला असतो. हे सारे थांबवू शकतो. लोकांना खरेच, चांगले, आश्वासक सोल्युशन देऊ शकतो. जर तुम्ही सारे किलोच्या दराने घ्याल तर मी तुम्हाला काळ्या हळदीचे कंद २०००/- किलो ने उपलब्ध करतो. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना थोडेसे मार्जिन ठेवून जेन्युइन कंद उपलब्ध करा. थोडे मार्गदर्शन करा. धीर द्या. सारेच जण मिळून आपापल्या अडचणींवर मात करूया. तुम्हाला थोडे अर्थार्जन देखील होईल. शिवाय कुणाला तरी चांगला मार्ग दाखवल्याचे समाधान मिळेल. ज्यांना हे स्केल करायचे ते हे कंद जमिनीत लावू शकता. हळदीचे कंद एका वर्षात ७-८ पटीपासून १०-११ पट देखील वाढतात. ते कंद परत तुम्ही इतरांना उपलब्ध करू शकता. फक्त एक सूत्र पाळूया - सचोटी! खोटे बोलायचे नाही, फसवणूक करायची नाही, कुणाच्याही श्रद्धेचा, भावनेचा गैरफायदा घ्यायचा नाही. माझा कंपनीचे नाव आहे आषाढी! आषाढी वारी ही आपल्या सकल मराठी समाजाची अस्मिता आहे.. त्याला बट्टा लावायचा नाही.
हे पटत असेल तर मला 076668 73787 ह्या क्रमांकावर "काळ्या हळदीचे दूत" असा मेसेज करा. आपण एक व्हाट्सॅप ग्रुप बनवूया. अधिक डिस्कस करूया. जर सगळ्यांना पटले तर मिळून हे चांगले काम करूया..
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामधे खूपच अंधूक फरक आहे. आणि जे अश्रद्ध किंवा नास्तिक आहेत त्यांना दोघांमधेही काहीच फरक जाणवत नाही. कारण देव तर कुणालाच सिद्ध करता येत नाही. किंवा सर्व प्रकारचे दैववादी विषय लॅबमधे सिद्ध करणे शक्यच नाही. त्यामुळे पुरोगामी, कर्मप्रधान विचारसरणीच्या लोकांना सर्वच श्रद्धा ही अंधश्रद्धा वाटते आणि त्यात काही चूक नाही.
मी स्वत: पुरोगामी विचारसरणीचा आहे. रामायण कधी घडलेच नाही, पुष्पक विमानासारखे कधीच काही नव्हते हे माझे स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मत आहे. अनेक विद्वानांशी ह्यावर सविस्तर मुद्देसूद चर्चा करून त्यांना निरूत्तर केलेले आहे. पण मी स्वत: रामरक्षेचा उपासक आहे, विवीध अध्यात्मिक उपासनांचा साधक आहे, सहस्त्रचंडी केलेली आहे आणि मुळात आस्तिक आहे. पण माझी रामावर जी श्रद्धा आहे ती रामायणातील मूल्यांमुळे. त्यासाठी मला राम अयोध्येत जन्माला यायची गरज नाही, त्याची बायको रावणाने पळवून न्यायची गरज नाही, आणि रामाने वानरसेनेच्या मदतीने सेतू बांधून लंकेत जायची गरज नाही. ह्यातील कुठल्याची गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कारण हे कधी घडलेच नाही हे मला पक्के माहित आहे. पण माझी राम तत्वावर नितांत श्रद्धा आहे! त्यासाठी रामाने जन्म घ्यायची गरजच नाही. हा मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धेत असलेला फरक आहे. श्रद्धा असायला "मूल्य" लागते आणि अंधश्रद्धा असायला "चमत्कार" लागतो. दुर्दैवाने लोकांना चमत्कारच भावतो, मूल्य कधीच विरून गेलेले असते म्हणून श्रद्धा पटकन अंधश्रद्धेकडे वळते..
तसेच दुसरे हे सांगता येईल की माझा देवावर विश्वास आहे, मी आस्तिक आहे, उपासना करतो .. पण सध्या जे गुरूमार्गातील थोतांड चालू आहे त्यावर अजिबात विश्वास नाही. देवाचा आणि धर्माचा बाजार मांडलेला आहे. पण माझा ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांवर प्रचंड विश्वास आहे. त्यांनी सांगीतलेला देव आणि त्याच्यापर्यंत पोहोचायचा ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग मी अव्हेरूच शकत नाही. हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधे फरक आहे. माझा विवेक जागृत आहे आणि वहावत जात नाही..
आणि म्हणूनच मी कट्टर नास्तिकता देखील स्विकारत नाही. मी जेव्हा कट्टर नास्तिकता अंगिकारतो तेव्हा मी एका क्षणात ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांना शून्यवत करून टाकतो.. आणि इतके ते सोपे नाही..
काय योग्य आणि काय अयोग्य किंवा त्याज्य हे विवेकाच्या कसोटीवर जोखायचे असेल तर दोन सोपे आणि स्पष्ट निकष आहेत - उद्दिष्ट आणि खंत!
"उद्दिष्ट" किंवा मोटिव्ह: माझा एक मित्र आहे. उच्चविद्याविभूषित. त्याच्याशी चर्चा करताना असाच विषय झाला होता. ग्रे रंगाच्या हजारो शेड्स असतात (म्हणे). काहीच पूर्ण वाईट आणि पूर्ण चांगले नसते. काहीच पांढरे शुभ्र आणि काळे कुट्ट नसते. नेहमी ग्रे रंगाच्या शेड्स असतात. हल्ली ही आर्ग्युमेंट खूप ऐकायला येते. आपापल्या भुमिका, राजकीय विचारधारा इ. समर्थन करताना. सर्रास हे बोलताना दिसतात. आणि बरेचदा अशा प्रकारच्या आर्ग्युमेंटना खटकन पटणारा एक मूळविचार असतो. जो ऐकल्यावर पटकन सारे बरोबर वाटायला लागते. "वेळप्रसंगी खोटे बोलावेच लागते, तर खोटे बदनाम का?" ह्यात खरेच खोटेपणाचे छान भाबडे समर्थन आहे, नाही का? … त्याने देखील मला अशाच आशयाचा प्रश्न विचारला.. "दारू वाईट, दारू वाईट असे म्हणतात पण आयुर्वेदीक औषधात देखील अल्कोहोल असते. मग औषध मात्र बदनाम नाही .. पण दारू बदनाम. आणि दारूदेखील कमी प्रमाणात प्यायली तर उपकारकच असते…" जबरदस्त विचार आहे की नाही? प्रथमदर्शी काहीच चूक वाटत नाही. प्रमाणात प्यायलो तर दारूमधे देखील वाईट काय? म्हणजे दोष पिणाऱ्याच्या सदसदविवेकाचा आहे.. आणि ह्या फॉर्मुलाने तर जगात काहीच वाईट नाही! All Shades of Gray!!! …
अशा वेळेस पहिले म्हणजे प्रश्नाच्या वर निघून जायचे. प्रश्नात आणि उदाहरणात अडकायचे नाही. आणि हे विचार कुणीही मांडले असतील तरी स्वत:ला प्रश्न विचारायचा की उद्दिष्ट काय? औषध बनवणारा रूग्णाला आरोग्य लाभावे म्हणून औषध बनवतो, नाही का? की रुग्णाला नशा यावी म्हणून बनवतो? त्याला झिंगायला मिळावे म्हणून बनवतो? आणि कुठला दारू बनवणारा पिणाऱ्याला आरोग्य लाभावे, दिर्घायुष्य लाभावे म्हणून दारू बनवतो? दारू बनवणाऱ्याचा मूळ उद्देश लोकांनी जास्तीत जास्त, रोज प्यावी .. मग लिव्हर फुटेना का.. तेच औषध बनवणारा लोकांनी बरे व्हावे म्हणून बनवतो ना? की औषध खपत रहावे म्हणून?? इतके सारे सोपे आहे पहा. तसे तर दोन्ही व्यवसायच. दोघांमधेही भरपूर पैसा आहे. पण वैद्यकीला नोबल प्रोफेशन म्हणतात ते ह्यामुळेच!
अनेक प्रश्नांवर हा निकष लावून पहा. मोटिव्ह काय होता? कायदा देखील पहिल्यांना मोटिव्ह पाहतो. चोरी असो की खून, मोटिव्ह काय होता? अनावधानाने किंवा आत्मसंरक्षणासाठी झालेल्या खुनाला फाशी देत नाही, ह्याला कारण मोटिव्ह!
"वेळप्रसंगी खोटे बोलावेच लागते, तर खोटे बदनाम का?" ह्याला देखील बरेच वेळा मोटिव्हची लिटमस टेस्ट पटकन लागू पडते. तुम्ही खोटे बोलताना तुमचा मोटिव्ह काय होता? जर त्यामागे एखाद्याचा जीव वाचवणे, किंवा किमान कुणाचे नुकसान न करणे इतपत मोटिव्ह क्लिअर असेल तरी पुरेसे असते. अशा वेळेस खोटे बोलणे ही फक्त कृती रहाते. त्याचा दोष लागत नाही. किंवा असे म्हणूया की this wrong deed can be exempted against some good deed or confession..
माझा एक ज्यू मित्र आहे. त्याने मला इज्राईलचा व्हिसा मिळवून दिला होता. तो धार्मिक आहे. जसे आपण हिंदू धर्मियांना गायीबाबत आस्था आहे तशीच इज्राईलींना देखील आहे. किमान त्याचा बोलण्यात हे जाणवायचे. मी टर्कीला असताना मी त्याला व्होडका नेली होती. त्याने मला खरेतर ड्रिंक्स घ्यायला शिकवले. त्याच्याशी गप्पा मारताना हा विषय एकदम क्लिअर झाला होता! त्याची अजून एक थिअरी होती, "if u have greed, grivence, anger, sorrows … it reflects in your body, as u attract those negative energies …"
... आणि काही अपवादात्मक वेळा अशा असतात की जेव्हा ही लिटमस टेस्ट पुरेशी नसते. किंवा मोटिव्ह जरी आपला क्लिअर असेल तरी अंदाज चुकतात, निर्णय चुकतात.. उदा. महाभारताचे युद्ध जरी पांडव जिंकले तरी त्याला अमृत विजय म्हणत नाही कारण तो साजरा करायला नात्यागोत्यातील कुणीच बाकी नव्हते. अशा प्रकारचे कृत्य झाले की सामील असलेले सारेचजण दुखी झाले … एक गमतीदार उदाहरण म्हणजे, जर एखाद्याला दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवायचे असतील, तिच्या संमतीने, जिथे दोघांनाही आनंदच मिळणार आहे, तर ह्यामधे नक्की चूक काय? मोटिव्ह चुकीचा नाही. कुणाला त्रास नाही. अशा वेळेस एकच शेवटची टेस्ट म्हणजे "खंत" किंवा "REGRET" म्हणजे तुम्ही खोटे बोलल्यामुळे, एखादी गोष्ट केल्यामुळे, किंवा वागल्यामुळे जवळच्या किंवा दूरच्या भविष्यात पश्चात्ताप करायची वेळ येऊ शकते का? मग ते चुकीचे आहे. तात्कालीक जरी छान वाटत असेल, कितीही आनंददायक वाटत असेल तरी त्याचे दुरागामी परीणाम क्लेशदायक आहेत. हे टाळले पाहिजे!
ही आहेत मूल्ये! जी शास्वत असतात. Thousand Shades of Gray असे काही नसते. मूल्य ही मूल्य असतात, अमूल्य असतात, आणि कशानेच त्यांच्याशी तडजोड होत नाही. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह.. अशी अनेक मूल्य आहेत. करूणा हे परममूल्य आहे. ते जाणून घ्यायच्या, आचरणात आणण्यासाठी साधना करावी लागते. म्हणजे जप-जाप्य नव्हे. आचरणशुद्धी. साधनशुचीता. अपरिग्रह आणि संयमाचे अनंतकोटी महत्व आहे.
आता "मूल्य" अदृश्य विषय आहे. लॅबमधे सिद्ध करता येत नाही. आणि त्याचे शास्त्र म्हणजे अध्यात्म! म्हणून मी श्रद्धाळू आहे, पण विवेक देखील जागृत आहे... अंधश्रद्धाळू नाही..

डायबिटीज वर हमखास परिणाम. त्या सोबत सांधेदुखी, अंतर्गत सूज, विषद्रव्याचे DeTox, एकूणच शारीरिक शक्ती, ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रॉल, वजन कमी करणे अशा विविध बाबींवर खूप आश्वासक परिणाम मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून detox जोरदार चालू. 24 तासात सांधेदुखीवर सखोल परिणाम. 8 दिवसात एनर्जी लेव्हल मध्ये आश्वासक फरक. वापरून प्रत्यक्ष अनुभव घ्या..
100% नैसर्गिक काळी हळद. मेघालयातील आदिवासी पाड्यातून मागवले "सिंगल ओरिजीन" खात्रीचे काळ्या हळदीचे कंद. ह्यामध्ये 28% कापूर असतो हे कुणालाच माहीत नाही. सर्व कंपन्या हे कंद 30-40 मिनिटे उकडून परत उन्हात सुकवून प्रोसेस करत आहेत. ह्यामुळे ह्यातील कापूर व इतरही सर्व औषधी घटक तत्काळ उडून जातात. बाकी राहते ती निरुपयोगी पावडर. म्हणून परिणाम मिळत नाही. आषाढी मध्ये आपण हे कंद उकडत नाही. स्वच्छ धुऊन घेतो, त्याचे पातळ काप करतो आणि ते आपण स्वतः डेव्हलप केलेला हिट एक्सचेज ड्रायर मध्ये निर्जलीकृत करतो. ह्यासाठी तापमान 50 डिग्री पेक्षा कमी राखून हवेतील आर्द्रता सातत्याने काढली जाते. ह्यामुळे विशेष उष्णतेचा वापर न करता सर्व पाणी काढल्यामुळे काळ्या हळदीचे औषधी गुणधर्म आहे तसेच राहतात. ते बाष्पीभवन होत नाही, जळतही नाही, उडून जात नाही. ते सारे पोषण तुम्हाला आहे तसे मिळते. ह्या पावडर मध्ये गरम पाणी घातले की सर्व औषधी घटक अँक्टिव्हेट होतात आणि तुम्हाला 100% नैसर्गिक उपचार मिळतो...
