-30%

उकडा वालई तांदूळ (Parboiled Walai Rice)

Original price was: ₹250.Current price is: ₹175.

1Kg Pack

“Parboiled Walai” is a innovative rice by Aashadhi Ventures. As name suggest it’s parboiled native variety of red rice. Very healthy, detoxifying and naturally cooling. This rice has the ability to provide quick energy, regulate and improve bowel movements, lower body heat and detox digestion track. Regular consumption helps in stabilising blood sugar level and also slows down the ageing process. It is also a natural source of “Vitamin B1” which is essential for the human body.

Description

उकडा वालई तांदूळ (Parboiled Walai Rice)

* वालई हे सर्वोत्तम लाल भाताचे वाण *
** उकडा ही भातापासून तांदूळ तयार करण्याची दर्जेदार प्रक्रिया **
*** आणि वालई उकडा म्हणजे सर्वात दर्जेदार उकडा लाल तांदूळ ***

 

वालई हा तांदूळ वालय (मूळ उच्चार : वालई) नावाने कोकणात आढळतो. लाल तांदूळ किंवा पोह्यांसाठी ही सर्वोत्तम जात. हा तांदूळ उंच वाढतो आणि ह्याच्या तृणांकुरामधे सत्व पटकन उतरते. ह्यामुळे ह्याच्या लोंब्या जड होतात व मोडून पडतात. ह्यामुळे ह्याचे खूप उत्पन्न फुकट जाते. त्यामुळे कोकणात देखील अत्यंत मर्यादीत प्रमाणात, अपवादानेच ह्याची शेती आढळते. पण हे भाताचे मूळ वाण असून ह्यामधे अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळतात. ह्या तांदळामध्ये जलद ऊर्जा प्रदान करण्याची, आतड्यांच्या हालचालींचे नियमन आणि सुधारणा करण्याची क्षमता आहे. ह्याच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते आणि वार्धक्याची प्रक्रिया देखील मंदावते. तसेच मानवी शरीराला अत्यावश्यक असे "व्हिटॅमिन बी १" चा हा नैसर्गिक स्रोत आहे. म्हणूनच ह्या वाणाला सर्वश्रेष्ठ वाण समजतात. वालई तांदूळाच्या ब्रानमधे एक अद्भूत गुणधर्म आढळतो. तो म्हणजे हा तांदूळ पचनसंस्थेच्या मार्गाने जात असताना जठर, यकृत, आतड्यामधील टॉक्सीन्स शोषून घेतो व मलावाटे बाहेर टाकतो. पचनसंस्थेच्या शुद्धीकरणाची ही नैसर्गिक प्रक्रीया आहे. केवळ भात खाऊन तुम्ही पंचकर्म करू शकता असा थोडक्यात परीणाम आहे.

“उकडा” हे तांदळाच्या जातीचे नाव नाही. शेतातून काढलेले धान म्हणजेच सालीसकट भात विशिष्ट पद्धतीने पाण्यात भिजवून किंवा गरम करून, वाफ देऊन अथवा अंशतः शिजवून नंतर वाळवला जातो. त्यानंतर त्याची साल काढून जो तांदूळ मिळतो त्याला *उकडा तांदूळ* म्हणतात. इंग्रजीमध्ये यालाच *Parboiled Rice* म्हणतात. उकडण्याच्या प्रक्रियेत धानाच्या बाहेरील भागातील काही पोषक घटक दाण्याच्या आतील भागाकडे जाण्यास मदत होते. त्यामुळे अतिपॉलिश केलेल्या साध्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत उकडा तांदूळ पोषणाच्या दृष्टीने सरस ठरतो. त्याचा रंग किंचित तांबूस, पिवळसर किंवा क्रीमसर असू शकतो. शिजवल्यानंतर त्याचे दाणे तुलनेने घट्ट राहतात आणि त्याला एक विशिष्ट खमंग चव असते.

 

कोकणात शरीरातील अतिरीक्त उष्णतेवर मात करण्यासाठी उकड्या तांदळाची पेज हा पारंपरीक आणि सिद्ध पर्याय होता. डॉक्टर देखील हे आवर्जून आपल्या उपचारात सामील करत...
.. आणि वालईचे भात झुंजीच्या बैलांना खायला घालत, कारण त्यामुळे टक्कर सहन करण्याचा कणखरपण येत असे. तसेच बाळंतीणीला झीज भरून निघण्यासाठी वालईची पेज देत असत!
आता जर तुम्ही उकड्या वालईची पेज दिवसातून दोन वेळेस घ्यायला सुरूवात केली तर?? तुमच्या शरीरातील उष्णतेचा निचरा होईलच पण शरीर पूर्णपणे डिटॉक्स होईल व कणखरपणा येईल!
निवळ ची Quick रेसिपी (1 माणसासाठी)
४-५ चमचे वालई किंवा उकडा तांदूळ घ्या. तो चांगला धुवून मग कुटून किंवा भरडून घ्या. त्यात 2 ग्लास पाणी घालून मिडीयम गॅस वर उकडत ठेवायचे. मीठ घाला. नेहमीपेक्षा थोडे जास्त मीठ घाला. वरून झाकण घाला आणि वाफेचा जोर आला की त्या झाकणावर पाणी घालून ठेवा म्हणजे तांदूळ पटापट शिजतो. साधारण 8-10 मिनिटात शिजतो. मग तांदूळ चमच्याने क्रश करून घ्या. ह्यातले जे वरचे पाणी असते ते निवळ आणि ह्या पूर्ण प्रकाराला पेज म्हणतात. पूर्ण पेज घेत चला, नुसता निवळ नको. फारतर शेवटी राहिलेला भात नाही खाल्ला तर चालतो. पण वालई असेल तर पूर्ण पेज प्या.
ह्याला फ्लेवर देण्यासाठी ह्यात वाटाणे, गाजर, फरसबीचे तुकडे घातलेले छान लागतात. ज्यांना आवडते ते ह्या भाज्या आणि तांदूळ तुपावर परतून घेऊ शकतात. फ्लेवर येतो. ज्यांना हे एकदम कॉन्टिनेन्टल वाटतं ते थोडे लिंबू, मिरपूड, कोथिंबीर असे वरून घालू शकतात...
May be an image of text

Additional information

Weight1 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उकडा वालई तांदूळ (Parboiled Walai Rice)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Are you human? Please solve:Captcha