
कुणालाही लॉजीकली पटणार नाही असा विषय आहे… पण कसा योगायोग पहा, मी आणि माझा खास मित्र, पार्टनर आणि आषाढीमधील सहसंस्थापक विनोद कावळे असे आम्ही दोघेही काळ्या हळदीच्या विषयात गेल्या वर्षीच्या (२०२५) सुरूवातीपासून सामील आहोत. ह्याची सुरूवात झाली केरळ दौऱ्यापासून आणि अलप्पी हळदीपासून. अलप्पीचे वाटप करता करता आम्ही येऊन ठेपलो काळ्या हळदीवर. खूप वाचन केले, अभ्यास केला.. एका सोर्सच्या माध्यमातून थेट मेघालयमधे कॉन्टॅक्ट काढला आणि सँपल काळी हळद मागवली. विवीध प्रकारे चेक केली. काळ्या हळदीच्या प्रॉपर्टीज काही औरच आहे. अनेक सोशल मीडिया इंफ्लुएंसर घोर अज्ञानातून काळ्या हळदीमधे कुर्कुमीन कसे सर्वाधीक आहे असे सांगून मग त्याच्या औषधी उपयुक्ततेच्या वाट्टेल त्या कहाण्या बनवत आहेत.

काळ्या हळदीमधे कुर्कुमिन चे प्रमाण ०.०४% इतके कमी म्हणजे नगण्य आहे. पण काळ्या हळदीचे एकूणच कंपोजिशन इतके पॉवरफूल आहे की विषबाधेसारख्या विषयात देखील काळ्या हळदीचा वापर करतात, अगदी आधुनिक विज्ञानात देखील. आम्ही केलेल्या प्रयोगात डायबिटीज, वेट लॉस, स्नायुदुखी अशा अनेक विषयावर आम्हाला काळ्या हळदीचे चमत्कातीक म्हणावे असे रिझल्ट मिळाले आहेत… त्यादृष्टीने वैज्ञानिक रित्या योग्य प्रकारे प्रोसेस केलेली काळ्या हळदीची पूड आम्ही आषाढीच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे आणि केवळ २ महिन्यात ३०० हून अधिक लोकांनी ह्याचा फायदा घेतला आहे…
काळ्या हळदीच्या वैद्यकीय फायद्यांसोबतच दुसरा महत्वाचा विषय तिचे अध्यात्मिक महात्म्य आणि त्याभोवतालचे रहस्य! अनेक इंफ्लुएंसर ह्यावर वाट्टेल ते सांगत आहेत. जादूटोणा, ग्रहबाधा, करणी-मूठ, दाभण वाकडी होते, काळा साप येतो, धनवर्षाव होतो इ इ. काळी हळद म्हणून अक्षरश: आल्याची मुळे देखील शाईत बुडवून, सुकवून लोकांना विकत आहे. काही महाभागांनी स्वत:च स्वत:चे संशोधन केंद्र काढून लोकांना अभिमंत्रीत केलेली हळद विकायला सुरूवात केलेली आहे. मुळात अभिमंत्रीत केलेले काहीच कधी विकता येत नाही हा अध्यात्मशास्त्राचा मूळ प्रघात आहे. आणि जनसामान्यांना ह्याची कल्पना देखील नाही. खूप फसवणूक चालू आहे. त्या सर्वावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेख.. त्यापूर्वी एक अनुभव पहा..
वर उल्लेख केल्याप्रमाणे विनोद आणि मी काळ्या हळदीशी निगडीत विवीध विषयांमधे गेल्या वर्षीपासून सक्रीय झालो. हौस म्हणून आपापल्या घरी लागवड देखील केली. त्याला गेल्या वर्षी व्यवसायात प्रचंड यश मिळाले. आधीच्या वर्षीच्या अडिजपट. आणि अनपेक्षीतपणे अनाकलनीय स्त्रोतामधून प्रोजेक्ट मिळत गेले. खरेच अविश्वसनीय असे. माझी काही लांबलेली कामे पटापट झाली. नायजेरीया प्रकरण परत चालू झाले… एकूणच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बरीच अनपेक्षीत प्रगती जाणवत होती… आम्ही गाड्या घ्यायचे ठरवले. खरेतर त्याला दिवाळीत घ्यायची होती. पण आम्ही मुद्दाम डिसेंबर पर्यंत थांबायचे ठरवले. आम्हाला ग्रिन किंवा रेड कलरची गाडी घ्यायची होती. पांढरी घेणार नाही हे पक्के ठरलेले. आधी त्याने बुक केली. CNG टॉप मॉडेल त्याला एकच गाडी शेवटची होती जी चांगल्या घवघवीत ११०,००० च्या डिस्काऊंटने मिळाली.. ही ती उजवीकडील एक्सटर गाडी. तो रंग “स्टारी नाइट” म्हणजे डार्क निळा-काळा असा आहे.. मला तर तो रंग देखील नको होता.. मी तर हिरव्या रंगासाठी खूप प्रयत्न केले.. आणि मला पांढरी सोडून एक्सटर मिळेचना. आणि पांढरी तर घ्यायची नव्हती.. शिवाय कुठल्याही परिस्थितीमधे मला ३१ तारखेला गाडी हवी होती कारण ती भागवत एकादशी होती..

शेवटी त्या हुंडाईच्या मॅनेजरनेच खूप मशक्कत करून मला हल्लीच लॉच झालेली वेन्यू आणून दिली.. काळीच आहे.. पण गम्मत अशी की माझा ओळखीत जितके सारेजण आहेत त्यांना आश्चर्य वातले की वेन्यूची डिलीव्हरी कशी मिळाली? कारण अनेक जण दोन महिने वेटींगवर आहेत.. माझा एक मेहुणा हुंडई डीलरशीपमधे कामाला आहे. त्याचा विश्वासच नव्हता बसत. त्याने फोटो पाहिजे तेव्हा त्याचा आश्चर्याचा धक्का बसला… आम्ही तिचे नाव देखील “काली” असेच ठेवले आहे.. मी कधी काळी गाडी वापरेन असे वाटले नव्हते.. एकूणच हा “योगायोग” खूप धमाल आहे..
ज्याना हे योगायोग वाटतो ते असूदे. मला काही त्यावर वाद घालायचा नाही. मी देखील center right विचारसरणीचा आहे. त्यामुळे माझा ह्या दैवी गोष्टींवर फार विश्वास नाही. पण जेव्हा आपल्या बाबत काही अनपेक्षीत घडते तेव्हा आपण त्याच्या खोलात जायचा प्रयत्न करतोच ना. त्यातून मी काही अधिकारी व्यक्तीशी ह्याबद्दल सविस्तर चर्चा केली. मला देखील माझा गुरूंच्या कृपेने अध्यात्मिक क्षेत्रात थोडी गती आहे. थोडे वाचले. आणि मग अनेक गोष्टींचा उलगडा झाला…
काळ्या हळदीबाबत आजवर कुणालाही माहित नसलेले अध्यात्मिक सत्य जे तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येते ते हे की काळ्या हळदीमधे २८% पर्यंत “कापूर” आहे. आणि त्याची नैसर्गिक रचना अशी आहे की वैद्यकीय दृष्ट्या आणि अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी बनते. कापूरचे जसे अनेक वैद्यकीय आणि अध्यात्मिक फायदे आहेत ते सारे आणि अजूनही अनेक काळ्या हळदीचे आहे. हीला नरकाचूर असेही म्हणतात. “नरक” ह्या शब्द ती जमीनीखालील मूळ असल्याने आहे. त्याचा नकारात्मक अर्थ घेऊ नका. पण जमीनीखालील अत्यंत प्रभावी अशी ही वनस्पती वातावरणची शुद्धता, सर्व नकारात्मक शक्तींचा नाश, स्ट्रेस-टेंशनचा नाश करून विवीध प्रकारे शांतता, समृद्धता प्रसान करते.
आणि सर्वात महत्वाचे, ह्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही. काळ्या हळदीचे कंद एकतर देवघरात ठेवा, किंवा कपाटात-तिजोरीत ठेवा, घरात प्रत्येक खोलीमधे एक ठेवा (दिशेचा काही फरक पडत नाही), व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफीसटेबल/केबिनमधे ठेवा आणि परीणाम पहा. वाटल्यास एखाद्या कुंडीत लावा आणि रोज थोडे थोडे पाणी घाला म्हणजे त्याला कोंब फुटतील आणि काळ्या हळदीची रोपे येतील. छान दिसतात. मधली शीर जांबळट काळी असते..
अनेकवेळेस आपले काम अगदी व्हायला आले असते आणि शेवटचे थोडे बाकी असते.. पण होतच नसते.. कुठली तरी नकारात्मकता मधे अडथळे आणत असते. किंवा भरल्या चांगल्या घरात अकारण वाद-भांडणे होत असतात, शांतता मिळत नाही, सारे चांगले चालू असताना देखील सतत काही भितीचे सावट असते, चिंता-भुणभुण असते.. अशा वेळेस काळी हळद छान काम करते. अनुभव घेऊन पहा..
कुठल्याही जादूटोण्याचे समर्थन नाही. काळी हळद लावल्याने तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडणार नाही की लॉटरी लागणार नाही की अचानक नशीब उघडणार नाही. कर्म अटळ आहे आणि प्रचंड यश मिळवायला तर कर्माचा डोंगर उभा करावा लागतो. त्यात काही डिस्काऊंट होत नाही. पण प्रचंड कर्म करूनही कधीकधी नशीब आडवे येते किंवा एखादी नकारात्मकता, कुणाची तरी हाय-द्वेष-असुया आपल्याला मागे खेचत असते, अशा वेळेस काळ्या हळदीचे कंद सोबत असणे हा मोठा प्लस असू शकेल..
मला आलेले प्रत्यक्ष अनुभव आणि त्यावर अभ्यास करून हे विवेचन मी दिलेले आहे. कुठल्याही बुवाबाजी आणि जादूटोण्याचे समर्थन नाही. तुमच्या भावनेचा, श्रद्धेचा बाजार होऊ नये ह्यासाठी काळ्या हळदीचे अस्सल-खात्रीचे आणि जिवंत कंद सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत. ऑनलाईन ऑर्डर करा.


