
🚩 आषाढीमधे काळ्या हळदीचा प्रयोग करताना काही धोरणे पक्की होती –
1️⃣ अपघाताने कळलेला हा विषय कुठलेही “गुपित” न ठेवता सर्वांसाठी खुला करायचा, नफेखोरी करायची नाही. आम्ही हळद कुठून घेतो इथपासून ते कशी प्रोसेस करतो इथपर्यंत सर्व माहिती सर्वांसाठी खुली आहे.
2️⃣ केमिकलचा वापर कुठल्याच स्वरूपार करायचा नाही. ना प्रोसेस करण्यासाठी, ना टिकवण्यासाठी, ना कृत्रीम रंग/चव इ. साठी. मूळ नैसर्गिक घटक जसा आहे तसाच ठेवायचा. म्हणून बॅच नुसार हळदीच्या रंगात बदल होत असतात. कदाचीत चव/वास देखील थोडा बदलू शकेल. पण ह्यामधे एकसमान रिझल्ट मिळावे ह्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही. काळी हळद जशी आहे तशी.
3️⃣ किंमत सर्वांना परवडणारी असावी, तरी स्केल करताना कंपनी अडचणीत येऊ नये. ह्यासाठी दुसऱ्या बॅचमधे जेव्हा कंदांची किंमत वाढली तेव्हा किमतीत फक्त ३०/- चा फरक केला आहे. आता नविन बॅच जी एप्रिलमधे मागवत आहोत तिथे देखील २०-२५ चा फरक पडायची शक्यता आहे. मेघालयमधे आम्हाला ज्या रेटने ऑक्शन पडतो त्याचा थोडा फरक पडतो. शिवाय प्रत्यक्ष प्रोसेसमधे काही हळदी जास्त ओल्या असतील तर त्याचा उतारा कमी मिळते. हल्ली चालू असलेल्या ह्या युद्धामुळे ट्रांन्सपोर्टेशनमधे देखील फरक पडतो आहे.
4️⃣ डायबिटीजवर जशी औषधांचा वापर आपल्याला बंद करायचा आहे तसाच काळ्या हळदीचा वापर देखील आयुष्यभर करायचा नाही. माझा अंदाज जास्तीत जास्त ६ महिन्यात आपल्याला औषधे आणि काळी हळद असे दोन्ही कायमचे बंद करता यायला हवे.
5️⃣ धंदा व्हावा ह्यासाठी खूप औषधे गळ्यात मारायची नाही. जर एकाच हळदीच्या प्रयोगाने काम होत असेल तर तितकेच करायचे. ह्याला क्लासिक मिनीमलिस्ट ॲप्रोच म्हणतात व मी स्वत: ह्याचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला स्वत:ला खूप औषधे घ्यायला, खूप प्रमाणात औषधे घ्यायला आवडत नाही, म्हणून मी कुणाला सांगतही नाही. इनफॅक्ट हेल्पलाईनवर देखील जर कुणी औषधाची खात्री, किती वेळ लागेल असे विचारले तर मी सरळ औषध घेऊच नका म्हणून सांगतो. “संशयात्मा विनश्यती” हे खरे आहे. तुमचाा विश्वासच नसेल तर नाही परीणाम मिळणार! शिवाय मूळ प्रयोगात फक्त काळी हळद सोडून काहीच नाही. अक्षत घ्या हे मी सर्वांना सांगतो पण ते एकूणच फायदा व्हावा ह्यासाठी. ते देखील कुणाला मार्केटींग वाटत असेल आणि नाही घेतलात तर मी अजिबात आग्रह करणार नाही. खरेच मला नाही आवडत लोकांना खूप औषधे घ्या असे सांगायला..
🪻 काळ्या हळदीचा प्रयोग 🪻
सर्वात आधी, मी डॉक्टर नाही. त्यामुळे ह्या प्रयोगाला कुणीही डायबिटीजवर इलाज म्हणून नये, खात्रीची अपेक्षा ठेवू नये.. आम्ही मुळात काळी हळद गेल्या वर्षी लॉन्च केली तेव्हा ती स्ट्रॉंग डिटॉक्स आणि जनरल रिकव्हरीसाठी. आणि तेव्हापासून आम्ही हे निक्षून सांगत आहोत की ही “बया” अतिऔषधी आहे, वापर अत्यंत कमी प्रमाणात आणि जपून करा. यथावकाश हिचे डायबिटीजवर परीणाम मिळाले आणि आपसूकच काळ्या हळदीच्या ह्या प्रयोगावर येऊन पोचलो. काळ्या हळदीसारखे चमत्कारीक पदार्थ जर सकारात्मक लोकांच्या हाती लागले तर किती मोठे काम सहज होऊ शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे…
🎯 डायबिटीजवर काळ्या हळदीच्या प्रयोगाची उद्दिष्टे –
- 1️⃣ तुमची फास्टिंग आणि पिपी तात्काळ कमी करणे. ह्यामुळे तुमच्या शरीरांतर्गत असलेला इंसुलिन रेजिस्टंस कमी होतोय का हे कळते. मग तुम्हाला एनर्जिटीक वाटणे, सांधे दुखायचे कमी होणे वगैरे अनेक परीणाम आहेत..
- 2️⃣ स्वादुपिंड, किडणी, लिव्हर ह्या तिघांचेही डिटॉक्स करून रिजुवनेशन करणे ज्यामुळे ते परत पूर्ण क्षमतेने काम करतील.
डायबिटीज होतो तेव्हा होते काय की, कुठल्यातरी कारणाने, मुख्यत्वे प्रदुषण, जंक फूड, स्ट्रेस आणि कमी झोप ह्यापैकी एक किंवा ह्या सर्वांच्या एकत्रीत परीणामामुळे तुमच्या स्नायु व सांध्याच्या पेशी रक्तवाहिनी मधील साखरेचे शोषण कमी करतात व ती साखर रक्तात साचून राहते. ह्याला कारण प्रत्येक पेशीवर असलेले इंसुलिन रिसेप्टर (🧬) काम करणे बंद करतात. इंसुलिनमुळे साखर पेशींमधे शोषली जात असते, पण हे रिसेप्टर बंद पडल्यामुळे साखर रक्तात साचून राहते. अशाने स्वादुपिंड अजुन इंसुलिन प्रवाहीत करतात जे करताना त्यांच्यावर ताण येतो. इथे रिसेप्टरच बंद असल्याने साखर काही शोषली जात नाही आणि शरीरांतर्गत इंसुलिनसाठी विरोध तयार होतो! हा आहे डायबिटीज. जसे इंसुलिन हा हार्मोन आहे तसाच दुसरा आहे कोर्टिसोल जो देखील इंसुलिनचा विरोधी हार्मोन आहे. कमी झोप आणि स्ट्रेसमुळे कोर्टिसोलचे प्रमाण वाढत जाते जो इंसुलिनचा विरोध वाढवतो आणि डायबिटीज सिरीअस होत जातो..
🍭 साखर रक्तात शोषली गेली नाही तर –
🦵 पहिला परीणाम सांधे आणि स्नायु. दुखायला लागण्यापासून सुन्न पडणे, फ्रोजन शोल्डर इ इ.
😤 थकवा जाणवतो कारण साखर शोषली जात नसते, एनर्जि वाटतच नाही
👅 खूप तहान लागणे, कारण रक्त घट्ट होते आणि पाणी प्यायल्यामुळे किडणीवर ताण येतो
🤕 जखमा भरत नाही
🧠 हातापायात मुंग्या येणे. पायाचे तळवे सुन्न पडणे, आग होणे इ. कारण डायबिटीज तुमच्या नर्वस सिस्टीमवर खोलवर परीणाम करतो. कमांड, सेंसरी आणि ऑटो अशा तिन्ही नर्वस सिस्टीम अडचणीत येतात आणि ह्याचे परीणाम आपल्याला मेंदूवर थेट जाणवतात
👁️ दृष्टी कमजोर होते कारण त्या स्नायुंच्या पेशींवर सखोल परीणाम होतो.
🫀 हृदय! ब्लॉकेजेस पासून हार्ट अटॅकपर्यंत सर्व काही..
🔥 डायबिटीज अगदीच हलक्यात घेऊ नका! आधी काळ्या हळदीशी मैत्री करा आणि डायबिटीजसोबत लढा.. 🔥
🍁 प्रयोग एकदम सोपा आहे 🍁
- दररोज सकाळी ब्रश करून झाले की
- पाव कप चांगले गरम पाणी घ्यायचे,
- त्यात नाष्त्याच्या पाव चमचा किंवा आम्ही दिलेला अर्धा चमचा किंवा एक ग्रॅम इतकी काळी हळद पावडर घालून चांगले ढवळायचे. एक मिनीट थांबायचे कारण ती ॲक्टिवेट व्हायला हवी. मग ती गरम असतानाचा पिऊन टाकायचे. पाव कप पाणी ह्यासाठी की ते एक दोन घोटात संपते. त्यावर वाटल्यास पेलाभर पाणी प्या पण ते देखील गरम असायला हवे. अर्धा तास काही खाऊ-पिऊ नका. नंतर तुमची नेहमीची दिनचर्या चालू करा.
- 🫚 🏴☠️ आयुर्वेदिक औषधे चालू असतील, प्रेगनंट असाल, हॉस्पिटलमधे असाल, सिरीअस मेडिकल कंडीशन असेल व ऑब्जर्वेशनमधे असाल तर “काळी हळद घेऊ नका”. प्रश्नच विचारू नका, ह्या कंडीशनमधे डॉक्टर जे सांगेल तेच करायचे आहे.
- 🩺 💊 ॲलोपॅथी औषधे चालू असतील ती बंद करायची नाही. जेव्हा तुम्ही फास्टिंग १०० च्या जवळपास येते तेव्हा डॉक्टरला दाखवा आणि औषधे चालू की बंद हे त्यांना ठरवूदे.
🔴 हा प्रयोग करण्यापूर्वी एकदा फास्टिंग, पिपी आणि HBA1c चेक करा.
🟠 जर तुमची फास्टिंग शुगर १५०-१७० च्या रेंजमधे असेल तर काळी हळद घ्यायला सुरूवात करा आणि १०-१२ दिवसांनी परत चेक करा.
🟡 १८०-२०० च्या रेंजमधे किंवा जास्त असेल तर २०-२२ दिवसांनी चेक करा.
🟢 जर शुगर ९०-११० रेंजमधे आली तर किमान ८ दिवसांचा ब्रेक घ्या. लक्षणात काय फरक जाणवतो पहा. जर त्रास होत नसेल तर ब्रेकचा कालावधी वाढवू शकता
🟣 पुढील टेस्टमधे शुगर किती वाढते ह्याचे निरीक्षण करून परत १० किंवा २० दिवसांचा प्रयोग करू शकता.
🔵 ब्लड टेस्ट घरी केली तरी चालेल.
🟤 साधारण दोन महिने प्रयोग केल्यावर तुमचे तुम्हाला जाणवेल की कितपत फरक पडतो आहे.
⚫️ हे करताना पथ्य सोडून पाहण्यासारखे प्रयोग करू शकता. छोट्या प्रमाणावर करा आणि अनुभव घ्या. सर्व अनुभव, टेस्ट, पथ्य हे तारखेनुसार नोंदवा. म्हणजे परीणाम स्पष्ट होतील.
- 🚩 आम्ही तुम्हाला काळी हळद दिली आहे पण आजारातून तुमचे तुम्हालाच बाहेर पडायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे सिरीअसली करावे लागणार आहे..
- 🚩 वरील प्रयोगाशिवाय काहीही महत्वाचे नाही. हळदीसोबत दालचिनी पावडर, अक्षत, मिरी असे काहीही घेणे अपेक्षीत नाही. सारे ऑप्शनल आहे. घेतलात तर कदाचीत थोडा फायदा होईल. एक मुळात लक्षात घ्या की काळी हळद स्वत: पेशींमधे शोषली जात नाहीये. ती रिसेप्टर ॲक्टिवेट करते आहे. त्यामुळे सोबत इतर काही घ्यायची गरज नाही असे मला वाटते.
🎷 वैयक्तिक मार्गदर्शन शक्य नाही 🎷
ह्याशिवाय ज्या वैयक्तिक शंका आहेत त्याबद्दल दर वेळेस मार्गदर्शन करणे शक्य नाही. उदा. सांगतो. काही सहकारी असे आहेत ज्यांची फास्टिंग ही पिपीपेक्षा जास्त असते. ते मला विचारतात की आम्ही काय करू? मी ह्याचे उत्तर देऊ शकत नाही कारण मी डॉक्टर नाही. मी ३ वेगवेगळ्या डॉक्टरांशी ह्याबाबत बोललो. दोघांनी सरळ विषय झटकून दिला की, आम्ही सरळ डोस वाढवतो किंवा स्टेरॉईड देतो. एका तज्ञ डॉक्टरांनी मात्र चांगले मार्गदर्शन केले की ही एक प्रकारच्या ऑटोइम्युन डिसीजची सुरूवातीची लक्षणे आहे. इथे हा विषयच पूर्णपणे बदलतो. ऑटोइम्युन ही इतकी कॉम्प्लेक्स साईड आहे की ॲलोपथीलाच अजून त्यातली अनेक तथ्य उलगडायची आहेत. प्रत्येकजणे वेगळ्या प्रकारे ते हाताळतो आहे. मग असे विषय मी कसे हाताळू तुम्हीच सांगा.. मला हे माहित आहे की ऑटो इम्युन केसेसमधे अक्षतचा फायदा होणार, पण मी ह्याची खात्री देऊ शकत नाही कारण मी डॉक्टर नाही आणि मला त्यातले काहीच कळत नाही. शिवाय तुम्हाला ते मार्केटींग वाटू शकते, त्यामुळे मला त्यात पडायचेच नाही..
🥥 अक्षत आणि झोप 🥥
डायबिटीजमधे इंसुलिन आणि कॉर्टिसोल हे दोघेच खेळत आहेत. ह्यावर मी खूप सविस्तर लिहीणार आहे पण आत्ता खूप कंटाळा आला आहे. तुम्ही insulin resistance आणि cortisol ह्या बद्दल गुगल AI ला विचारा. तुम्हाला खूप माहिती मिळेल. आणि झोपेचे महत्व लक्षात येईल. fight or flight पासून ते restful sleep पर्यंत सारे वाचा. आणि ८ तास झोपायला शिका. ते देखील निवांत. तुम्हाला स्वप्न देखील पडता नये. तुमची शुगर अशीच बरी कमी होईल. शरीराला अंतर्गत डॅमेजेस वर काम करायला पुरेसा वेळ मिळेल. अक्षत मुळात हे करते. तुम्हाला झोपही पुरवते आणि तुमच्या शरीरांतर्गत जिकडे कुठे जे काही त्रास तयार झालेले आहेत त्या सर्वांवर काम करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे तोंडात घोळवून प्यायचे आहे. इतकेच आहे ते, जास्त प्रश्न आणि शंका विचारू नका. अक्षत वापरा किंवा नका वापरू पण झोपा. विश्रांती खूप आवश्यक आहे. आणि ६ तास नाही. ७-८ तास..
वरील सर्व माहिती परत परत वाचा आणि दृढ निश्चय करा की आपल्याला डायबिटीजला पूर्णपणे घालवायचे आहे. काळी हळद फक्त निमीत्त आहे, तुमचा निर्धारच खरे काम करणार आहे! शुभं भवतू!
जर नरकाचूर हळद अजून ऑर्डर केली नसेल तर खालील लिंकवर तुम्ही ऑर्डर करू शकता..
https://aashadhi.com/narkachur
