रात्री ८:३० वाजता चालू झालेली झूमवरील दुसरी मिटींग पावणे अकरा पर्यंत छान रंगली.. खालील प्रमाणे विवीध विषयांवर चर्चा झाली –

  1. “सर्व आयटी आणि नॉनआयटी लोकांना एकाच वेळी सामावून घेता येईल असा स्टार्टअप करता येईल का?” ही मुख्य थिम होती. ह्या अनुषंगाने मी “गावरान” नावाचा एक कंसेप्ट मांडला ज्यात स्थानिक पातळीवर तयार होणारे पण युनिक प्रॉडक्ट एका सिस्टीमॅटीक ब्रँडच्या नावाने योग्य प्रकारे मार्केट करून विक्रीसाठी उपलब्ध केल्यास सर्वांना सामावून घेईल अशी आयडीया सहज शक्य आहे..
  2. ह्या विषयाला अनुसरून एक छोटे ४ पानी बेसीक प्रेझेंटेशन मी सर्वांसमोर मांडले..
  3. ह्या प्रेझेंटेशनचा पहीला भाग म्हणजे कंपनी कशी आणि काय? एक वर्ष १००००/- प्रत्येकी असे ५० जण आपण एकत्र येऊन जर एक प्लॅटफॉर्म बनवतो.. तर केवळ १०००० गुंतवून आपल्याला ५००,००० रूपयाचा प्रोफेशनल ब्रँड प्लॅटफॉर्म एक वर्षभर वापरायला मिळतो.. जो सर्वांच्या समान मालकीचा आहे.. अशाने केवळ १०००० भरून आपल्याला ५ लाखाची रिस्क घेता येते.. जर ही रिस्क पूर्ण फसली तरी वैयक्तिक नुकसान केवळ १०००० चेच असते .. हा ह्या कंसेप्टचा, सोशल कॅपिटल चा मुख्या फायदा आहे..

    प्रत्यक्षात ह्या ५००,००० च्या सेटप मधे काहीच घडत नाही हे देखील लक्षात घ्या.. हा केवळ प्लॅटफॉर्म आहे. कार्यक्रम नाही.

  4. दुसर्या भागात आपल्यापैकीच कुणीतरी ऑथोराईज्ड व्हेंडर म्हणून जबाबदारी घ्यायची आहे. एकतर कंपनीचे शेअरहोल्डरच ऑथोराईज्ड व्हेंडर बनू शकतात.. बाकी कुणी नाही. शिवाय कंपनीची नियमावली असणार.. शिवाय ह्या व्हेंडरने स्थानिक प्रॉडक्ट व ते बनवणारे शोधून कंपनीला कळवायचे. कंपनीने ऍप्रुव्ह केले तर त्या प्रॉडक्टचे किमान काही युनिट स्वत: विकत घ्यायचे आहेत आणि मग ते “गावरान” च्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी आणायचे आहेत… “गावरान”च्या माध्यमातून विवीध प्रकारे ह्याच्या विक्रीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील..

    जितकी काही विक्री ह्या व्हेंडरच्या उत्पादनांची होईल, त्यातून होणाऱ्या फायद्याचा विशिष्ठ % थेट त्या व्हेडरला मिळेल. हे % त्याच्या विक्रीच्या स्लॅबवर अवलंबून असेल किंवा त्याचा काही परफॉर्मन्स बेस्ड फॉर्मुला ठरवला जाईल..

  5. तिसरी महत्वाची ऍक्टीव्हिटी म्हणजे “विक्री” … ह्यासाठी ऑनलाईन वेबसाईट आणि शिवाय पतंजली सारखे पॉकेट फ्रांचाइजी व बल्क बायर असे विवीध पर्याय वापरले जातील.. अशाने प्रोडक्ट व आपल्या ऍक्टीव्हिटी बाबत माहिती सर्वांना मिळेल व अधिकाधिक विक्री होईल असे प्रयत्न असतील. फ्रँचाइजीला व बल्कमधे प्रॉडक्ट ऑर्डर करणाऱ्यांना विशेष कमीशन/उत्पन्नाचा मार्ग असेल..

    अशा प्रकारे पहील्या पर्यायात आपण बनवलेला प्लॅटफॉर्म सर्वांना काम करायची व उत्पन्न कमवायची संधी देईल..
    आणि आपणा सर्वाची जबाबदारी असेल की ह्या प्लॅटफॉर्म व प्रॉडक्टचा प्रचार प्रसार करणे व स्वत:देखील ते वापरणे..

हा विषय चर्चा करताना अनेकांनी अनेक छान मुद्दे मांडले. FSSAI पासून ह्याचे लिगल परीणाम काय असू शकतील, अडचणी काय असतील ह्यावर सविस्तर चर्चा झाली.. आणि आज देखील होणार आहे.. सर्वांच्या सर्व शंकाचे समाधान होईपर्यत ही प्रक्रीया चालू राहील…दरम्यान प्रिऑर्डर सारख्या काही चांगल्या सूचना मिळाल्या..

तरी नंतर झालेल्या मीटिंगमधे सध्या गावरान हा मुद्दा स्थगित केला आहे. व रेघोट्या हा मुख्य विषय आहे ज्यावर काम चालू झाले आहे.

Your valuable comment please..