पाळीव कुत्र्यांच्या अंगाला अनेक कारणांनी खाज येऊ शकते .एकत्र स्किन इन्फेक्शन असू शकते किंवा आहारात सतत गोड ,मैदा बिस्किटस , मसालेदार पदार्थ मीठ वैगरे खाल्ले असेल तर ते स्किन केस गळण्यात आणि स्किन चे टेक्शचर खराब होण्यास सुरूवात होते. तसेच दूध‌ देऊ नयेत कारण पोट बिघडते व पर्यायाने एकुण केस व स्किन वर त्याचा परिणाम दिसतो.

काही कारणे खाली देत आहे…

  • शाम्पू- पेट शाम्पू बद्दल अनेक समज गैरसमज आहेत आणि आपल्या पेट ला कुठला शाम्पू सूट होईल हे चेक केल्याशिवाय शाम्पू वापरू नये . बऱ्याच पाळीव श्वानाना न चेक करता मार्केटमधला चांगल्यात चांगला महाग वैगरे शाम्पू केस व स्किन साठी चांगला म्हणुन वापरला जातो मात्र बरेचदा जर तो स्किनला सूट नसेल तर फायदा होण्याऐवजी केस गळणे वा स्किन खराब होणे हे परिणाम दिसतात.
  • आंघोळ — जनरली आठवड्यातून दोनदा आंघोळ घालावी असे डाॅक्टर सांगतात आणि पावसाळ्यात जर रोज पाण्यात लोळणे भिजणे होत असेल तर नुसत्या पाण्याने धुणे गरजेचे आहे .रोज शाम्पू वापरला तर केस आणि स्किन साठी अपाय होऊ शकतो .

आमच्याकडे पॅरा इंडी म्हणजे गावठी शेरलाॅक गेले पाच वर्षे आहे .हे दोन भाऊ गटारातून अनाथ अवस्थेत माझ्या मुलीनै आणले. आईचा थांगपत्ता नव्हता आणि घरात आणले तेव्हा पाच सहा दिवसांची डोळे बंद असलेली पिल्ले होती आणि शेरलाॅकची शेपूट गटारात उंदराने खाल्लेली होती .जखम होती .आता जगवायचे कसे आईच्या दूधाविना‌ मग आधी साफसुफ करून‌ जखमी शेपटीवर उपचार सुरू केले .जखम लवकर भरण्यासाठी घरचे खोबरेल तेलपण वापरलेच.आणि दूधाऐवजी भोपळा ,गाजर यांची पातळ पेस्ट करून पाजायला डाॅक्टरने सांगितले व त्याचबरोबर आठवड्यातून एक दोनदा अर्धा छोटा चमचा ताजै खोबरेल तेल पाजायला सांगितले‌.दोन्ही बाळे जंगली एक शेरलाॅक आजही माझ्याकडे गेली पाच वर्षे फीट आहे आणि भाऊ तेवढ्याच वयाचा मायलाॅक हा शिवडी येथे चार महिन्यांचा असताना दत्तक घेतलेला आहे

याकाळात दोन वर्षे आधी अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल ची प्रोसेस सुरू झाली आणि त्यानंतर खोबरेल ऐवजी मी शेरलाॅक साठी व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरायला लागलो‌. साध्या खोबरेल ऐवजी मी अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल शेरलाॅक साठी वापरायला‌ लागल्यावर जे परिणाम व बदल मला दिसले ते असे

  • त्याची फर म्हणजेच केस दाट झाले आणि केसांत चमक आली.
  • केस गळणे जवळपास बंदच झाले
  • स्किन टेक्श्चर खुपचं सुधारले‌. ज्या कोपरांवर ड्राय स्किन असायची ती नाॅर्मल झाली.
  • खाज येणे ,खाजविणे जवळपास नाहीसेच झाले.
  • खेळताना जखम वैगरे झाली तर आजही अक्षत स्प्रे बोटल मधे घालुन जखमेवर मारले की एक दोन दिवसात जखम बरी होतेच हा अनुभव आहे
  • पिसवा , गोचीड ,टीक्स वैगरे कधी आजवर दिसलेली नाहीत‌ कारण आंघोळीच्या आदल्या दिवशी‌ त्याला अक्षत व्हिसिओने चांगला‌ मसाज देतो

म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस आंघोळ आणि त्या आधीच्या दिवशी अक्षत मसाज असा दोनदा मसाज होतो आठवड्यातून.तसेच आठवड्यातून दोन तीन चमचै अक्षत तो पितोही .ज्याने आजवर दोन वर्षांत त्याला काही आजार तर झालेच नाहीत मात्र आईचे दूध त्याला न मिळाल्याने जी प्रतिकारशक्ती वीक‌ किंवा कमजोर झालेली ती अक्षतमधील लाॅरीक ऍसीडने भरून निघालीस व एकंदरीत हेल्थ दणकट झाली.

वर्षातून एक व्हॅक्सिनेशन सोडले तर शेरलाॅकला गेल्या दोन वर्षांत कधी डाॅक्टरची गरज पडलेली नाही.

खरोखरच परिणाम अक्षतचा मला‌ चांगला आलेला आहे… आणि चाटले प्यायले कुत्र्याने नि पोटात गेले तर तोटा सोडाच फायदाच आहे

Leave a Reply