काळ्या हळदीचे जिवंत कंद (BT Rhizomes)
Original price was: ₹300.₹250Current price is: ₹250.
काळ्या हळदीचे कंद व रोपे घरी लावली असता नकारात्मक उर्जेचा नाश होऊन वातावरण शुद्ध व पवित्र होते
Description
काळी हळद किंवा कृष्ण हरिद्रा ही हळद कुळातील सर्वोत्तम दर्जाची औषधी हळद असून हिंदू पुराणांपासून ते वेदांपर्यंत अनेक ठिकाणी हिचा उल्लेख आढळतो. हिच्या औषधी गुणांसाठी काही अनाकलनीय आजारपणात आयुर्वेदात देखील हिचा उल्लेख आहे. शिवाय आधुनिक विज्ञानाने देखील अनेक प्रकारची संशोधने करून हिचे विवीध प्रकारचे उपयोग सिद्ध केलेले आहेत. आषाढीमधेच अनेकांना डायबिटीजसाठी हिचा अत्यंत चांगला अनुभव आलेला आहे. ज्यांना डायबिटीजसाठी किंवा औषध म्हणून काळी हळद वापरायची आहे त्यानी “डायबिटीज आणि काळी हळद” हा लेख वाचा. ह्या ‘काळ्या हळदीचे जिवंत कंद’ घरोघरी लागवडीसाठी उपलब्ध करत आहोत.
काळ्या हळदीचे कंद व रोपे घरी लावली असता नकारात्मक उर्जेचा नाश होऊन वातावरण शुद्ध व पवित्र होते असा समज आहे. ह्यासाठी कुठल्याही विशेष मंत्र-तंत्राची गरज नाही. किंबहुना कुठल्याही मंत्रतंत्राने काळी हळद प्रभावीत करता येत नाही. काही पुजांमधे ग्रहबाधा, पूर्वजांचे दोष इ. टाळण्यासाठी देखील काळी हळद वापरण्यात येते. काळ्या हळदीचे कंद पुजेसाठी देवघरात ठेवले असता किंवा तिजोरीत ठेवले असता देखील चांगला अनुभव येतो असे अनेकांचे अनुभव आहेत. ह्या विषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी “काळी हळद आणि काळ्या गाड्या” हा लेख नक्की वाचा.
सध्या अनेक ऑनलाईन इंफ्लुएंसर काळ्या हळदीबाबत आणि जादूटोणा, धनप्राप्तीबद्दल वाट्टेल ते अपसमज पसरवत आहेत. काळी हळद सांगून वाट्टेल ते खोटे नाटे खूप जास्त पैसे घेऊन लोकांना देत आहेत. त्यासाठी काळ्या हळदीचे ओरीजीनल कंद आपण सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत. कुठल्याही जादूटोणा, मंत्रतंत्राच्या वाह्यात क्लेमवर विश्वास ठेवून आपल्या श्रद्धेचा बाजार होऊ देऊ नका. काळी हळद किंवा तिचे कंद घरोघरी जरूर जोपासा. पण फसवणूक करून घेऊ नका.
हे कंद मेघालयमधून मागवलेले मूळ, अस्सल कंद असून जिवंत आहेत. कंदांमधे एकदम मोठे, मध्यम आणि अगदी छोटे असे विवीध प्रकारचे कंद असतात. साधारण ६-७ चांगल्या दर्जाचे, मध्यम आकाराचे कंद ज्यांचे एकूण वजन १००-१२५ ग्रॅम भरेल असे कोकोपिट, राख आणि वर्मिकंपोस्टच्या मिश्रणात चांगले पॉटिंगमिक्स तयार करून पाठवत आहोत. ह्यामुळे कंद न सुकता, न कुजता, आहेत तसे जिवंत आणि सुरक्षीत तुमच्यापर्यंत पोचतील. हे कंद तुम्ही आहेत त्या पिशवीत रुजवू शकता. किंवा बाहेर काढून घरात देवघर व इतर निरनिराळ्या ठिकाणी ठेवू शकता.
रुजवायचे असल्यास पॅकींगची ती पिशवी काढून तिला भोके पाडा व रोज थोडे थोडे, अगदी अर्धा कप पाणी द्या. चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी पिशवी ठेवा म्हणजे तिला उब मिळायला हवी. जोवर त्यांना कोंब येणार नाही तोवत पिशवीत असूदे. कोंब चांगले वर आले आणि हिरवट दिसायला लागले, पाने फुटतील असे दिसायला लागले की तुम्ही ते कुंडीत शिफ्ट करू शकता. कोकोपिट मधून रोप जेव्हा तुम्ही जमिनीत किंवा कुंडीत शिफ्ट करता तेव्हा त्याला शॉक बसत नाही म्हणून कोकोपिट मुद्दाम वापरले आहे. आणि कोकोपिट हा सर्वोत्तम पॉटींग मीडीअम आहे.
ज्यांना देवघरात, तिजोरीत किंवा घरी/ऑफीसमधे कुठेही ठेवायचे आहेत ते हे कंद कोकोपिटमधून काढा. कोंब आले असतील तरी ते मोडू नका. एकदोन दिवस उन्हात सुकवा म्हणजे अतिरीक्त पाणी सुकून जाईल. मग ते एका चांगल्या कॉटनच्या कपड्यात गुंडाळून तुम्हाला हवे तिकडे ठेवा. मी लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे “अभिमंत्रीत” करणे हे निव्वळ थोतांड आहे. कुणीही तुम्हाला काहीही वस्तू अभिमंत्रीत करून देऊ शकत नाही. विक्री तर शक्यच नाही. हे पोटार्थी मंडळींचे चाळे आहेत. पण तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही स्वत:च घरच्याघरी कंद किंवा काहीही अभिमंत्रीत करून उजळू शकता. ह्याचा विधी अत्यंत सोपा-सरळ आहे. आणि फक्त निस्सिम श्रद्धा सोडून कसलीही गरज नाही.
कंद अभिमंत्रीत करण्याचे विधी पूर्णपणे वैकल्पिक (optional) आहे. अजिबात करायची गरज नाही. पण माहिती असावे, कधीही वाटले तर करता यावे ह्यासाठी हे देत आहे. कंद अभिमंत्रीत करण्यासाठी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसा. नेहमीची पुजा करून देवासमोर संकल्प करा की कशासाठी तुम्ही कंद अभिमंत्रीत करत आहात आणि त्यात यश मिळावे अशी प्रार्थना करा. कंद निट धुवून, पुसून घ्या. मुळे/कोंब मोडणार नाही ह्याची काळजी घ्या. मग कंदांवर उजवा हात ठेवून तुम्हाला येत असलेले गणपतीचे कुठलेही स्तोत्र म्हणा व विघ्नहर्त्या गणेशाला आवाहन करा. त्याच्यासाठी कंदांवर हळद-कुंकू व फूल घाला. तुमच्याकडे इतर कुठले पुजासाहित्य असेल तर ते देखील वापरा जसे की चंदन, अत्तर, वस्त्र इ. काहीही नसले तरी हळद-कुंकू व फूल इतकेच पुरेसे आहे. थोड्या अक्षता घाला. मग निरांजन ओवाळा. असल्यास कापूर पेटवून आरती करा, नाही केली तरी चालते. मग परत कंदांवर उजवा हात ठेवून “ॐ श्रीं नम:” हा “श्री” म्हणजे समृद्धीचा मंत्र आहे त्याचा ११ माळा जप करा. ह्याचा उच्चार “ओम श्रीम नमहा” असा आहे. श्री वर अनुस्वार आणि नम नंतर विसर्ग आहे. जप पटापट करायचा आहे. जप करताना माळ ओढायची नाहीये. त्यासाठी घड्याळ लावून १६ मिनीटे जप करायचा आहे. ज्यांना गायत्रीमंत्र येतो ते सुरूवातील एक माळ गायत्री करू शकता. सूर्याचे कुठलेही मंत्र एक माळ केलेले चालतात. अथर्वशीर्ष येत असल्यास ते म्हणा. पण हे सारे वैकल्पिक आहे. नाही केले तरी चालेल. ह्यानंतर जात जोडून देवाची प्रार्थना करा की, तुम्ही तुमच्या कामामधे कुठेही कमतरता ठेवणार नाही. सचोटीने व्यवहार कराल. त्यामुळे तुम्हाला श्रीकृपेने यश मिळावे. काही चुकले असेल तर क्षमा मागा. मग हे कंद एक दिवस उन्हात ठेवा. आणि मग तुम्हाला वाटेल असे कुठेही ठेवू शकता. जनरली देवघरात, तिजोरीत, ऑफीस किंवा धंद्याच्या ठिकाणी टेबलवर, पेढीवर ठेवण्याची पद्धत आहे. तुम्ही रुजलेले कंद देखील देवघरात ठेवू शकता. पण हळदीच्या रोपाला उन्हाची गरज असते. त्यामुळे रोप असेल तर रोज किमान ३-४ तास उन्हात किंवा भरपूर सूर्यप्रकाशात ठेवायला हवे. आपल्याला ज्या नैसर्गिक साधनापासून काही अभिलाषा आहे त्याला न दुखावता, त्रास न देता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अभिमंत्रीत करणार तर शक्यतो रुजवू नका. रुजवलेत तर मात्र ते जिवंत रोप असल्याने त्याची तशी काळजी घ्या.
घरोघरी काळी हळद लावा आणि सकारात्मकता, समृद्धीचा अनुभव घ्या..
Additional information
| Weight | 0.5 kg |
|---|---|
| Dimensions | 10 × 10 × 10 cm |







sanjeev thakur –
It’s very nice.