(37 customer reviews)

Akshat Virgin Coconut Oil

750

Quantity : 500ml

Akshat” is a 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. No chemicals or external heat is used thus all the nutrition & goodness in coconut milk is obtained in the oil as it is.

“अक्षत” हे नारळाच्या ताज्या दुधापासून काढलेले 100% शुद्ध तेल आहे जे सेंट्रीफ्यूज पद्धतीने काढले जाते. कोणतीही रासायनीक प्रक्रीया व उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील सर्व पोषण तेलामध्ये जसे आहे तसे मिळते.

Description

Akshat VCO (English)अक्षत व्हिसीओ (मराठी)
Akshat” is a 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. This is the traditional and natural process of separating cream from milk by agitation. No chemicals or external heat is used. All the nutrition & goodness in coconut milk is obtained in the oil as it is. Cold-pressed VCO available in the market is made from oven-dried grated coconut. Akshat VCO extracted from fresh coconut milk is the only artisan grade virgin oil with bioactive lauric acid, polyphenols & ketones.

Akshat VCO contains “Lauric Acid”, which is otherwise found only in breast milk & plays a key role in improving the immune system. VCO is internationally acclaimed as the “Mother of All Oils”. Being extremely light weight, VCO deeply penetrates the skin or scalp and provides long-lasting corrective effects. It is considered to be “Best Natural Medicinal Oil”

  • Akshat VCO is very rich in essential fatty acids and anti-oxidants. It helps in reversing ageing effects. It enhances internal strength & immunity. It contains MCTs that are super-rich in ketones, that prevent neuron degeneration & improve memory. The effects of VCO on Alzheimer’s & Parkinson’s are very promising.
  • Akshat VCO Increases good cholesterol & decreases bad cholesterol. In people with stressful lifestyles like software developers, salespeople, and managers, MCTs & ketones provide relief from stress and anxiety.
  • Polyphenols in Akshat VCO alleviate swelling of joints and several other inflammatory markers & provides long lasting curative effects on joint pain & Arthritis.
  • Being very light weight Akshat VCO easily penetrates deep in skin and offers a long lasting moisturising effect. Anti-fungal & antibacterial properties enhance skin & hair health to provide natural touch and tone.
  • Akshat VCO is the perfect medicinal oil for massaging infants. It penetrates deep into the skin & scalp and strengthens the bones & muscles of infants. It helps in improving the immune system. Anti-fungal & antibacterial properties form a protective shield around infants also taking care of rashes, scars due to nappies etc. Children get a restful sleep thus completing their overall growth. Just like infants, Akshat VCO is also an excellent medicinal oil for postpartum mothers for faster recovery & immunity.
    *Akshat VCO should not be given orally to kids younger than 3 yrs. It is for massaging only.

Selection of the right coconut is very critical. We use dark back ‘west coast tall’ variety coconuts only for Akshat VCO. Dwarf palm coconuts & light back coconuts are completely avoided. Nuts from WCT have thicker meat kernels. Best quality nuts give the highest quality VCO.

सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले “अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे. घुसळून दुधातून मलई (fat) वेगळे करण्याची ही पारंपारिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते. बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले अक्षत व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे.

अक्षत VCO मध्ये “बायोएक्टिव्ह लॉरिक ऍसिड” असते, जे अन्यथा फक्त आईच्या दुधात आढळते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. VCO ची आंतरराष्ट्रीय स्तरावर “मदर ऑफ ऑइल” म्हणून ख्याती आहे. अत्यंत हलके वजन असल्याने, VCO त्वचेत किंवा टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते. हे “सर्वोत्तम नैसर्गिक औषधी तेल” मानले जाते.

  • अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यात एमसीटी असतात जे केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्सवर VCO चे परिणाम खूप आशादायक आहेत.
  • “अक्षत” चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हानीकारन कोलेस्ट्रॉल कमी करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, मार्केटींग, विक्री आणि मॅनेजमेंट यांसारख्या तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या लोकांना MCTs आणि केटोन्स तणाव आणि चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.
  • व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो.
  • अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळून चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.
  • अक्षत व्हीसीओ हे लहान मुलांना मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे. हे त्वचा आणि टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि लहान मुलांची हाडे आणि स्नायू मजबूत करते. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. ह्याचे बुरशी रोधक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म लहान मुलांभोवती एक संरक्षणात्मक कवच बनवतात व पुरळ, चट्टे इ. चा कायमस्वरूपी बंदोबस्त करतात.. मुलांना शांत झोप मिळते त्यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ पूर्ण होते. लहान मुलांप्रमाणेच, अक्षत व्हीसीओ हे प्रसूतीनंतरच्या मातांची शारिरीक झीज भरून काढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट औषधी तेल आहे.
    *अक्षत VCO 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना तोंडी देऊ नये. ३ वर्षांपेंक्षा लहान मुलांसाठी हे फक्त मसाजसाठी आहे..

37 reviews for Akshat Virgin Coconut Oil

  1. रमाकांत कस्तुरे (verified owner)

    त्वचारोगावरही अक्षत अतिशय उत्तम काम करते. माझ्या तळपायावर एके ठिकाणी नेहमी खाज सुटत असे. अनेक औषधी घेऊनही उपयोग झाला नाही. नंतर अक्षत रोज चार चमचे सकाळी घेतले. आता अजिबात त्रास नाही.

  2. Smita Yelekar (verified owner)

    आईचे (वय 90) गुडघे दुखायचे.किंबहुना हाडे दुखायची.उतारवयात आता असेच व्हायचे म्हणत असे.पण अक्षत तेल प्यायला सुरुवात केल्यानंतर हे दुखणे गायब झाले.करी कधी दुखले तरी सहन करण्याजोगे असते.
    नवऱ्याचेही गुडघे दुखायचे.बाम,इतर तेलाचा मसाज यावर भर होता.अक्षत तेल प्यायला लागल्यापासून गुडघेदुखी बंद आहे.सोबत गुडघ्याचे व्यायाम चालू आहेत.

  3. Mugdha bhide (verified owner)

    Its good

  4. Dhanashree Jathar

    Nice

  5. SS

    Akshat…the VCO. Use it, then only believe it U will live forever with it

  6. Sanjay Pai

    अक्षत कोणाला काय अनुभव देईल सांगता येत नाही…
    नुकताच मी कंपनीच्या कामासाठी बाहेर होतो तिथुन एक दिवस गावच्या दौऱ्यावर होतो …ड्रायव्हर ने सावंतवाडी मार्केटमधे गाडी थांबविली आणि मेडीकल स्टोअर्स कुठे आहे विचारायला लागला.
    मी कशासाठी हवयं विचारले तर सतत ड्रायव्हिंग मुळे एका गुडघ्याकडे मांडीच्या बाजुने दुखत होते बोलला.गोळी हवी होती.
    मी बॅगेतुन अक्षत भरलेला स्प्रे काढला नी तेल तिथे फवारले व चल बोललो. गोळी खाऊ नकोस..‌…

    घरी पोहचून फ्रेश झाल्यावर परत अक्षत लावले आणि झोपताना त्याला पूर्ण पाठीच्या कण्याला माकडहाड व पायानां लावायला लावले.
    बेंबीत थैंब चार टाकुन गोल फिरवायला लावले व डोक्यावर घालुन शांत झोपायला लावले.
    दुसऱ्या दिवशी माझ्या फॅमिली नी शेरलीसह त्याने मुंबई पर्यंत ड्राईव्ह केले .कसलीही गोळी न खाता आणि दुखणे जराही लवलेश नाही .
    तो काल माझ्याकडून ४ बोटल्स घेऊन गेला…

  7. अपर्णा चोपडे

    नुकताच अक्षतचा वापर सुरू केला . दर उन्हाळ्यात मला डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, खाज सुटणे, डोळे लाल होणे असे एक ना अनेक प्रॉब्लेम गेले कित्येक वर्षे सुरू असायचे . याही वर्षी सुरू झाले, मी नेहमीचेच उपचार सुरू केले, पण फरक पडला नाही. अक्षत ट्राय करून बघावे म्हणून रात्री काजळ लावतात त्या प्रमाणे लावले. सकाळी बराच फरक जाणवला . मग दिवसभरात २-३ वेळा लावले आणि “अहो आश्चर्यम् ” केवळ १ दिवसात माझा त्रास गायब!!!

    Thanks to Akshat founders and Pai saheb for introducing us to Aashadhi Vemtures….
    Highly recommend and appreciated product Akshat VCO is!!!!

  8. Hrishikesh Jagtap

    अक्षत product खूप आवडले. Akshat is EVCO (extra virgin coconut oil)

    Akshat च्या box packet मधे आलेले pamphlet सुद्धा खूप माहितीपूर्ण आहे. So far, I have used it for :
    1. Hand massage & foot massage.
    2. तळपायातील भेगांवर औषध
    3. पोटात पण घेतो.

    I will also use it for
    4. Knee pain
    5. Dandruff in hair
    Thank you

  9. Pravin Chhapare (verified owner)

    Good

  10. Nitesh sapkal

    सर्व प्रतक्रिया नक्कीच दिलासादायक आणि प्रेरणादायी आहेत.
    मलाही एक bottle घ्यायची आहे .online चिपळूणला मिळेल का.?

  11. Swapnil

    केस गळण्याच्या समस्येवर उपयुक्त आहे का?

    • विनय सामंत (store manager)

      हो. खूपच उपयुक्त आहे..

  12. Priya Parab (verified owner)

    I am using this oil for arthritis & it is very effective. My knee pain reduced very much. Use it regularly. Thanks Akshat👍

  13. Ramesh Jaybhay

    Very Good… 👍🙏

  14. Dayesh parab (verified owner)

    सर्वात उत्तम अक्षत आषाढी ऑइल आहे

  15. Manohar kasabe

    Very nice

  16. Bhavana Valate

    दोन दिवसांपुर्वी घसरुन पडल्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली होती. मुका मार लागल्यामुळे खुप वेदनाही होत होत्या. अक्षत VCO सलग दोन दिवस पायाला लावले आणि मसाज केले. त्यामुळे दोन दिवसानंतर दुखणे कमी झाले. खरंच अक्षत म्हणजे एक वरदानच जणु 🙂
    हमखास आराम शत प्रतिशत…बहुपयोगी अक्षत😇👍

  17. D V Patwardhan (verified owner)

    Since 20+ years I was suffering from a small joints’ pain along with constipation. Last month I started taking
    VCO oil. I took one bottle completely and now I feel 100% perfect. Still I have continued
    taking the VCO oil. Now I also use it as body massage and hair oil. It is the best VCO oil
    and now I have recommended it to my collogues.

    ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी नक्कीच वापरून बघावे. कोरडी कातडी असेल तरी खूप उपयुक्त आहे.

  18. Pravin Chhapare

    एकच बाटली वापरली तर मुलाचा कोंडा थोडा फार कमी झाला आहे.

  19. Pravin Chhapare

    Excellent

  20. Prashant Madhav Joshi

    Akshat VCO is really amazing medicinal oil. Unlike other Virgin coconut oils in market it is really extra Virgin since it is prepared from coconut milk. It came as a boon in our life. After corona everyone from my family was losing lots of hair, strength was decreased a lot. Akshat VCO fixed both these problems. Our hair loss was reduced lot. And we gained a lot of strength within very few days after starting consuming it first thing in the morning. Motions were improved. My father who is 75 also started consuming Akshat consistently and his knee pain was completely vanished. Many of my friends got similar benifits due to Akshat VCO. So, I highly recommend Akshat VCO for joint pain, hair loss issues, skin and allergy issues, stress related issues. Start consuming 2 table spoons empty stomach, apply on your pain areas, scalp and skin and get enormous Health benifits. Thanks a million Ashadhi for this amazing Akshat.

  21. Sneha

    एकदम मस्त तेल..माझी मुलगी रोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी चेहर्याला vco ने मसाज करून झोपते.तीची स्कीन एकदम सुंदर झाली आहे.. आणि कुठेही धडपडून आली की औषध न लावताच vco लावते .. दोन दिवसात जखम बरी.. मोठ्या मुलीचे काही केस पांढरे झाले होते आता vco लावते तर केस काळे होण्यास सुरुवात झाली आहे. Thanks to Ashadhi for such a great product.

  22. namita gawankar

    बहुगुणी आणि अत्यंत उपयुक्त प्रॉडक्ट. केवळ २० दिवसात परीणाम दिसत आहेत. धन्यवाद आषाढी..

  23. suresh zore

    good

  24. Bhimsen Dnyanmothe

    very good

  25. Mrinalini Chavan

    Akshat VCO is really a wonderful product.
    Got very encouraging results when tried on dandruff issue on hair & dry skin infections.
    My mother had skin infection on hand. Got cured in just few days. Need to use it as a preventative measure.

  26. Vipul

    My Experience with Akshat

    Akshat has greatly reduced My Dandruff
    Good Chemical free Moisturizer for soft skin
    Good for oil pooling without weird taste
    Can be also used as Lip Balm/ Lip Moisturizer
    Good for oral consumption

    Akshat is really a one oil with Multiple Benifits

  27. पंकज जाधव

    माझा अक्षत VCO अनुभव,
    1. मला थंडीत moisturizer म्हणून बिनधास्त वापरतो. याचा अंगाला वास सुधा येत नाही. आणि आत्ता confidence एवढा वाढला आहे की इतर मोसमात ही वापरायला हरकत नाही.
    2. टेनिस क्युरीयस स्किन इन्फेक्शन सारख्या आजारावर उत्तम प्रभावी.
    3. कोरोना काळात सारखा हांड sanitizer चा वापर करून हात कोरडे पडतात म्हणून मी एक छोटी बॉटल बाळगतो आफ्टर हंड सनिटेशन मे लगेच हातावर applay करतो.
    4. माझ्या बाळाचे केस आत्ता काळेभोर झाले आहेत. आधी पिंगळट होते.
    5. Massage साठी वापर करतो.
    6. एक चमचा रोज घेतल्याने झोप लवकर आणि चांगली लागते.

    अशे अनेक अनुभव अजून अनुभवत आहे.

    • vinay samant (store manager)

      सविस्तर अभिप्रायासाठी शतश: धन्यवाद. प्रौढांनी रोज दोन समचे घ्यावे. वृद्धांनी ३ चमचे. अधिक चांगले परीणाम मिळतील. ३ वर्षाखालील मुलांना डॉक्टरला विचारल्याशेिवाय देऊ नका. ओली बाळतीण असेल तर शरीराची झीज लवकर भरते. सकाळ संध्याकाळ द्या. शिवाय मसाज करा. आईला व बाळांना दोघांनाही. मुल स्तनपान करत असेल तर आईच्या स्तनांना देखील VCO ने मसाज करायची पद्धत केरळमधे मुख्यत्वे आहे. ह्यामुळे मुलाला दूध कमी पडत नाही आणि पोषण होते. दातांसाठी अक्षतच्या बराच वेळ चुळा भरल्याचे देखील चांगले परीणाम मिळतात..

  28. Sushil

    The search for best VCO ends here. ‘Akshat VCO’ is purest and best VCO amongst all VCOs I have ever tried. There is infinite list of benefits one can get from virgin coconut oil, and Akshat gives these results and benefits quicker because of it’s purity.
    I have been taking 15ML dose every night and observed the increase in energy levels.
    In addition to consumption, My family is using it as skin moisturiser including my new born son. Yes you heard right ! For new born son ! And believe me it’s best oil for baby massage.

  29. Chetana subodh bapaye

    Akshat as it’s name itself suggests infinite benefits of this VCO but to name some of them like skin problem, sleep disorder,inner strength,infant care, joint pain and last but not the least much needed strong immunity in this pandemic is all you can get from this oil.Thank you team Akshat.

  30. संजय पई

    मी संजय पई ,अक्षत च्या माध्यमातुन आजवर मी एक हजारावर लोकांशी कनेक्ट झालो आणि या अक्षतमुळे लोकांचे आरोग्य सुधारलेय आणि माझा जनसंपर्क वाढतच चालला आहे.
    शेकड्याने ग्राहक आज संतुष्ट आहेत नि तसे लेखी अभिप्राय लोकानीच पाठवले आहेत ‌.
    एका महिलेने तीच्या १७-१८ वर्षांच्या मुलावर नायटा म्हणजे रिंगवर्म साठी पंधरा दिवस अक्षत वापरले ज्या इशूवर गेली तीन वर्षे २०-२५ हजार खर्च करून चांगल्या चांगल्या डर्मेटोलाॅजिस्टना दाखवुनही त्या स्किन डिसीजवर काही परिणाम झाला नव्हता . तोच ईशू केवळ ५५० रुपयांमध्ये अक्षत वापरून कायमस्वरूपी सुटला असे त्याच महिलेने कळविला .
    असाच अनुभव माझ्या गावच्या एका ऍक्सिडेंट झालेल्या महिलेच्या दुखावलेल्या लिगामेंट चा प्राॅब्लेम सुटला .
    तीला पाय मांडी घालुन बसता येत नव्हता .सततच्या अक्षतच्या वापराने व पोटात रोज घेतल्यामुळे हा लिगामेंट इशू कायमस्वरूपी सुटला असे तिनेही कळविले आहे.

    असे अनेक आरोग्यवर्धक गुणफायदे अक्षतने ग्राहकानां दाखवले आहेत .
    खरोखरच काही ग्राहकांच्या बाबतीत तर चमत्कारच झाले आहेत ‌.

    सर्वांनांच याचा फायदा व्हावा हीच सदिच्छा .

  31. Visharad Ashokrao Petkar

    अक्षत हे बाजारात उपलब्ध असलेले सर्वोत्तम व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे.
    पाठदुखीवर मी प्रत्यक्ष वापरून पाहिलंय, अगदी सहज त्वचेत जिरून वेदना कमी झाल्यात व आराम मिळाला. रात्री डोक्याला लावल्यावर शांत झोप येते.जरूर वापरले पाहिजे असे अक्षत VCO आहे हे…!

  32. Amit Joshi

    Great I must say I was in doubt when I first purchased this product. But I just bought a second bottle for me.This oil is an absolute MIRACLE for me. During bhaubhij festival, I gifted it to my sisters along with other gifts.
    It smells great and feels really nice when applied.
    It’s real coconut oil.

  33. Anita Jani

    I have used Akshat for over a month now. I apply it regularly on my face, hands n feet for dry skin issues (and weekly basis on my head). It’s super absorbent and light. Dryness gone, ta ta. Am v happy with the product. Thank you Akshat 👍

  34. भारत मुंबईकर

    अक्षत व्हीसीओच का वापरावे याची खालील कारणे तर नक्कीच सांगु शकतो:
    – खात्रीशीर शुद्धता. इतर खोबरेल तेलांसारखी भेसळ यात नाही.
    – वापर कसा करावा याची शास्त्रशुद्ध माहिती इतर कोणी देत नाही ती अक्षतसोबत मिळते.
    – आणि मुख्य म्हणजे वापराबद्दलचा अनुभव जो सर्वांनाच चांगला आलेला आहे.

  35. Supriya Pawaskar

    Akshat VCO is not just a product but a lifestyles. Its positve eflects in every aspect are making our life healthy.

  36. प्रकाश

    सगळ्यात बेस्ट.. मुख्य म्हंजे vco सांगून vco च मिळाले..बाकी प्रॉडक्ट प्रमाणे कॉल्ड प्रेस ऑईल नाही.
    आतून इफे्ट्स जाणवतात. शरीरात एनर्जी वाढते. रेगुलर वापरले गेले पाहिजे

  37. Vinod Kawale

    अक्षत व्हीसीओ हे मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे.
    मी मला लचक भरल्यावर काही वेळा अक्षत व्हिसीओ ने मसाज केला मला लुकमाने हयात तेलापेक्षा व्हिसीओमुळे तात्काळ आराम पडला आहे.
    माझ्या केसांमध्ये कोंडा (dandruff) होता. जास्त काही त्रास नव्हता म्हणून मी त्यासाठी अगोदर काही प्रयत्न केले नव्हते पण व्हीसीओ आल्यापासून मी घरातील बाकीचे हेअर आॅईल बंद केले. परवा मी निरीक्षण केले माझ्या केसांमधील कोंडा (dandruff) पुर्ण नष्ट झाला आहे.
    दुसरा अनुभव मला दिवाळीपूर्वी आला.
    कंपनीच्या एका मिटींगमध्ये कस्टमरने विचारले की तुम्ही केसांना डाय करता काय?
    मी सांगीतले डाय करत नाही पण सध्या रेग्युलर हेअर आॅईल ऐवजी व्हीसीओ वापरत आहे.
    मी घेऊन पाहिले आणि अनुभव घेतला आपणही एकदा वापरून पहा. एकदा लोकांपर्यंत अक्षत पोहोचले की अक्षत आपले काम चोख पार पाडतेच.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *