“अक्षत व्हिसीओ” हे आषाढी व्हेंचर्सचा पहिले उत्पादन आहे. “कोकणातील उत्तम प्रतिच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे” ह्या ध्येयाने ह्या विषयाची सुरूवात झाली आहे. आता केवळ व्हिसीओ इतकेच मर्यादीत उद्दीष्ट न ठेवता घाण्याचे ते व खोबरे हे देखील “अक्षत” ह्याच ब्रँडनेम खाली सादर करायचा प्रयत्न आहे..

“नारळाचे तेल” हे भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. शहरातील मॉल्समधे आणि ऑनलाईन व्हिसीओ देखील उपलब्ध आहे. बहुतेक व्हिसीओ वर “Cold Pressed” असे लिहीलेले असते. नारळ कडकडीत उन्हात न सुकवता काढलेल्या सर्वच तेलांना व्हिसीओ म्हणायची पद्धत आहे. भारतात Desiccated Coconut (सुकवलेले खोबरे) देखील घाण्यातून काढतात व त्या तेलाला व्हिसीओ म्हणतात. हे खोबरे उन्हात सुकवण्या ऐवजी इंडस्ट्रीअल ड्रायर्समधे सुकवतात. काही उत्पादक बॅक्टेरीया कल्चरच्या वापराने नारळाचे तेल “सडवून” त्यापासून व्हिसीओ काढतात…

पण व्हिसीओ काढायची खरी तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे नारळाच्या दुधाला घुसळून! 10000RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनिक प्रक्रिया नाही की तापमान वाढवत नाही. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध व्हिसीओ मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम व्हिसीओ ठरते.

आषाढी व्हेंचर्सच्या “व्हिसीओ कोअर” ने शास्त्रोक्त पद्धतीने व्हिसीओ बनवण्याचा निर्यातक्षम प्रकल्प कोकणात उभारून इथल्या नारळाला आश्वासक भाव आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. १९ आषाढीअन्सनी एकत्र येऊन १२ लाखाचा फंड उभा करून ह्या प्रोजेक्टला सुरूवात केली. पहिल्या फेजमधे व्हिसीओ योग्य पद्धतीने प्रोसेस करून रास्त किमतीमधे उपलब्ध करायचा प्रयत्न आहे. ह्यातून निर्माण होणारा फायदा प्रकल्प उभारणीसाठी वापरायचा आहे.

This Post Has 3 Comments

  1. Vithal Lambor

    आपल्या प्रवासाला खुप खूप शुभेच्छा…!!!

  2. Laxman Prabhu Tendolkar

    काहीतरी चांगलं घडतंय

Your valuable comment please..