मराठी कोरावर सुरू झालेल्या सोशल स्टार्टअप आयडीयाला “रेघोट्या” हे स्वरूप मिळाले आणि दिवाळीच्या मुहूर्तावर एक एक स्टेप घ्यायला सुरूवात झाली. संध्याकाळी उशीरा ८:३० वाजता झूमवर पहिली खुली मिटींग झाली. १५ जणांनी ह्यात सहभाग घेतला. छान चर्चा झाली.. सव्वा तास चाललेल्या ह्या मिटींगमधे विवीध चांगल्या मुद्यांवर चर्चा झाली…

पहीला मुद्दा म्हणजे हा जो स्टार्टअपचा प्रयत्न आहे त्यात आयटी क्षेत्रातील नसलेले देखील अनेकजण आहेत. खरेतर अर्धे लोक असेच आहेत.. मग जर रेघोट्या सारखा आयटी स्टार्टअप केला तर ह्या लोकांचे काम काय असणार? कंटेट पासून मार्केटींग पर्यंत सारेच ऑनलाईन असणार आहे.. अशाने ह्यांचा सहभाग खूपच मर्यादीत असणार का? मग आयटी सोडून दुसरे काही चालू करता येईल का??

आजच मी कोरावर “तुम्ही काही चांगल्या व्यवसाय कल्पना सुचवू शकता का? (कृपया भाजीपाला व ब्लॉगिंग यांसारख्या सर्वसामान्य नकोत)” ह्या प्रश्नाचे उत्तर दिले – तुम्ही काही चांगल्या व्यवसाय कल्पना (भाजीपाला व ब्लॉगिंगयांसारख्या सर्वसामान्य नकोत) सुचवू शकता का?  त्यात मी सुचवलेला एक मुद्दा “गावखेड्यात मिळणाऱ्या चांगल्या गावठी वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करणे.. भविष्यात रानभाज्या, स्थानिक ताजी फळे हे देखील उपलब्ध करणे” हा मी मिटींगमधेही मांडला. मला हा पूर्विपासून करायचा आहे..

आपल्या सारख्या स्टार्टअपमधे हे केल्यास अनेक फायदे आहेत. जसे की एकाच वेळी महाराष्ट्राच्या विवीध एरीयामधील लोक “पार्टनर” म्हणून इथे जॉईन होणार असल्याने मालाची उत्तम गुणवत्ता टिकवणे आणि एकाच वेळी सर्वत्र प्रेझेंस असे फायदे होऊ शकतात. श्रीधर सरांनी एक चांगला मुद्दा मांडला की सर्व ठिकाणाहून मालाची व्यवस्था आणि Shipping/Logistics मोठे चॅलेंज असू शकते. ह्यावर विवीध पर्यायांवर चर्चा झाली.. एकतर एकाच वेळी सर्व ठिकाणी चालू करायची गरज नाही. एका ठिकाणी सुरूवात करू.. यशस्वी करू आणि मग इतरत्र हळूहळू पसरू.. तोवर इतर एरीया तयारी करू शकतील..

पण सर्वात मोठा फायदा म्हणजे Diversity! आपला नैसर्गिक रित्या महाराष्ट्राच्या सर्व विभागातून प्रतिनिधीत्व असलेला छान ग्रुप बनतोय.. जे कंपन्यांना मुद्दाम बनवावे लागते.. आणि सारेच जण जबाबदारीने हे करू शकतील.. कारण सारेच कंपनीचे मालक/चालक असतील.. सर्वाना ह्यात विवीध प्रकारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पार्टीसिपेट करू शकतील..

भारत मुंबईकरांनी व्हाट्सऍप चर्चेत एक चांगला मुद्दा दिला तो म्हणजे distributed production. ज्यामुळे logistics चा खर्च बराच कमी करता येईल.

आताच्या काळात 2 प्रकारचे रिटेल सेगमेंट ठळक आहेत। प्युअर रिटेल जे अमेझॉन ऑनलाईन टार्गेट करते आणि इन्स्टिट्युशनल किंवा पॉकेट्स। हा मुख्यत्वे बिग बाजार, रिलायन्स फ्रेश चा डोमेन आहे। हा दुसरा डोमेन ज्यात एक पॉकेट मध्ये विशिष्ठ प्रकारच्या वस्तूंची खरेदी होते, तो जर आपण नीट करू शकलो, करण आपला सर्वठिकाणी असलेला प्रेजेस तर आपण छान ग्रीप घेऊ शकतो। लॉजीस्टिकस एकदा मॅनेज करावे लागेल खरे, पण नंतर ते सवयीचे होईल.

Leave a Reply