जखमा बऱ्या व्हायला जास्त वेळ लागणे (डायबेटिक अल्सर) ही डायबेटिस मेलिटस (Diabetes Mellitus) ची एक प्रमुख गुंतागुंत आहे. मागील दशकांमध्ये जवळजवळ १५% मधुमेही रूग्णांमध्ये या विकाराचा वाढता प्रभाव आढळून आला आहे. अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल (VCO) हे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले नैसर्गिक तेल आहे आणि त्यात प्रतिजैविक आणि विषाणूरोधक गुणधर्म  आहेत.

सध्याच्या अभ्यासात, आम्ही मधुमेह ग्रसित स्प्रेग-डॉले उंदरांमध्ये जखमेच्या उपचारांवर VCO च्या स्थानिक वापराच्या परिणामांचे मूल्यांकन केले. एकूण ७२ उंदरांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती:

  • (01) मधुमेह नसलेले आणि उपचार नाहीत (non-diabetic non-treated : NN), 
  • (02) मधुमेह असलेले आणि उपचार नाहीत (diabetic non-treated : DN), 
  • (03) मधुमेह असलेले आणि VCO सह उपचार केलेले (diabetic VCO-treated)
  • (04) मधुमेह असलेले आणि सिल्व्हर सल्फाडियाझिन क्रीम (SS) ने उपचार केलेले (diabetic SS-treated)

सर्व गटांमधील उंदरांना पंच बायोप्सी सुया (punch biopsy needles) वापरून झालेल्या जखमांवर १४ दिवस उपचार केले गेले. जखम भरून येण्याचा दर (Wound Closure Rate – WCR) ५ व्या, १० व्या  आणि १४ व्या दिवशी मोजला गेला. उतकीय विश्लेषण (Histological analysis) ७ व्या  आणि १४ व्या दिवशी केले गेले. एकूण प्रथिनांचे प्रमाण आणि सुपरऑक्साइड डिसम्युटेस (SOD) क्रियाकलाप दिवस १, ७ आणि १४ रोजी मोजले गेले.

जखम भरून येण्याचा दर (WCR) VCO ने उपचार केलेल्या गटामध्ये DM गटापेक्षा जास्त होता. हिस्टोलॉजिकल विश्लेषणातून असे दिसून आले की VCO जखमेवर उतींचे आवरण बनण्यासाठी (reepithelialization) साहाय्य दिले आणि जखमेच्या ऊतींचे कोलेजन सामग्री वाढवली. VCO गटातील एकूण प्रथिने DN आणि SS या दोन्ही गटांच्या तुलनेत ७व्या आणि १४व्या दिवशी जास्त होती. VCO ने SOD लेव्हल्स वर किरकोळ प्रभाव दर्शविला. 

सारांश : री-एपिथेललायझेशन आणि कोलेजन (collagen) संश्लेषण तसेच जखम भरून येण्याचा दर (WCR) आणि एकूण प्रथिनांचे प्रमाण वाढवून मधुमेहाच्या जखमा बरे करण्यासाठी VCO सिल्व्हर सल्फाडियाझिन क्रीमपेक्षा चांगले असल्याचे आढळले.

https://www.researchgate.net/publication/324152239_Virgin_coconut_oil_and_diabetic_wound_healing_Histopathological_and_biochemical_analysis

Leave a Reply