Quora मराठी वरील समविचारी लोकांनी एकत्र येऊन एक स्टार्टअप चालू करावा अशा प्रयत्नांना हळूहळू मूर्त स्वरूप येत असून, ह्या स्टार्टअप कंपनीचे नाव “आषाढी व्हेंचर्स” व तिचा पहिला प्रकल्प किंवा स्टार्टअप “रेघोट्या” हा ठरला असून दर दिवशी सातत्याने आषाढीचे सभासद ह्या विषयांवर सविस्तर चर्चा करत आहेत. रोज रात्री ९:०० ला होणाऱ्या “दैनंदिन ऑफीस मिटींग” ला छान रिस्पॉन्स असून नवनविन सभासद सामील होत आहेत. पुढील आठवड्यात कंपनी फॉर्मेशनची प्रत्यक्ष प्रोसीजर चालू करत आहोत..

दरम्यान “रेघोट्या” प्रकल्पाचा सोशल एक्सपरीमेंट खूपच चांगल्या प्रकारे पार पडला असून त्यातूनही काही सहकारी मिळाले. तर रेघोट्याचे भविष्यातील स्वरूप आणि एकूणच “आषाढी व्हेंचर्स”ची पुढील वाटचाल ह्या दृष्टीने आज “दि. १३ डिसेंबर २०२०” रोजी आषाढीच्या प्रोमोटर्स आणि वेलविशर्सची पहिली प्रत्यक्ष सभा डोंबिवली येथे संपन्न झाली. “सोशल मीडियाचा वापर करून स्टार्टअप” ह्या अत्यंत युनिक प्रकल्पाची ही वास्तविक मुहूर्तमेढच म्हणायची!

११ वाजता आलेले श्रीरंग विभांडीक आणि सर्वात शेवटी सामील झालेल्या सुनिता तळवलकर मॅम असे एकूण ८ सभासद सहभागी झाले होते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या ह्या मिटींग मधे पुण्याहून विनोद काळे आणि अलका दराडे, ठाण्याहून श्रीरंग विभांडीक, कळंबोलीहून भारत मुंबईकर, कल्याणहून अरविंद हिंगे आणि भांडूपहून किशोर कोलते असे एकूण ८ जण सामील झाले होते.

आषाढी व्हेंचरर्स कंपनीची पुढील वाटचाल, रेघोट्या प्रकल्प आणि कोर्सेस ह्याचा विस्तार व अधिकाधीक लोकांना कसे सामील करता येईल अशी सविस्तर चर्चा झाली. दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी आषाढीच्या भागधारकांसाठी रेघोट्याचा प्रायमर कोर्स, त्या नंतर २१ ते ३१ डिसेंबर रेघोट्या प्रायमर कोर्सेसचे ऑफीशिअल प्रोमोशन, १ जानेवारी २०२१ ला आषाढीच्या प्रायमर कोर्सचे लॉन्च आणि १ ते १३ जानेवारी पब्लिक प्रायमर कोर्स आणि फायनली १४ जानेवारी २०२१ च्या मकरसंक्रातीला रेघोट्याच्या पहिला इंटरॅक्टीव्ह कोर्सचे लॉन्च असा भरगच्च आणि वेगवान कार्यक्रम ठरला आहे. उद्यापासून २० पर्यंत दररोज आषाढीच्या भागधारकांसाठी दैनंदीन मिटींगमधून अवेअरनेस करायचा आहे!

आपल्यालाही ह्यात सामील व्हायला आवडणार असेल तर आमची आषाढी सर्वांसाठी खुली आहे! या आणि ह्या अत्यंत धाडसी आणि व्हायब्रंट प्रकल्पाचे “भागीदार” बना. समविचारी लोकांना प्रत्यक्ष भेटा. सामाजिक भेडसावणारे प्रश्न मांडा. त्यावर उत्तर सुचवा आणि स्वत:च ते उत्तर लिड करा. तुमच्यातल्या तुमची खरी ओळख करून घ्यायचे एकमेव सामाजीक आणि लोकशाहीवादी व्यासपीठ … तुमचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे “आषाढी व्हेंचर्स” ..

Leave a Reply

This Post Has 4 Comments

 1. गिरीश खाटपे

  मला आता नोंदणी करता येईल का??

  1. vinay samant

   सध्या नोंदणी बंद आहे. तुम्ही आमच्या व्हाट्सॅप ग्रुपमधे सामील होऊ शकता. तिथे तुम्हाला पुढील माहिती मिळेल. . https://chat.whatsapp.com/HgTJWhvuYj4CkRtDMbjTPe

 2. Omkar Desai

  संकल्पना खरच छान आहे…..मला समभाग घायचा आहे …प्रोसेस काय आहे….

  1. vinay samant

   तुम्ही आमच्या व्हाटसॅप ग्रुपमधे आहात का?