तेल हा आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आहे. तेल हे अनेक उपयुक्त फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत. तेल आपल्याला ऊर्जा देते, पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये रक्तावाटे शोषण्यास मदत करते. ही गोष्ट आहे तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाची…

खाद्यतेलाचे दोन मुख्य प्रकार आहेत: रिफाईंड तेल आणि घाण्याचे तेल

रिफाइंड तेल : वनस्पतींमधून अधिकाधिक तेल काढण्यासाठी उच्च तापमान, दाब आणि रासायनिक विद्रावके वापरतात. यामुळे वनस्पती तेल एक प्रकारे सडते, धूसर होते आणि त्यातील स्निग्धता नष्ट होते. रिफाइंड तेल हे अशा प्रकारे सोल्वंट एक्स्ट्रॅक्ट करून काढलेले तेल, पामतेल, खनिज तेल आणि खराब झालेले तेल यांसारख्या सर्व स्वस्त तेलांना मिसळून बनवलेले संमिश्र-तेल आहे. हे मग अतिउच्च तापमानाला तासनतास उकळवतात. गंधमुक्त व रंगहीन करण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. ह्यासाठी हेग्झेन सारखी घातक रसायने वापरली जातात. हायड्रोजन इंजेक्शन वापरून शेल्फलाईफ वाढवतात. ह्यामुळे तेलामधील सर्व मौल्यवान नैसर्गिक घटक नष्ट होतात व ट्रान्स फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ह्या सर्व प्रक्रीयांमुळे तेलासारखे दिसणारे चकाकदार रसायन तयार होते, ज्यामधे कृत्रिम चव आणि रंगद्रव्ये मिसळतात. आपण जे “रिफाईंड शेंगदाणा तेल” म्हणून वापरतो ते खरे शेंगदाणा तेलच नाही.


हे “तेलासारखे रसायन” सर्वांना परवडेल अशा स्वस्त दरात उपलब्ध होते खरे पण सोबत अनेक प्रकारचे आजार घेऊन येते. घशाचे आजार, वजन वाढणे, हृदयाच्या समस्या, रक्तदाब, बद्धकोष्ठता, मधुमेह, जडपणा, विस्मरण अशा विवीध प्रकारच्या आजारांना हे वाट करून देते. प्रत्येक घासागणीक आपल्या आरोग्याशी गडबड वाढतच राहते. ह्यात पोषण कमी पण धोकेच जास्त आहेत. म्हणूनच रिफाइंड तेल हे स्लो पॉयझन मानले जाते.


 

घाण्याचे तेल : हे तेल तेलबिया ठेचून पारंपारिक पद्धतीने गाळतात. पूर्वी हे लोखंडी घाण्यावर बनायचे पण आता हे लाकडी घाण्यावर बनवतात. ह्यामुळे त्यातील पोषण नष्ट होत नाही. हे ऐकायला जी छान वाटंत असले तरी हे पूर्णसत्य नाही. स्थानिक पातळीवर मिळणारे तेल हे निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरून बनवतात. रिटेलला विकला न गेलेला, जुना, कीड पडलेला असा स्वस्तातील स्वस्त कच्चा माल मिळवून हे तेल बनवले जाते.

स्थानिक “लाकडी घाणा तेल” साधारण ३००/- च्या आसपास आहे. शेंगदाणाच ११०/- किलो आहे. एक लिटर तेलासाठी अडीज किलो शेंगदाणा लागतो. तर ३००/- मधे तेल कसे विकू शकतो? ह्यासाठीच अत्यंत स्वस्तातला, खराब झालेला कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रीया करतात.

लोखंडी घाण्यावर लाकडी घाण्यापेक्षा जास्त तेल निघते त्यामुळे काही पारंपारीक घाणेवाले लोखंडी आणि लाकडी घाण्याचे तेल मिक्स करून विकतात. मार्केटमधे टिकण्यासाठी काही घाणेवाले स्वस्त तेलाचे मिक्सींग देखील करतात.२५-३०% प्रमाणात केलेले मिक्सींग लक्षातच येत नाही!

लाकडी घाण्याचे तेल कधी कुणी फिल्टर करत नाही. हे तेल अतिशय घाणेरडे आणि अशुद्धतेने भरलेले असते. तेलातील गढूळपणा, अविद्राव्य गाळ स्पष्ट दिसतो. शिवाय घाणा आणि इतर उपकरणे कधीच स्वच्छ करत नाही. ते हाताळणारे कामगार अत्यंत गलिच्छ असतात. त्यामुळे हे तेल १००% नैसर्गिक पण अशुद्ध आणि घाणेरडे असते. संसर्गाचा धोका देखील असतो.

लाकडी घाण्याचे तेल फिल्टर न केल्याने त्यातमधे राहीलाला गाळ, अशुद्धता हे अत्यंत सूक्ष्म असल्याने, तेल गरम करायला घेताच जळायला लागते. त्यामुळे धूर येतो, फेस येतो. अन्नाची चव बिघडते. आणि हे जळकट पदार्थ पोटात जाऊन फ्री रॅडिकल्स तयार करतात व शरीरसंस्थेचे प्रचंड नुकसान करतात. अशा प्रकारे हे १००% नैसर्गिक घाण्याचे तेल रिफाईंड तेलपेक्षाही घातक सिद्ध होते. अनेक प्रकारचे घशाचे विकार, पचनसंस्थेचे विकार, रक्ताचे आणि हृदयाचे विकार होऊ शकतात..

घाण्याच्या तेलावर जेव्हा आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अपारंपारीक फिल्टर वापरून पाहिले तेव्हा आम्हाला मिळाला हा गाळ. दुधाच्या सायीसारखा दिसणारा हा गाळ आपल्याला आजारी पाडायला पुरेसा आहे. पारंपारीक कापडी वा स्क्रिनचे फिल्टर वापरून हा निघत नाही. खूप जिकीरीचे काम आहे.

म्हणून बहुतेक घाणावाले हा काढतच नाही! आणि हे गढूळ तेल तुम्हाला 100% नैसर्गिक म्हणून तसेच विकले जाते. १००% टक्के नैसर्गिक म्हणून फळे आपण सालासहीत खातो का? माकडापासून आपण जेव्हा माणूस म्हणून प्रगत झालो तेव्हा हा फरक करायला आपण शिकलो ना!


Honest : The Oil Story (तेलाची प्रामाणीक कहाणी!)

आषाढीमधे आम्ही ह्या विषयावर काम करायला सुरूवात केली आणि ३० जणांनी एकत्र येत साकारला एक नविन प्रोजेक्ट : “ॲक्टिवेटेड लाकडी घाण्याचे तेल” जे नैसर्गिक असेल, शुद्ध असेल, विश्वसार्ह असेल!

आषाढीमधे आम्ही अडचणींवर चर्चा करत नाही. पर्यायांवर काम करतो. त्यासाठी अभ्यास करतो, प्रयोग करतो, परीस्थितीजन्य आव्हाने स्विकारतो आणि अडचणींवर उपाय काढतो! पर्याय उपलब्ध करतो. पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याची सांगड घालत काही करता येईल का ह्यावर काम करतो.

ॲक्टिवेटेड ऑईल बाबत आधी आम्ही काही धोरणे ठरवली. केमिकलचा वापर नाही, कपड्यासारखे पारंपारीक फिल्टर ज्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते ते वापरायचे नाही, उष्णतेचा वापर नाही, कुठलीही प्रक्रीया करायचे नाही हे ठरले. मग ह्या शुद्धीकरणासाठी निरनिराळ्या पर्यायांवर अभ्यास सुरू झाला. पर्याय शोधताना तेलाचे नैसर्गिक गुणधर्म अबाधित राखणे आणि किंमतीवर नियंत्रण ह्या दोघातील समन्वय महत्वाचा होता. त्यात आम्हाला केरळच्या आयुर्वेदशाळेतून एक संदर्भ मिळाला आणि गणित सुटले..

आयुर्वेद औषधांच्या रसशाळेत काढे शुद्ध करायला घुसळण्याची जी पारंपारिक प्रक्रीया वापरतात त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आम्ही ह्या तेलासाठी फिल्टर बनवले. हे फिल्टर कुठल्याही केमीकल, उष्णता व माध्यमाचा वापर न करता केवळ गुरूत्वमध्य उर्जेचा वापर करून शुद्धीकरण करतात. मूळ गुणधर्म अबाधीत राखून! असे जन्माला आले “Honest Oil”. 100% नैसर्गिक, कुठलेही केमिकल व उष्णतेचा वापर न करता काळजीपूर्वक शुद्ध केलेलं, समुद्री मिठाने निर्जंतुक केलेलं आणि चांदीने प्रभावित केलेले सुरक्षित, विश्वासार्ह व्हर्जिन प्रतिचे खाद्यतेल.

ऑनेस्ट तेल व घाण्याच्या तेलातील मुख्य फरक :

  • स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या घाण्याच्या तेलासाठी वापरला जाणारा कच्चामाल खराब प्रतीचा असतो. आम्ही मालाच्या दर्जाशी कधीच तडजोड करत नाही.
    स्पर्धेत टिकण्यासाठी आता घाणावाले इतर व जुन्या तेलांचे सर्रास मिक्सीग करत आहेत. आषाढी सोशल एंटरप्रेनरशीप असल्याने असे प्रकार कधीच होत नाही!
  • घाण्याचे तेल कधीच फिल्टर न केल्याने गढूळ आणि अनारोग्यकारक असते. ते जास्त तापवले असता धूर येऊ लागतो, त्यातील अविद्राव्य घटक जळायला लागतात. तळताना फेस येतो व विचित्र वास येतो. ऑनेस्ट तेल विशिष्ठ पद्धतीने शुद्ध केलेले असल्यामुळे ह्यातून धूर येत नाही की फेस येत नाही. पदार्थ चविष्ट बनतात व जडपणा किंवा झोप येत नाही. हे तेल परत परत वापरले तरी जळकट, कडवट होत नाही.
  • ऑनेस्ट तेलातील गाळ व आर्द्रता काढून टाकल्यामुळे हे जास्त काळ टिकते.

शुद्ध व दर्जेदार तेलाचे ४ पर्याय





शेंगदाणा तेल

Add to Cart






सूर्यफूल तेल


Add to Cart






करडई तेल


Add to Cart






नारळ तेल


Add to Cart

आधुनिक आहारशास्त्रातील संशोधनाने स्पष्ट केले आहे की एकाच प्रकारचे तेल खाल्ल्याने शरीरात चरबी साचण्याची शक्यता वाढते व त्यामुळे कोलेस्ट्रॉलपासून निर्माण होणाऱ्या अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे एकाच प्रकारचे तेल वापरण्यापेक्षा ४ ही प्रकारची तेल दर महिन्याला आलटून पालटून वापरणे हे अधिक आरोग्यकारक आहे

तेलाबद्दलचे समज – गैरसमज!

रिफाईंड तेल आम्ही इतकी वर्षे वापरतो, मग आम्हाला कधी कसला त्रास कसा झाला नाही?

रिफाईंड ते हे एक प्रकाचे “स्लोपॉयझन” म्हणता येईल. हे एकदम परीणाम करत नाही. रिफाईंड तेल बनवण्यासाठी लागलेली हेग्झेन सारखी घातक केमीकल्स अत्यंत सूक्ष्म प्रमाणात शरीरात जात रहातात, परीणाम करत राहतात. एके दिवशी हे इतके जास्त होते की तुम्ही आजारी पडता. हार्ट अटॅक किंवा बिपी सारखा त्रास रात्रीत होत नाही. अनेक वर्षे ही प्रक्रीया चालूच असते. आणि तुम्हाला कळते तेव्हा उशीर झालेला असतो.

लाकडी घाण्याचे तेल १००% नैसर्गिक असल्याने दर्जेदार व आरोग्यदायी असते ना?

पारंपारीक लाकडी घाण्याचे तेल कधी कुणी फिल्टर करत नाही.  पारंपारीक कापडी वा स्क्रिनचे फिल्टर वापरून तेलातील गाळ निघत नाही. हे खूप जिकीरीचे काम आहे. म्हणून बहुतेक घाणावाले हा काढतच नाही तेलातील गढूळपणा, अविद्राव्य गाळ स्पष्ट दिसतो. शिवाय घाणा आणि इतर उपकरणे कधीच स्वच्छ करत नाही. ते हाताळणारे कामगार अत्यंत गलिच्छ असतात. त्यामुळे हे तेल १००% नैसर्गिक पण अशुद्ध आणि घाणेरडे असते. संसर्गाचा धोका देखील असतो.

लाकडी घाण्याचे तेल फिल्टर न केल्याने त्यातमधे राहीलाला गाळ, अशुद्धता हे अत्यंत सूक्ष्म असल्याने, तेल गरम करायला घेताच जळायला लागते. त्यामुळे धूर येतो, फेस येतो. अन्नाची चव बिघडते. आणि हे जळकट पदार्थ पोटात जाऊन फ्री रॅडिकल्स तयार करतात व शरीरसंस्थेचे प्रचंड नुकसान करतात. अशा प्रकारे हे १००% नैसर्गिक घाण्याचे तेल रिफाईंड तेलपेक्षाही घातक सिद्ध होते. अनेक प्रकारचे घशाचे विकार, पचनसंस्थेचे विकार, रक्ताचे आणि हृदयाचे विकार होऊ शकतात..

१००% टक्के नैसर्गिक म्हणून फळे आपण सालासहीत खातो का? माकडापासून आपण जेव्हा माणूस म्हणून प्रगत झालो तेव्हा हा फरक करायला आपण शिकलो ना!

लाकडी घाण्याचे तेल तापवले असता खूप धूर का येतो?

पारंपारीक लाकडी घाण्याचे तेल फिल्टर केलेले नसते. हे तेल अतिशय घाणेरडे आणि अशुद्धतेने भरलेले असते. तेलातील गढूळपणा, अविद्राव्य गाळ स्पष्ट दिसतो. लाकडी घाण्याचे तेल फिल्टर न केल्याने त्यातमधे राहीलाला गाळ व अशुद्धता हे अत्यंत सूक्ष्म असल्याने, तेल गरम करायला घेताच जळायला लागते. त्यामुळे धूर येतो, फेस येतो. अन्नाची चव बिघडते. आणि हे जळकट पदार्थ पोटात जाऊन फ्री रॅडिकल्स तयार करतात व शरीरसंस्थेचे प्रचंड नुकसान करतात. अशा प्रकारे हे १००% नैसर्गिक घाण्याचे तेल रिफाईंड तेलपेक्षाही घातक सिद्ध होते. अनेक प्रकारचे घशाचे विकार, पचनसंस्थेचे विकार, रक्ताचे आणि हृदयाचे विकार होऊ शकतात.

शेंगदाणा, करडई, सूर्यफूल आणि नारळ ह्या पैकी सर्वोत्तम तेल कुठले जे रोजच्या जेवणात वापरू शकतो.

MUFA & PUFA चा समतोल पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर नारळाचे तेल हे ऑलिव्ह तेलानंतर सर्वात दर्जेदार खाद्यतेल समजले जाते. पण आधुनिक आहारशास्त्रातील संशोधनाने स्पष्ट केले आहे की एकाच प्रकारचे तेल खाल्ल्याने शरीरात चरबी साचण्याची शक्यता खूप वाढते व कोलेस्ट्रॉलमुळे निर्माण होणाऱ्या अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे एकाच प्रकारचे तेल वापरण्यापेक्षा ४ ही प्रकारची तेल दर महिन्याला आलटून पालटून वापरणे हे अधिक आरोग्यकारक आहे

 

आम्ही नारळाचे तेल जेवणात वापरत नाही. त्याचा वास सहन होत नाही. काय करता येईल?

बाजारात मिळणारे नारळाचे तेल हे खरे नारळाचे तेल नसते. त्यात मोठ्या प्रमाणात पाम तेल व इतर तेले मिक्स केलेली असतात. ते कळू नये ह्यासाठी ब्लिचींग करतात व नंतर नारळाच्या वास व चवीसाठी कृत्रीम घटक त्यात मिसळतात.

हे तेल गरम करताक्षणी त्यात मिसळलेले हे कृत्रीम घटक जळायला लागतात ज्याचा वेगळा वास येतो जो आपल्याला सहन होत नाही.

ऑनेस्ट ऑईल हे १००% नैसर्गिक आणि कुठलीही भेसळ न केलेले तेल आहे. ह्यात काही मिसळत तर नाहीच पण सर्व प्रकारची अशुद्धता, गाळ, अनारोग्यकारक घटक ह्यातून काळजीपूर्वकरित्य काढले जातात. त्यामुळे हे अत्यंत शुद्ध व दर्जेदार तेल तुम्हाला मिळते ज्याचा धूर होत नाही, अनावश्यक, अनैसर्गिक वास येत नाही.

Leave a Reply