This Article In in “Marathi” Language

तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली ‘प्रकृती’ सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती “न्यु ओरेलान्स” ला शिफ्ट झाली..

अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा … आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती. जॉब पुरता परदेश प्रवास जरी केला असला तरी एका नविनच देशात सेटल होणे सोपे नव्हते. हळूहळू स्थानिक भाषा, चालीरितींची ओळख होत होती. दरम्यान तिची ओळख ‘इला’ बरोबर झाली. मुळच्या साऊथ अफ्रीकन इलाने प्रकृती सारखेच कामानिमीत्त फ्रांसला स्थलांतर केले होते. दोघींची छान गट्टी जमली. बागकाम, शॉपींग पासून ते तिथल्याच योगा आश्रमात देखील दोघी एकत्रच जायच्या. इला रोज डोक्यावर नारळाचे तेल घालायची व अंगाला देखील लावायची हे कळल्यावर प्रकृतीला आश्चर्याचा धक्काच बसला. असेच एकदा आश्रमातील एका “व्हर्जीन कोकोनट ऑईल (VCO)” च्या सेमीनारला इला प्रकृतीला घेऊन गेली. ह्यामधे तिला VCO चे अनेक चमत्कारीक गुणधर्म कळले. VCO मधे म्हणे लॉरील ऍसीड नावाची एक MCT असते जी केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते व अर्भकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामधे अनिवार्य भुमिका बजावते. अल्झायमर सारख्या दूर्धर आजारावर देखील VCO च्या वापरामुळे आश्वासक परीणाम मिळतात!

स्वभावत:च अभ्यासू प्रकृतीने VCO वर भरपूर वाचन करायला सुरूवात केली. विवीध मेडीकल रिपोर्टस, व्हिडीओ आणि आश्रमातील काही लोकांबरोबर चर्चा असे सतत चालू होते. अशातच तिला APCC (Asia Pacific Coconut Community) ह्या १८ नारळ उत्पादक आशियायी देशांच्या शिखर संस्थाबाबत कळले जी “नारळ” ह्याच विषयावर संशोधन आणि धोरणात्मक काम करते. आणि अशातच प्रकृतीला दिवसही गेले… आता आमच्या भारतीय मुलीला माहेरचे वेध लागले!

विमानाने पॅरीस ते मुंबई .. एसी स्लिपर वॉल्वोने मुंबई ते कुडाळ ने असा प्रवास करत प्रकृती कोकणात पोचली. बाबा आलेच होते घ्यायला. कोकणातले लाल रस्ते, हिरवा गार निसर्ग, नऊवारी नेसलेल्या म्हाताऱ्या बायका, वाटेत लागलेला मासळी बाजार … सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होत होत्या. ७-८ वर्षांनी परत आली असेल कोकणात, पण काही बदलले नव्हते… घरी आल्याबरोबर आईने दृष्ट काढली आणि ताजे नारळाचे पाणी प्यायला दिले … नारळाबद्दल इतकी माहिती घेतली होती की नारळाचे पाणी, खोबरे, वड्या, चटणी सारे खाताना तिला सारे आठवत होते. कोकणात प्रत्येक घरी दोनतरी माड असतातच. शहाळी व नारळ घरचेच. “तूला आता रोज सकाळी एका शहाळ्यचे पाणी देणार”, आईने आल्याबरोबरच सांगीतले होते .. “बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी उत्तम असते..” … बाळंतपणामुळे अनेक मर्यादा असूनही ऑनलाईन वाचन, अभ्यास चालूच होता. सहजच तिने ह्या विषयावर स्थानिक वृत्तपत्रांमधे लेख लिहायला आणि लेक्चर्स द्यायला सुरूवात केली…

कल्पवृक्ष नारळ : पाच देववृक्षांपैकी एक आणि ज्याच्या फळाला “श्रीफळ” संबोधतात असे हे नारळाचे झाड! नारळाच्या प्रत्येक भागाचे चमत्कारीक फायदे आहेत. नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात किटोन्स आणि मिनरल्स असल्याने मोठ्या प्रमाणात हे पेशंटच्या प्रकृतीमधे लवकर सुधारणा व्हावी ह्यासाठी वापरतात. दाक्षीणात्य भारतात खोबरे हा खाण्याचा मुख्य घटक आहे. खोबऱ्याच्या नियमीत सेवनामुळे दाक्षीणात्य भारतीय हृदयविकार व रक्तदाबजन्य रोगांपासून दूर आहेत.

ओल्या खोबऱ्यापासून निघणारे दूध हे गायीच्या दूधाला उत्तम नैसर्गिक पर्याय असून जगभरात आढळणाऱ्या लॅक्टोस आणि ग्लुटेन सारख्या अडचणींवर प्रमुख पर्याय आहे. सोयाबीन दूधाच्या उत्पादनाची Carbon Foot Print नारळापेक्षा खूपच मोठी असल्याने पाश्चात्य देशांमधे नारळाच्या दुधाची मागणी वाढतेच आहे. ह्या दुधात आढळणारे मुबलक प्रमाणात आढळणारे “लॉरीक अॅसीड” हा निसर्गाचा एक चमत्कारच असून हे केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते. अर्भकांची रोग प्रतिकारशक्ती आणि अस्थिमज्जा घडवणे ह्यामधे “लॉरीक ऍसीड” मुख्य भुमिका निभावते. नारळाच्या दुधापासूनच उत्तम दर्जाचे VCO बनते. अत्यंत हलके व त्वचेतून सहजपणे खोलवर झिरपणारे हे निसर्गातील “सर्वोत्तम औषधी तेल” गणले जाते. अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या दूर्धर आजारांवर देखील VCO ने अनेक आश्वासक परीणाम दाखवले आहेत.

नारळाची करवंटी हे जगातील सर्वात टणक लाकूड समजले जाते व उत्कृष्ठ प्रतिचा “ऍक्टीव्हेटेड कार्बन” बनवण्यासाठी प्राधान्याने वापरली जाते. नारळाच्या सोडणांपासून बनणारे फायबर हे मजबूत दोरखंड व जमीनीची धूप थांबवणारे जिओ फायबर बनवायला वापरतात. सोडणातील फायबर काढल्यावर उरणाऱ्या कोकोपिटमधे साधारण जमीनीच्या १० पट पाणी धारण करण्याची अनन्यसाधारण क्षमता आहे. ह्यामुळे मुळांना पाणी व पोषण मिळत रहाते.

नारळाच्या झाडाला फळधारणा होण्यापूर्वी मोठ्ठी कळी येते जिला “पोय” असे म्हणतात. ह्या पोयीला कापल्यास त्यातून जो रस स्त्रवतो त्याला “निरा” म्हणतात. ज्या नारळाच्या कळीपासून नारळाचे फळ व त्यातील सोडण, करवंटी, खोबरे, पाणी हे सारे बनते ते सारे सत्व निरेमधे असते. प्रचंड प्रमाणात किटोन्स व मिनरल्स असलेली निरा अक्षरश: अमृतासमान आहे. निरेवर प्रक्रीया करून निरेची साखर बनवतात जीचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा दहापट कमी असतो. अशा प्रकारची “मिनरलयुक्त औषधी साखर” डायबेटीक/मधुमेहग्रस्त लोकांसाठी वरदान आहे!

प्रकृती नारळाबाबातची मिळेल तितकी माहिती संकलीत करून ब्लॉग्ज आणि सोशल मिडीयावर मांडत होती. पाहता पाहता जगभरातून २८ लाख फॉलोवर्स केवळ ४-५ महिन्यात मिळाले होते… इकीकडे प्रकृतीचे बाळ वाढत होते आणि दुसरीकडे नारळाचे वेड! पण एक मोठी खंत तिला जाणवायची… कोकणातील ४ नारळ उत्पादक जिल्हे असलेल्या महाराष्ट्राचे भारताच्या नारळ व्यवसायात नावही नव्हते. नारळ विकास बोर्डावर महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी नसल्याने आधुनीक तंत्रज्ञान व त्यातून निर्माण होणा-या संधीविषयी कोकणातील बागायतदार पूर्णपणे अनभिज्ञ होता. कोकणात नारळ मुख्यत्वे जेवणात व सोडणे- करवंट्या जाळायला असेच प्रचलीत समिकरण होते. उरलेला नारळ व्यापा-याला. बोटावर मोजण्याइतके काथ्या प्रकल्प व तेलाचे घाणे असे कोकणातील नारळ व्यवसायाचे उदासीन स्वरूप… पण प्रकृतीला खात्री होती की ह्या छोट्याश्या नारळात कोकणाचे भाग्यच उजळून टाकू शकेल अशा अदभूत शक्यता आहेत.

अशातच तिची ओळख झाली “आषाढी व्हेंचर्स” ह्या धडपड्या मराठी लोकांच्या सोशल स्टार्टअपशी.. “मराठी माणसामधे व्यावसाईक गुणधर्म नाहीत” ह्या समजाला खोडून काढायचे अशा धडाडीने चालू झालेली “आषाढी व्हेंचर्स” ही मराठी युवकांची सोशल स्टार्टअप. Quora मराठी सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर समविचारी व उद्यमशील लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही कंपनी पाहता पाहता नावारूपाला आली होती. प्रचंड उर्जा, धडाडी, विवीध क्षेत्रातील अनुभवी लोक आणि आवश्यक तितके भांडवल लोकसहभागातून उभे करण्याची क्षमता हे आषाढीचे मुख्य सोशल कॅपिटल. तेही एका उत्तम प्रकल्पाच्या शोधात होते. प्रकृतीमुळे ती दिशा मिळाली आणि आषाढीअन्स भिडले..

“नारळाच्या तेल” हे भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध असल्याने सुरूवात VCO पासून करावी असे ठरले. शहरातील मॉल्समधे आणि ऑनलाईन VCO उपलब्ध होतेच. काही सँपल्स प्रकृतीने मुद्दाम मागवून घेतले. बहुतेक VCO वर “Cold Pressed” असे लिहीलेले असायचे. पण हे पुरेसे नव्हते. नारळ कडकडीत उन्हात न सुकवता काढलेल्या सर्वच तेलांना VCO म्हणायची पद्धत होती. भारतात Desiccated Coconut (सुकवलेले खोबरे) देखील घाण्यातून काढतात व त्या तेलाला VCO म्हणतात. हे खोबरे उन्हात सुकवण्या ऐवजी इंडस्ट्रीअल ड्रायर्समधे सुकवतात. काही उत्पादक बॅक्टेरीया कल्चरच्या वापराने नारळाचे तेल “सडवून” त्यापासून VCO काढतात… पण VCO काढायची खरी तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे नारळाच्या दुधाला घुसळून! 10000RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनीक प्रक्रीया नाही की तापमान वाढवत नाही. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध VCO मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम VCO ठरते. स्थानिक VCO नावाला कोल्डप्रेस असते, पण दर्जा तो नसतोच! हीच पोकळी आषाढी व्हेंचर्स ने हेरली आणि “कोकणातील उत्तम प्रतिच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे VCO बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे” ह्या ध्येयाने सुरूवात झाली आषाढीच्या पहिल्या वहिल्या उत्पादनाची… इकडे प्रकृतीलाही पुत्ररत्न झाले… आणि मग आषाढीच्या उत्पादनाचे आणि प्रकृतीच्या बाळाचे नाव ठरले “अक्षत”!

Your valuable comment please..

This Post Has One Comment

  1. Aniruddha Ramchandra Patil

    आपले शेअर्स घेण्या साठी काय करावे लागेल ?