कोरोना काळात कोरावर ऍक्टीव्ह झालो आणि अनेक लोकांशी परीचय झाला. अनेक लोकांनी माझे विविध अनुभव ऐकून पर्सनल मेसेजेस पाठवले. कमेंट्सचा तर पाऊस आहे. काहींनी सल्ले विचारले तर काहींनी काय नविन करता येईल असा देखील विषय केला.. हे सारे बॅकग्राऊंड पाहता, माझी इच्छा आहे कोरावर एक वेगळा प्रयोग करण्याची..
कोरावर जाणवणारी एक छान गोष्ट म्हणजे आपण सारे एकमेकांच्या “विचारांना, अनुभवांना” फॉलो करतो. चेहरा न पाहता, केवळ आपण दिलेले उत्तर, त्यामागची प्रामाणिक भावना समजून त्या प्रमाणे ऍक्सेप्ट/रिजेक्ट करतो.. राजकीय आणि धर्म अशा विषयांवरील भाष्य थोडे बाजूला ठेवू, पण कोरावर फेसबुक ट्विटरसारखी थिल्लरगिरी चालत नाही जे छान वाटते. वैचारीक मतांतरे असतात, मतभेदही असतात.. पण ते विषयापुरते मर्यादीत. माझी मते थोडी पुरेगामी, भाजप/मोदी विरोधी अशा स्वरूपाची असली तरी माझे कोरावर अशा अनेकांबरोबर चांगले आणि आदरयुक्त मैत्रीचे संबंध आहे. म्हणजे मला देखील माझे मत बदलायची गरज नाही, समोरच्याला त्याचे, तरी आमची मैत्री आहे.. हे फार छान आहे.. हेल्दी आहे.. मग अशा वातावरणात परस्पर विश्वास अधिक दृढ होत जातो, संबंधातला ओलावा टिकून राहतो.. आणि हे खूप चांगले वातावरण आहे आपल्या संबंधांना थोडे अधिक मूर्त स्वरूप द्यायचे..
कोरोना पश्चात काळात निर्माण होणारी विवीध आव्हाने आणि संधी पाहता, आपण सर्वांनी मिळून एक स्टार्टअप कंपनी चालू करावी का?? अगदी थोडक्यात, आपण एक पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करायची, आणि एक आयडीया घेऊन त्यावर काम करायचे… आणि भविष्यात जेव्हा ही कंपनी यशस्वी होईल तेव्हा त्याचा फायदा आपापल्या योगदानानुसार आपल्या सर्वांना होईल.. आपण सारेच शेअरहोल्डींगच्या माध्यमातून कंपनीचे तितक्या शेअरपुरते मालक आहोत. कंपनी कशी चालते, काय ठरते, काय प्रगती हे सारे कायदेशीर रित्या कळूच शकते. कंपनी यशस्वी होऊ लागली तर डिव्हीडंडच्या माध्यामातून सर्वजण प्रॉफीट शेअर करणारच.. शिवाय इमर्जंन्सीमधे शेअर्स विकूही शकता. ऑफीशिअली भारत सरकारच्या नियमानुसार बनलेली पब्लिक लिमिटेड कंपनी. अधिकृत.
आणि हा केवळ कोराच नाही, सोशल मिडीयावरचा सर्वात वेगळा प्रयोग ठरेल..
एक छोटे उदाहरण पहा – १०००/- चा एक शेअर. असे किमान १० शेअर्स घ्यावे लागतील. जर आपण १०० शेअरहोल्डर ऊभे करू शकलो, तर दहा लाख रूपयांचे शेअर कॅपिटल ऊभे राहील. हे झाले कॉमन व्यासपिठ. आणि आपण सारे ह्या व्यासपिठाचे सामूदाईक मालक. प्रत्येकजण त्या व्यासपीठावर आपापल्या वकुबाने काही ना काही करू शकतो. आणि जशी कंपनी प्रगती करत जाईल तसा फायदा मिळू शकतो. अनुभव तर अमुल्यच. आणि दुसरी बाजू पहा.. समजा ३-४ वर्षे प्रयोग करून ही कंपनी पूर्ण बुडाली, तरी तुमचे नुकसान प्रत्यक्ष किती?? केवळ १००००/- .. पण तुम्हाला अनुभव कितीचा आला? १० लाखाची कंपनी चालवण्याचा! ही आहे सोशल एंटरप्रेनरशीपची ताकद.. एक हजार समविचारी सहकाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवल्यास, आज १०००० ची रिस्क तुम्हाला १ कोटीच्या अशा प्रोजक्टचे भागीदार बनवू शकते. जी तुम्हाला भविष्यात १०० कोटींच्या कंपनीकडे नेऊ शकते…
मूळ उत्तर : .. Quora सारख्या सामाजिक मंचाचा वापर करून स्टार्टअप शक्य आहे का?
माझा कल्पनेतून आणि कोरावरील अनेक समविचारी (वेड्या??) लोकांच्या प्रयत्नातून आकारास येणारी “आषाढी व्हेंचर्स” ही एक “सोशल स्टार्टअप” आहे. सोशल मीडियावर स्टार्टअप असा हा पहिलाच प्रयोग आहे. हो प्रयोगच म्हणायला हवा..
आम्हाला … आणि तुम्ही सामील झालात तर आपल्याला… प्रत्यक्ष एक सोशल स्टार्टअप उभारायचा असून त्यात सोशल कॅपीटल, सोशल एफर्ट, सोशल बेनीफीट हे तिन विषय साध्य करायचे आहेत. आणि हे तिनही “सोशल” असल्याने ते कुणी एकटा करू शकणार नाही. जितके जास्त सहकारी तितकी जास्त चांगली ऍक्टीव्हिटी! हा आपण प्रत्येकाने करायचा विषय आहे. आपला प्रत्येकाचा ह्यात समान सहभाग असणार आहे.. आणि ह्याच्या यशापयशासाठी आपण सारे समान जबाबदार आणि भागीदार असणार आहोत.. हा अशा प्रकारचा पहीलाच प्रयोग आहे जो तुम्ही मी आपण सारे एकत्र येऊन घडवतोय.. तेव्हा आपण जे काही करणार ते “मॉडेल” म्हणून जगात प्रसिद्ध होणार आहे.. आपण केलेल्या चुका देखील अभ्यासाचा विषय असेल..
आपण जो करतोय तो एक Social Experiment आहे.. म्हणजे सामाजीक प्रयोग! विवीध विभागातील लोकांनी एकत्र येऊन काहीतरी विधायक करायचे असे साधे सोपे ह्याचे स्वरूप आहे… कुठलाही प्रयोग, आयडीया छोटी किंवा सोपी असली म्हणून फालतू नसते.. आपण कशा प्रकारे तिला प्रसारीत करतो, इंप्लिमेंट करतो ह्यावर बरेच अवलंबून आहे.. छोटे उदाहरण झुकरबर्गच्या फेसबुकचे.. सोपा विषय की तुम्ही काहीही करत असाल तरी एखादा फोटो काढा आणि शेअर करा.. पाहता पाहता ती जगातील सर्वात मोठी आणि प्रभावी कंपनी झाली.. आयडीया जितकी सोपी, साधी, सरळ तितकी ती प्रभावी होत जाते.. तिचा व्याप वाढत जातो.. तर आपल्या सोशल एक्सपरीमेंट मधे आपण साध्य करण्याच्या प्रयत्नात आहोत – सोशल इंटरप्रेनरशीप… म्हणजे नक्की काय??
समुहाने एकत्र येऊन.. ज्याला जे जमेल तसा सहभाग करून.. काहीतरी व्यवसाय करायचा आणि त्यातून सर्वांचा त्यांनी केलेल्या कामाच्या/व्यवाच्या प्रमाणात फायदा करून घ्यायचा ह्याला म्हणतात सोशल इंटरप्रेनरशीप ..