Indrayani Rice
₹75 – ₹375
Authentic Indrayani Rice. Sourced from farmers of Ajra Region. Fresh Stock.
खात्रीचा दर्जेदार इंद्रायणी तांदूळ. आजऱ्यातील शेतकऱ्यांकडून बांधावर खरेदी केलेला ह्या वर्षीचा भात!
Description
If the amylose content in rice is less than 20 percent, it becomes soft and sticky. Amylose is 18 to 19 percent in Indrayani. So it becomes sticky. The fragrance of Indrayani is due to the components TuAP. But good weather is also needed for fragrance. When the rice crop is in flowering stage, only when the humidity is 69 to 74 percent, it gets aroma. Its aroma and taste increases further on the edge of the hill. Basmati is good for biryani, but for curry rice, pithla bhat, dal rice, rice metkoot, dal khichdi, Indrayani is the best. So it is more in demand from all urban areas.
Ambemohor and Ajraghansal, two rice varieties in the state have received geographical classification. Both the rices are non-Basmati and are in demand all over the world. But its cultivation has stopped and very few farmers cultivate it. Very little quantity of AmbeMohor is available in the market now. Hence gourmands turned to Indrayani. All the properties of Ambemohor have come in Indrayani rice. It is also called Ambemohor’s puppy. Indrayani river flows through Pune district. She has special importance in Varkari. Therefore, this hybrid variety was propagated to Vadgaonmaval. Then he was given the name “Indrayani”.
characteristics
- Aromatic like mango, sweet, soft to eat, but slightly butka, suitable for hot weather to some extent, resistant to bacterial and karpa disease, this variety has good yield.
- Indrayani is a very digestible rice. As it is soft, children and old people do not have difficulty in biting.
- Since it is sticky, dal rice tastes good even without ghee. Gavran ghee enhances its taste even more.
- Indrayani is nutritious. Earlier, pregnant women and children were given a page of rice. At that time Ambemohor and then Indrayani were paged.
- Iron, Zinc is good in Indrayani. Indrayani contains ‘antioxidant’ component. Vitamin C is high.
- Nitrogen level is less than 30 percent. So there is no risk of cancer from this rice.
Being sweet, however, its glycemic index is slightly higher. People with diabetes have to use it with caution.
आंबेमोहोर हा तांदळाचा देशी वाण. त्याच्या सुगंधाबरोबरच गोड चवीमुळे तो बासमतीप्रमाणेच शेकडो वर्षे खवय्यांच्या पसंतीला उतरलेला होता. आंबेमोहोरला सुवास, चव, गावरान परंपरा आहे. पण, त्याच्या काही उणिवादेखील आहेत. त्याचे हेक्टरी उत्पादन फक्त १८ ते २० क्विंटल आहे. हे वाण कीड-रोगांना लवकर बळी पडणारे आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या या तांदळाचे उत्पादन पाऊस अधिक झाल्यास कमी होते. त्यावर करपा रोगही होतो. या अडचणींना सोडविण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या, वडगाव मावळ येथील संशोधन केंद्रातील डॉ. कळके यांनी आंबेमोहोरचे मूळ उत्तम गुण कायम ठेवत त्यात सशक्तपणा व जादा उत्पादनाचा गुणधर्म आणण्याचा विडा उचलला. आंबेमोहोर व १५७ आयआर ८ या दोन तांदळाच्या जातींचा संकर करण्यात आला. त्यातून १९८७ साली इंद्रायणी ही जात विकसित करण्यात आली. त्यानंतर शेतकरी आंबेमोहोरऐवजी या तांदळाकडे वळले. आता सह्य़ाद्रीच्या कडेला असलेल्या सखल भागात कोल्हापूरपासून ते घोटीपर्यंत त्याची लागवड सुरू झाली.
तांदळामध्ये अमायलुज हा घटक २० टक्क्यांपेक्षा कमी असला की तो मऊ, चिकट होतो. इंद्रायणीमध्ये अमायलुज हा घटक १८ ते १९ टक्के आहे. त्यामुळे तो चिकट होतो. इंद्रायणीचा सुगंध हा टूएपी या घटकांमुळे येतो. मात्र सुवासाकरिता अनुकूल हवामानही लागते. तांदळाचे पीक फुलोऱ्यात असताना आद्र्रता ही ६९ ते ७४ टक्के लागते तरच त्याला सुगंध येतो. डोंगरदऱ्याच्या कडाकाठाला त्याचा सुगंध व चव आणखी वाढते. बासमती हा बिर्याणीसाठी ठीक, पण आमटीभात, पिठलंभात, दाळभात, भाताचे मेतकूट, दाळ खिचडी याकरिता मात्र त्याची इंद्रायणीच उत्तम लागतो. त्यामुळे त्याला सर्वच शहरी भागातून अधिक मागणी आहे.
राज्यातील आंबेमोहोर व आजराघनसाळ या दोन तांदळाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. दोन्ही तांदूळ हे बिगरबासमती असून त्यांना जगभर मागणी आहे. मात्र त्याची लागवड थांबली असून फार मोजकेच शेतकरी लागवड करतात. बाजारात आता आंबेमोहोर तांदूळ फारच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. दुधाची तहान ताकावर भागविणे असा प्रकार झाल्याने खवय्ये हे इंद्रायणीकडे वळले. आंबेमोहोरचे सारे गुणधर्म इंद्रायणी तांदळात आले आहेत. त्याला आंबेमोहोरचे पिल्लू असेही गमतीने म्हटले जाते. पुणे जिल्हय़ातून इंद्रायणी नदी वाहते. वारकरी संप्रदायात तिला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वडगावमावळला हा संकरित वाण प्रसारित केला. तेव्हा त्याला “इंद्रायणी” नाव देण्यात आले.
वैशिष्टय़े
- आंबेमोहोरसारखाच सुगंधी, गोड, खाण्यास मऊ, मात्र काहीसा बुटका, उष्ण हवामानालाही काही प्रमाणात अनुकूल, जिवाणूजन्य व करपा रोगास प्रतिकारक असलेल्या या वाणाचे उत्पन्न चांगले येते.
- इंद्रायणी हा पचायला खूपच चांगला तांदूळ आहे. तो मऊ असल्याने लहान मुले व वृद्धांना चावायला त्रास होत नाही.
- तुपट असल्याने तूप नसले तरी डाळभात चांगला लागतो. गावरान तुपाने तर त्याची चव आणखीच वाढते.
- इंद्रायणी हा पौष्टिक आहे. पूर्वी गरोदर महिला व मुलांना तांदळाची पेज दिली जात असे. त्या वेळी आंबेमोहोर व नंतर इंद्रायणीची पेज केली जात असे.
- इंद्रायणीत लोह, जस्त चांगले आहे. इंद्रायणीत ‘अॅण्टिऑक्सिडंट’ घटक आहे. सी जीवनसत्त्व अधिक आहे.
- नायट्रोजन पातळी ही ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या तांदळापासून कर्करोगाचा धोका नाही.
गोड असल्याने मात्र त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा थोडासा जास्त आहे. मधुमेह असलेल्यांना त्याचा वापर थोडा जपून करावा लागतो.
Additional information
Weight | 5 kg |
---|---|
Weight | 1 Kg, 5 Kg |
Rameshwar Ghule (verified owner) –
आतापर्यंत चा वेगळा अनुभव, सुगंधी, चविष्ट, पौष्टिक.
Rameshwar Ghule (verified owner) –
इंद्रायणी तांदूळ, आतापर्यंत च्या तांदळापेक्षा वेगळा अनुभव सुगंधी, चवदार, पौष्टिक.
Amit –
Good