Wood Pressed Groundnut Oil
Original price was: ₹495.₹450Current price is: ₹450.
1 Litre
“Honest Oil” is 100% natural, chemical free, wood pressed oil; which is carefully purified, disinfected & activated to make it healthy and reliable. So you can trust it for whole family, including the little ones.
Description
There are two main types of edible oil : Refined Oil & Cold Pressed Oil
Refined oil is a chemical concoction made by superheating all sorts of cheap oils like palm, mineral & even expired oils at very high temperature. Many chemical processes are conducted to make it odour-free & colourless. Then artificial flavours & pigments are added to make it taste like peanut or other vegetable oils.
All those processes turn it into “oil like chemical”. It can mess with your health in all sorts of bad ways like causing throat infections, weight gain, heart problems, blood pressure, constipation, anxiety, diabetes & what not! It has extremely low nutrition & high health risks. In fact, refined oil is considered slow poison.
On the contrary, there is wood pressed oil. It’s made by traditional way, by crushing fresh oilseeds. Sounds good? Well, not exactly. This oil is very dirty & full of impurities. One can actually see the gunk floating in it & it’s not even filtered properly. Plus, there’s always a doubt about how clean & hygienic the equipment & people handling it.
But Fear Not! There’s Solution
“Honest Oil” is 100% natural, chemical free, wood pressed oil; which is carefully purified, disinfected & activated to make it healthy and reliable. So you can trust it for whole family, including the little ones.
Say Goodbye To Worries
Enjoy Your Cooking With Honest Oil!
खाद्यतेलाचे दोन मुख्य प्रकार आहेत: रिफाईंड तेल आणि घाण्याचे तेल. ही गोष्ट आहे तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाची…
रिफाइंड ऑइल : वनस्पतींमधून अधिकाधिक प्रमाणात पिळवटून तेल काढण्यासाठी उच्च तापमान, दाब आणि रासायनिक विद्रावके वापरतात. यामुळे तेल एक प्रकारे सडते, धूसर होते आणि त्यांचे अनेक नैसर्गिक गुणधर्म आणि चांगुलपणा गमावतात. रिफाइंड तेल हे अशा प्रकारे सोल्वंट एक्स्ट्रॅक्ट करून काढलेले तेल, पामतेल, खनिज तेल आणि अगदी खराब झालेले तेल यांसारख्या सर्व प्रकारच्या स्वस्त तेलांना अतिउच्च तापमानात गरम करून बनवलेले रासायनिक मिश्रण आहे. गंधमुक्त आणि रंगहीन करण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. हेग्झेन सारखे घातक पदार्थ वापरतात. हायड्रोजन इंजेक्शन वापरून शेल्फलाईफ वाढवतात. हे करत असताना सर्व तेलामधील सर्व मौल्यवान आणि नैसर्गिक घटक काढून टाकले जातात. त्याऐवजी, ट्रान्स फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शेवटी त्यात राईसब्रान, शेंगदाणा किंवा इतर वनस्पती तेलांसारखी चव देण्यासाठी कृत्रिम चव आणि रंगद्रव्ये मिसळली जातात. ह्यामुळे मुळात तुम्ही जे शेंगदाणा तेल म्हणून घेता ते मुळात शेंगदाणा तेल नाहीच. ते शेंगदाणा तेलाची चव असलेले एक तेलासारखे रसायन आहे.
त्या सर्व प्रक्रियांमुळे जे “तेलासारखे रसायन” बनते ते शरीरातील चांगले एचडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन, ट्रायग्लिसरायड्स आणि हानिकारक LDL कोलेस्टेरॉलचे स्तर वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. शिवाय घशाची खवखव किंवा इंफेक्शन, वजन वाढणे, श्वास/दम लागणे, हृदयाच्या समस्या, रक्तदाब, बद्धकोष्ठता, चिंता, मधुमेह अशा सर्व प्रकारच्या वाईट मार्गांनी ते तुमच्या आरोग्याशी गडबड करू शकते! शिवाय ह्यातील ट्रान्स फॅट्समुळे कर्करोग, मधुमेह आणि रोगप्रतिकारक प्रणाली समस्या देखील होऊ शकतात हे अनेक प्रयोगात सिद्ध झालेले आहे. ह्यात पोषण अत्यंत कमी पण आरोग्याला धोके जास्त आहेत. खरे तर रिफाइंड तेल हे स्लो पॉयझन मानले जाते.
मग पर्याय राहतो घाण्याचे तेल!
हे तेल ताज्या तेलबिया ठेचून पारंपारिक पद्धतीने बनवले जाते. कुठलेही रसायन नाही की प्रक्रीया नाही! छान वाटतंय ना?
बरं, पण हे अर्धसत्य आहे. हे तेल अतिशय घाणेरडे आणि अशुद्धतेने भरलेले आहे. आपण तेलात तो अविद्राव्य गाळ प्रत्यक्षात तरंगताना पाहू शकतो, तो नीट फिल्टरही केलेला नाही. शिवाय घाणा, उपकरणे आणि ते हाताळणारे लोक किती स्वच्छ आहेत याबद्दल नेहमीच शंका असते.
घाण्याच्या तेलावर जेव्हा आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अपारंपारीक फिल्टर वापरून पाहिले तेव्हा आम्हाला मिळाले हे –
ही दुधाची अटवलेली घट्ट साय नाही. हे आहे आपल्या “घाण्याच्या शुद्ध तेलातील घाण”. साधारण 4–5% ह्या impurities आणि contamination आपण रोज खातोय.. का? अहो घाण्याचे तेल म्हणजे 100% नैसर्गिक, काही त्रास होऊच शकत नाही अशी आपली (गैर)समजूत ना?
बरे घाणावाल्याला विचारले की फिल्टर का करत नाही तर तो म्हणतो की, “आम्ही नैसर्गिक तेल विकतो” .. अरे पण आपण नैसर्गिक म्हणून केळं सालीसकट खातो का? माकडापासून प्रगत होत आपण माणूस झालो ना? काय घ्यायचे आणि काय टाळायचे इतके तर आपल्याला कळतेच ना!
आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की घाण्याच्या तेलाचे इतके प्रॉब्लेम तर नक्की खायचे तरी काय? पण काळजी करू नका. आषाढीमधे आम्ही प्रॉब्लेम्सवर काम करत नाही, चर्चा करत बसत नाही. आषाढी मधे आम्ही जबाबदारी घेतो, अभ्यास करतो, प्रयोग करतो आणि प्रॉब्लेमवर उपाय काढतो! पर्याय उपलब्ध करतो.
पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याची योग्य सांगड घालत आम्ही, आषाढी व्हेंचर्स, सादर करत आहोत “Honest Oil”. 100% नैसर्गिक, पण काळजीपूर्वक शुद्ध केलेलं, कुठलेही केमिकल न वापरता, उष्णतेचा वापर न करता, समुद्री मिठाने निर्जंतुक केलेलं आणि चांदीने प्रभावित केलेले सुरक्षित, विश्वासार्ह व्हर्जिन प्रतिचे खाद्यतेल. त्यामुळे तुम्ही लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी त्यावर विश्वास ठेवू शकता.तेव्हा आता काळजी सोडा आणि बिनधास्त ऑनेस्ट तेलाने आपल्या स्वयंपाकाचा आनंद घ्या!
Additional information
Weight | 1 kg |
---|
Nikhil Shinde –
घाण्याचे तेल असून देखील कसलाही उग्र वास नाही की जास्तीचा धूर नाही. आत्तापर्यंत नेहमी घाण्याचे तेल वापरत आलो परंतु “Honest” सारखे तेल कधीच भेटले नव्हते. Thanks team इतके चांगले प्रॉडक्ट लाँच केल्याबद्दल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही पदार्थ करताना comparatively तेल कमी लागते आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यावर जाणवतो तसा जडपणा जाणवत नाही.
Sanjay Pai –
किचनसाठी अप्रतिम . अतिशय हलकेफुलके आणि घाण्याच्या तेलातील साका गाळ आणि कम्प्युटरीटीज काढल्याने निश्चितच अनसॅच्युरेटेड फॅट्स नाहीसे झालेत.
स्वयंपाकावेळी उग्र वास नाही आणि पचायला कसलाच त्रास आजवर झाला नाही.
भजी वडे तळल्यानंतरही तेल काळे पडले नाही . रिफाईंड तेलासारखेच स्वच्छ राहिले.
गृहलक्ष्मीच्या हाती ऑनेस्ट तेल आल्यावर पहिल्याच दृष्टीत प्रसन्नता दिसली ती अतिशय आकर्षक पकडायला सोपी अशी बोटल आणि त्यावरील लिखाण .
हे आरोग्यदायी ऑनेस्ट जरी ४९५ रूपये किंमतीचे असले तरी त्यात कुठलेही ब्लेंडिंग नाही .केमिकल्स नाहीत . प्रिझरवेटीव नाहीत.
मीठाने शोषलेली आर्द्रता ,टाकाऊ घटक आणि नविन तंत्रज्ञानाने चांदीसह सिद्ध केलेली शुद्धता ही याची वैशिष्ट्ये आजारांपासुन दूर तर ठेवतीलच आणि सोबत यातेलात शिजलेले जेवण खाल्ल्यावर
शरीराला पचनाचा हलकेपणा जाणवतो .
Mahesh Khamitkar –
Aaashadhi ventures a social start up brings with filtered Groundnut oil which is used by me having good results. Thanks Honest Oil for such a wonderful product!!
VINOD KAWALE –
रिफाइंड तेलाबद्दल वाचताना मला माहिती झाली की हे तेल अत्यंत गरम केले जाते व ते क्लिअर दिसण्यासाठी केमिकलचा देखील वापर केला जातो हे करत असताना त्यातील जीवनसत्वे आणि नैसर्गिक गंध नष्ट करून लोकांच्या आवडीचा कृत्रिम गंध दिला जातो हे देखील कळले तेव्हा आम्ही माझा मोर्चा घाण्याच्या तेलाकडे वळवला.
पण घाण्याचे तेल वापरताना आगीतून फुफाट्यात आलो की काय असे वाटू लागले कारण घाण्याचे तेल वापरल्यानंतर मला तोंड येणे एसिडिटी अपचन असे विविध त्रास होऊ लागले. बरं हे तेल जास्त दिवस राहिले तर त्याला कुबट वास यायचा.
पदार्थ तळण्यासाठी वापर केला तर फेस यायचा धूर यायचा मग कंटाळून मी घाण्याचे तेल बंद केले आणि घाण्याचेच पण स्वच्छतेची काळजी घेऊन नैसर्गिक रित्या त्यातील अनावश्यक घटक काढलेले तेल कुठे मिळते का याचा मी शोध सुरू केला.
अक्षत वर्जिन कोकोनट ऑइल या नारळाच्या दुधापासून औषधी गुणधर्म असलेले तेल बनवणाऱ्या आषाढी-वेंचर्स या मराठी लोकांच्या कंपनीने सत्वहीन रिफाइंड तेलाला आणि लाकडी घाण्याच्या अशुद्ध तेलाला पर्याय शोधला आहे असे मला समजले.
चेक करावे म्हणून मी एक लिटर तेल मागवले तर मला या तेलाचा खूपच चांगला अनुभव आला त्यामुळे मी मित्र नातेवाईकांना देखील या तेलाची शिफारस केली आहे.
Sujit Supekar –
मुळात रिफाईनड तेलाला खाद्यतेल म्हणावेच की नाही असा प्रश्न पडलाय आणि इतके दिवस घाण्याचे तेल जे चांगले म्हणत होतो त्यातील अशुद्धता पाहता शुद्ध अश्या घाण्याच्या तेलाचा पर्याय अनिवार्य होता. उत्तमोत्तम आरोग्यदायी आणि विश्वासपात्र उत्पादने आणणाऱ्या आषाढीचे आभार की त्यांनी ही एक चिंता आता मिटवली. स्वस्त भेसळयुक्त आणि अशुद्ध तेलाचे आरोग्यावरील परिणाम पाहता हे खाद्यतेल घेण्याविषयी कुठलीही शंका नाही.
Dhruv S Palekar –
Me too was aware of health issues arising out of refined oils so naturally the choice was wood pressed groundnut oil. However recently I happened to see a post showing sticky lump of impurities collected from so called natural wood pressed groundnut oils available in market. The alternative was also there. It was “Honest” wood pressed oil.
So there’s no second opinion. I WILL not only use the “Honest “ but shall recommend to my friends and relatives!!
विनय सामंत –
मला रिफाईंड तेलाचे दुष्परीणाम माहित होते. पण घाण्याचे तेल इतके गढूळ आणि घाणेरडे दिसते की घ्यायची हिंमत नव्हती. आषाढीने हा छान पर्याय उपलब्ध केला आहे. ह्या ऑनेस्टी साठी धन्यवाद आषाढी!