काय आहे आणि काय नाही??
ही मोटीव्हेशनल स्वरूपाची ऍक्टीव्हिटी नाही. कंसल्टींग नाही. ऍडवायजरी फोरम नाही. हे समविचारी लोकांना एकत्र येऊन काहीतरी वेगळे प्रत्यक्ष करायचे आहे.. ते देखील आता.. लवकरात लवकर.. अशा कर्मप्रधान लोकांचा समूह बांधायची आणि त्यातून एक प्रत्यक्ष स्टार्टअप घडवायची ही व्यवस्था आहे..
आपल्याला प्रत्यक्ष एक सोशल स्टार्टअप उभारायचा असून त्यात सोशल कॅपीटल, सोशल एफर्ट, सोशल बेनीफीट हे तिन विषय साध्य करायचे आहेत. आणि हे तिनही सोशल असल्याने ते कुणी एकटा करू शकणार नाही. हा आपण प्रत्येकाने करायचा विषय आहे. आपला प्रत्येकाचा ह्यात समान सहभाग असणार आहे.. आणि ह्याच्या यशापयशासाठी आपण सारे समान जबाबदार आणि भागीदार असणार आहोत.. हा अशा प्रकारचा पहीलाच प्रयोग आहे जो तुम्ही मी आपण सारे एकत्र येऊन घडवतोय.. तेव्हा आपण जे काही करणार ते “मॉडेल” म्हणून जगात प्रसिद्ध होणार आहे.. आपण केलेल्या चुका देखील अभ्यासाचा विषय असेल..
कपया लक्षात घ्या की ही कुठल्याही “Get Rich Quick” प्रकारची स्किम किंवा नेटवर्क मार्केटींगचा भाग नाही.. इथे मी कुठल्याही “नेटवर्क मार्केटींग” कनसेप्टचे समर्थन करत नाही. कुठल्याही पटकन श्रीमंत स्किम मधे माझा विश्वास नाही. आपल्याला समविचारी लोकांना एकत्र येऊन एक सोशल स्टार्टअप बनवता येतो का अशा प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत. आणि हे १००% लिगल काम आहे. इथे तुम्ही पैसे भराल (अजून ठरले नाही!) तर तुम्हाला त्याचे ऑफीशिअल शेअर्स मिळतील व तितक्या भागा पुरते तुम्ही कंपनीचे मालक असाल.. आणि कुणालाही कुठल्याही स्वरूपात कमीशन मिळणार नाही. .. ही आपली सर्वांची कंपनी असेल आणि सर्वांची ह्यात समान जबाबदारी असेल. भविष्यात ही कंपनी यशस्वी झाली तर आपण सारे ह्याला जबाबदार असू आणि फेल गेली तर त्याची जबाबदारी देखील आपलीच असेल..
आपण जो करतोय तो एक Social Experiment आहे.. म्हणजे सामाजीक प्रयोग! विवीध विभागातील लोकांनी एकत्र येऊन काहीतरी विधायक करायचे असे साधे सोपे ह्याचे स्वरूप आहे… आणि कुठलाही प्रयोग, आयडीया छोटी किंवा सोपी असली म्हणून फालतू नसते.. आपण कशा प्रकारे तिला प्रसारीत करतो, इंप्लिमेंट करतो ह्यावर बरेच अवलंबून आहे.. छोटे उदाहरण झुकरबर्गच्या फेसबुकचे.. सोपा विषय की तुम्ही काहीही करत असाल तरी एखादा फोटो काढा आणि शेअर करा.. पाहता पाहता ती जगातील सर्वात मोठी आणि प्रभावी कंपनी झाली.. आयडीया जितकी सोपी, साधी, सरळ तितकी ती प्रभावी होत जाते.. तिचा व्याप वाढत जातो.. समुहाने एकत्र येऊन.. ज्याला जे जमेल तसा सहभाग करून.. काहीतरी व्यवसाय करायचा आणि त्यातून सर्वांचा त्यांनी केलेल्या कामाच्या/व्यवाच्या प्रमाणात फायदा करून घ्यायचा ह्याला म्हणतात सोशल इंटरप्रेनरशीप ..
कोरावर विचारलेल्या आणि व्हाट्सऍप/टेलीग्राम ग्रुपवरील शंका/विचार खाली देत आहे –
- बरेच जणांना वाटत असेल की प्यूअर आयटी/संगणक संदर्भातील ऍक्टिव्हीटी आहे की काय. तर ते तसे नाही. ह्यातचे ऍप किंवा वेबसाईट जरी आयटीचे असेल किंवा आपण प्रचार प्रसारासाठी डिजीटल माध्यमांचा वापर करू हे खरे. पण कंटेट शोधणे, डेव्हलप करण्यापासून ते पोचवण्यापर्यंत अनेक विषय आहेत ज्यात तुम्ही थेट आयटीमधले नसताना देखील सहभागी होऊ शकता. तुम्ही आयटीमधले नसाल तरी फरक पडत नाही. तुम्ही करत असलेली गुंतवणूक, तुम्ही ह्या कंसेप्टच्या प्रचारासाठी करत असलेली मदत, ही कंपनी चालावी, मोठी व्हावी आणि ह्यातून समाजाचा फायदा व्हावा ह्यासाठी तुमच्या सद्भावना आणि सहकार्य हे सारेच अमूल्य आणि अत्यावश्यक आहे. केवळ कोडींग म्हणजे कंपनी नव्हे. आपण आपल्या उपक्रमात कोडींग व्यतिरीक्तही अनेक गोष्टींचा समावेश करणार आहोत ज्याचा फायदा अधिकाधिक मुलांना व पालकांना व्हायला हवा. आणि असे काय काय करता येईल ह्याबद्दल तुम्ही देखील आयडीया द्या.. सर्व सूचनांचे स्वागतच आहे. शिवाय आपल्यापैकी जे पालक आहेत किंवा होणारे पालक त्यांच्या दृष्टीने तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण सारेच आपली मुले, भाचे/पुतणे, मित्र/मैत्रिणींची मुले, आपल्या आजूबाजूची मुले इत्यांदीना ह्यात सामावून घेऊन हा कोर्स अधिकाधीक प्रभावी बनावा ह्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
- प्रत्येकाचा स्किलसेट वेगळा असला तरी ध्येय एक असायला पाहिजे. सर्व क्षेत्रातील आणि geography मधले contacts उपलब्ध होऊ शकतील.” – हा खूपच मोठा फायदा!
- ज्यांना प्रत्यक्ष काम करायचे आहे त्यांची टीम “executive body” म्हणून वेगळी काम करेल. तिथे देखील वेगवेगळ्या स्किलचे लोक लागतील, जे सारे शेअरहोल्डर्स असतीलच असे नाही. आपल्याला काही स्किल पैसे/सॅलरी देऊनही घ्यावे लागतील. कंपनी चालवण्यासाठी जे जे आवश्यक ते करूया. आणि ज्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नसेल ते केवळ शेअर्स घेऊन कंपनीचा आर्थीक कणा सांभाळावा. कंपनीच्या इंसेप्शन पासून प्रोसेसमधे सामील झालेले लोक जेव्हा कंपनीचा फायनान्स भक्कम राखतील तेव्हा कंपनी इंवेस्टरच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाही. केवळ शेअरहोल्डींग करून आणि कंपनीच्या आर्थीक व्यवहारांचे मॉनिटरींग करून देखील तुम्ही कंपनीच्या मुख्य प्रवाहात सामील राहू शकता. कंपनी आयटी-नॉनआयटी, महीला-पुरूष, सर्व धर्म-जाती, सर्व देश ह्यांसाठी खुली आहे. सुरूवात आपण मराठी भाषीकांसाठी करत आहोत. पण इतर भाषीकांना सामील होऊन त्यांच्या मातृभाषेची जबाबदारी घेणे शक्य असल्यास त्यांचेही सहर्ष स्वागतच आहे.
- Too many cooks spoil the food?? अनेक शेअरहोल्डर म्हणजे सारेच कुक झाले असे होणार नाही. काही लोकांनाच डायरेक्टर होता येते. पब्लिक लिमिटेड कंपनीवर ४० डायरेक्टर नेमता येतात. सारेच नेमले पाहीजे असे नाही. साधारण ५% मते/पाठींबा ज्या व्यक्तीला मिळवता येतात तो डायरेक्टरशीप क्लेम करू शकतो. किती शेअरहोल्डींग असताना किती डायरेक्टर असावेत, कुणाला काय अधिकार हे सारे कंट्रोल करणे पब्लिक लिमिटेड कंपनीत सोपे आणि कायदेशीर असते. खूप डेमोक्रेटीक कंट्रोल असतो.. आणि अशा प्रकारच्या सोशल व्हेंचर्समधून खरेच खूप मोठी कामे ऊभी राहू शकतात. PCPCL ही नारळाच्या उत्पादनांवर काम करणारी पलक्कडमधील कंपनी अशाच सोशल इनोव्हेशनचा अवतार आहे.. चॅलेंजेस येणारच. पण सर्वांची कंपनी असल्याने, प्रॉब्लेम/ चॅलेंजेस देखील सर्वांचे असतात, मिळून सोडवायचे असतात. चांगले प्रॉम्प्ट कम्युनिकेशन, पारदर्शकता, संवाद आणि परफॉर्मन्स ह्यातून आपण चांगला सोशल एक्सपरीमेंट करू शकतो..
- जास्त पैसे टाकणारा डोईजड होऊ शकतो. = हे होणार नाही. शेअरहोल्डर्स चा कंट्रोल असतो. शेअर्स कुणाला अलोकेट करायचे ह्याचे स्वातंत्र्य असते. ही लिस्टेड कंपनी नाही. त्यामुळे इनवेस्टरने मोठा स्टेक घेतला आणि तो डॉमिनेट करतोय असे होत नाही. आणि एखाद्या विषयात चुकीचे डॉमिनेशन असेल, बेकायदेशीर काही असेल, किंवा फसवणूकीच्या धर्तीवर तर शेअरहोल्डरना देखील कायदेशीर मार्ग आहेत. माहिती विचारायचा अधिकार आहे. नोटीस देता येते. निर्णय चॅलेंज करता येऊ शकतो. कमाल गुंतवणूक ५००००/- वर मर्यादीत करावी असा विचार आहे। अशाने एकचजण लाखो रूपयांचे शेअर्स घेऊन ताबा प्रस्थापित करू शकणार नाही
- हौसे, नवशे आणि आरंभशूर लोक जरा अडचण आली की आमचे पैसे परत द्या वगैरे मागण्या येऊ शकतात. = हे थोडे अडचणीचे ठरू शकते. पण ही काही मेंबरशीप स्किम नाही. ज्यांनी पैसे भरले त्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत. त्यांना ते बाळगणे शक्य नसेल तर त्यांनी विकावे आणि पैसे रिकव्हर करावे. लॉकींग पिरेड नंतर कंपनी देखील शेअर्स परत घेऊ शकते. आधी शेअर्स देतानाचा रिस्क आणि टाइमलाईन व्यवस्थित समजावलेली असली की अडचणी “कमी येतील”..
- पैश्याचा योग्य विनिमय करण्यावरून वाद निर्माण होऊ शकतात?? जर डायरेक्टर बॉडी योग्य प्रकारे निवडल्या आणि निर्णयप्रक्रीयेत पारदर्शकता असेल तर हे प्रॉब्लेम येणार नाही. आणि आयटी सारख्या क्षेत्रात मूळ गुंतवणूक कमी लागते. त्यामुळे अशा गडबडी टाळता येतात..
- प्रत्येकाला कामाचे assignment कोण करणार आणि त्याचा ट्रॅक कोण ठेवणार?? ही रचना डायरेक्टर ठरवतात. डायरेक्टर परफॉर्मन्स, अनुभव इ. विषयांच्या आधारे आणणे शक्य आहे. बदलणे शक्य आहे.. शिवाय गरजेनुसार एग्झीक्युशनसाठी वेगळी बॉडी आणता येऊ शकते.. एक असाही विचार करून पहा. केवळ १०००० ची गुंतवणूक करून, आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या हुषारी, स्किल, अनुभवाचा वापर करून स्वत: काय करू शकतो, कुणाला डायरेक्टर आणून काय चांगले घडवू शकतो आणि ह्या सर्वातून एक चांगला सोशल इफेक्ट साधतानाच थोडे अर्थकारणही कसे करू शकतो ह्याचा हा उत्तम प्रयोग होईल..
- माझी तरूण कोरन्स ना विनंती आहे की त्यांनी ह्या व्हेंचरमधे जास्त सहभाग घ्यावा. त्यांना ह्यातून विवीध संधी उपलब्ध होतील. उदा. ह्या कंपनीच्या लोकल फ्रँचायझी द्यायच्या असल्यास शेअरहोल्डरला प्राधान्य असेल..