महाराष्ट्र हा विचारी, मूल्यांची चाड असलेल्या, साधनशुचीतेचे महत्व जाणणाऱ्या लोकांचा प्रदेश आहे. महाराष्ट्राने आजवर नेहमीच भारतभूमीचे वैचारीक नेतृत्व केले आहे. स्वतंत्र्यपूर्व असो वा पश्चात, कॉन्ग्रेस असो वा संघ, समाजवादी असो वा कम्युनिस्ट सर्वच विचारधारांचा उगम व पोषण महाराष्ट्रात झालेले दिसते. ह्या विचारधारांनी तर ह्या देशावर इतके वर्षे प्रभाव टाकला आणि त्याला गतवैभव प्राप्त करून दिले...

पण आज घडीस "मराठी समाज" विवीध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेला दिसतो! नाहीतर गुंडगिरी व भांडवलशाही समोर पिचलेला दिसतो. राजकीय पुढारी, शासन व्यवस्था, प्रशासकीय अधिकारी आणि गुंड हे सारेच मराठी जनांच्या "नोकरदार मानसिकतेचा" आलटून पालटून फायदा घेताना दिसतात. उपजीविकेच्या मागे धावताना “जीवीका” कशी हरवून बसलो हे मराठी माणसाला कळलेच नाही. पैसे तर कमवतोय, करीअर करतोय, पुढील पिढी देखील घडवतोय पण ह्यातली पॅशन पूर्णपणे हरवली आहे. सारे काही यंत्रवत चालू आहे. मराठी अस्मिता व सत्शक्तिंच्या सामुहिक प्रभाव देखील आज शून्य झालेला स्पष्ट जाणवतो. म्हणूनच पैसा आणि सत्तेच्या गुर्मीत मराठी समाजाला गृहीत धरले जाते.

श्री दिनकर गांगल एक गोष्ट सांगत. पूर्वी गावात माळकरी/वारकरी लोकांची ५-६च घरे असायची. पण त्यांच्या शिलाचा, चांगुलपणाचा प्रभाव इतका होता की दारूडे/जुगारी लोक गुत्त्यावरून दारू पिऊन येताना ती घरे चुकवून लपून छपून जात असत. लोक दारू पित, चोऱ्या करत, फसवा-फसवी असायची, अराजक होते, गुन्हे घडत .. पण ह्याला प्रतिष्ठा नव्हती. कुणाकडे केवळ बळ किंवा पैसा आहे म्हणून त्याला वाटेल ते करायची "सोय" नव्हती. वारकरी, शिक्षक अशा प्रकारचे लोक गरीब होते, साधे होते पण त्यांच्या सदभावनेचा प्रभाव होता. त्यांच्या "विचारांना" किंमत होती. मान होता. आणि हा पैशाने किंवा बळाने विकला जात नसे! .. आता ही घडी विस्कटली.. आता अराजकतेला राजमान्यता आहे. समाजात अनाचाराला गौरव आहे. कायदा/नियम तर केवळ कागदी घोडे आहेत..

अशा वेळेस गरज आहे सत्शक्तिंच्या संघटनाची. समविचारी लोकांनी एकत्र यायची. पण हे सारे समविचारी लोक एका गावात नाही, एका ठिकाणी नाहीत. किंबहुना कोण कुठे आहेत ते माहीत नाही. सारेच राज्यभर, देशभर आणि जगभर विखूरलेले आहेत. शिवाय ह्यांना एका धाग्यात जोडू शकेल असा कार्यक्रम बनवणे हे देखील एक मोठे आव्हानच होते. मग उद्यमशील, धाडसी आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन काही अर्थपूर्ण आणि प्रभावशाली करावे अशा विचारातून आषाढीचा जन्म झाला..

स्टार्टअप का?

स्टार्टअप का?

सामील व्हा!

सामील व्हा!