महाराष्ट्र हा विचारी, मूल्यांची चाड असलेल्या, साधनशुचीतेचे महत्व जाणणाऱ्या लोकांचा प्रदेश आहे. महाराष्ट्राने आजवर नेहमीच भरतवर्षाचे वैचारीक नेतृत्व केले आहे. स्वतंत्र्यपूर्व असो वा पश्चात, कॉन्ग्रेस असो वा संघ, समाजवादी असो वा कम्युनिस्ट सर्वच विचारधारांचा उगम व पोषण महाराष्ट्रात झालेले दिसते. ह्या विचारधारांनी तर ह्या देशावर इतके वर्षे प्रभाव टाकला आणि त्याला गतवैभव प्राप्त करून दिले.

पण आज घडीस मराठी समाज विवीध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेला दिसतो! नाहीतर गुंडगिरी व भांडवलशाही समोर पिचलेला दिसतो. राजकीय पुढारी, शासन व्यवस्था, प्रशासकीय अधिकारी आणि गुंड हे सारेच मराठी जनांच्या “नोकरदार मानसिकतेचा” आलटून पालटून फायदा घेताना दिसतात. उपजीविकेच्या मागे धावताना “जीवीका” कशी हरवून बसलो हे मराठी माणसाला कळलेच नाही. पैसे तर कमवतोय, करीअर करतोय, पुढील पिढी देखील घडवतोय पण ह्यातली पॅशन पूर्णपणे हरवली आहे. सारे काही यंत्रवत चालू आहे. मराठी अस्मिता व सत्शक्तिंच्या सामुहिक प्रभाव देखील आज शून्य झालेला स्पष्ट जाणवतो. म्हणूनच पैसा आणि सत्तेच्या गुर्मीत मराठी समाजाला गृहीत धरले जाते.

आता गरज आहें संस्कृतीकरणाची. सत्शक्तींचा प्रभाव परत निर्माण करायची. पण ते पारंपारीक सेवाभाव आणि समाजकार्य मार्गाने नव्हे तर कालानुरूप आणि व्यवहारीक मार्गाने. म्हणून आषाढी!

निर्मिती सारखा आनंद नाही! काहीतरी बनवता यायला हवे आणि ते अनेक लोकांपर्यंत पोचवता यायला हवे. साधे पापड करून विकायचे ह्याला पॅशन आणि व्यवसाईकतेचे कोंदण दिले तर “लिज्जत पापड” सारखा हजारो कोटी रूपयांचा महिला सबलीकरणाचा प्रचंड मोठा सोशल एक्सपरीमेंट उभा राहतोच की! तेव्हा तुम्ही नक्की काय करता ह्याला फार महत्व नाही. ते कसे करता आणि त्याचा प्रभाव किती मोठा होत जातो हे महत्वाचे!

ह्या माध्यमातूनच सत्शक्तिंचा प्रभाव परत निर्माण करायचा आहे!

स्टार्टअप ही “केवळ” पैसे कमवायची संधी नाही. हा शोध आहे तुमच्यातील हरवलेल्या तुमचा. काय आहे तुमच्यात ते पडताळण्याची एक संधी. तुम्ही जे काही शिकलात, अनुभवलात ते परत चेक करायची, अनलर्न करायची, रिलर्न करायची संधी. “सोशल स्टार्टअप” ही एक अभिनव संकल्पना आहे. “Quora .com सारख्या सामाजिक मंचाचा वापर करून स्टार्टअप शक्य आहे का?” ह्या प्रश्नाच्या उत्तरात ही संकल्पना प्रथम मांडली गेली. अनेक सकारात्मक प्रतिसाद मिळाले आणि ही संकल्पना आकारास येत गेली. ही सामाजिक संस्था नाही. इथे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो. थोडक्यात समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला वेळ आणि रिसोर्सेस शेअर करून काहीतरी घडवायचे आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचे.

अर्थात हे सारे करायला आणि प्रत्यक्ष साकारायला यंत्रणा लागते, खर्चही येतोच. पण हा डोनेशन्स मधून येऊन उपयोगी नाही. कारण ऑब्लिगेशन्स येतात. जेव्हा तुमच्यावर दबाव असतो तेव्हा तुम्ही पॅशनेटली काम नाही करू शकत. म्हणून हे ‘कॅपीटल’ आपणच उभे करायला हवे. पण मग रिस्क येते. मर्यादा येते. म्हणून हे “कंपनीचे पण सोशल” स्वरूप. ‘आषाढी व्हेंचर्स’ ने १००० सभासदांच्या माध्यमातून १ कोटी रुपयाचे कॅपिटल उभे करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्यातून आम्हाला “गावरान” नावाचा एक ब्रँड बनवायचा आहे ज्या माध्यमातून आम्हाला गावखेड्यात बनणारे अकृत्रीम, चविष्ट, सत्वयुक्त पदार्थ शहरातील उंच इमारतींमधे घरपोच पोचवायचे आहेत.

आम्ही जे आषाढीमधे करतो आहोत ते महाराष्ट्रभर व्हायची गरज आहे. चळवळक्षम पद्धतीने. ठिकठिकाणची सर्जनशील आणि सत्शील लोक ह्यात जोडली गेली पाहिजे. ॲक्टिव्ह झाली पाहिजे. अशाने आपण पारंपारीक नोकरदार मानसीकतेतून बाहेर पडून काही घडवायला शिकू. आग्रह करायला शिकू. ह्यातून आपल्याला अमूल उद्योग समूहासारखे सक्षम आणि अर्थपूर्ण समाजकारण साधायचे आहे.

आषाढीमधे सामील होण्यासाठी आमचा व्हाट्सॅप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply to आशुतोष Cancel reply

This Post Has 5 Comments

  1. आशुतोष

    खूप छान! मलाही आपल्याबरोबर सोबत करायला आवडेल.

  2. सौ. सुलोचना संदीप कऱ्हाडकर

    अक्षत VCO मुळे आरोग्याचे फायदे तर मिळालेच त्यासोबत एक नवीन ओळख मिळाली. आज जेंव्हा लोक स्वतःहून अक्षत साठी विचारणा करतात तेंव्हा ते एक आरोग्य पूर्ण जीवन शैली स्वीकारत आहेत आणि त्यात आपला सहभाग आहे याचा आनंद होतो. मी पहिली अक्षत बॉटल स्वतः साठी मागवली होती. तिचा जो फायदा मला झाला तो इतरांना ही मिळवा महणून मी त्या बद्दल जवळच्या मित्र मैत्रिणींना सांगितले. त्वचा, केस, मौखिक आरोग्य सोबत माझ्या जवळच्या व्यक्तीच्या स्मृतिभांशवर अक्षत ने खूपच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. म्हणून मी आषाढी वेंचर्स ची अक्षत व ऑनेस्ट ऑइल फ्रेंचयाईजि घेतली. ज्याचा फायदा आता माझ्या कुटुंबा सहित माझ्या परिसरातील आरोग्य महत्व जाणणाऱ्या लोकांना ही होत आहे.

  3. सुरज आगाने

    मी सुरज आगाने सध्या पंजाब मध्ये आहे गाव पाटण जिल्हा सातारा मी साधारणतः एक वर्ष झाले अक्षत वापरतोय
    मागच्या आठवड्यातच सरांशी बोलणे झाले आणि मी माझ्यासाठी अक्षत पंजाब मध्ये ऑर्डर केले तसे अक्षत चे फायदे खूप आहेत आणि प्रत्येकाला वेगळा अनुभव येत आहे पण माझा अनुभव मला वेगळाच वाटला चार दिवसांपूर्वी मी किचन मधे एक पॅकेट सुरी ने कापताना बोट कापले गेले जखम खोल होती एक हातरुमाल भिजला तरी रक्त थांबत नव्हते समोर अक्षत होते डायरेक्ट जखमेवर ओतले आणि 2 सेकंदामध्ये रक्त थांबले
    एकटा असल्यामुळं घाबरलो होतो पण अक्षत बरोबर होते
    Thank you sir
    For magical product

  4. Vinod Rambhau Pawar

    मला आपला ऍप डाऊनलोड करण्यासाठी मदत करा.माझा मोबाईल आणि वाटसअप नंबर xxxx xxxx आहे.धन्यवाद

    1. आमचे कुठलेही ॲप नाही. वेबसाईटच आहे. कृपया आपला मोबाईल नंबर पब्लिकली शेअर करू नका