-23%
(6 customer reviews)

Walai Red Rice

Original price was: ₹195.Current price is: ₹150.

1Kg Pack

Walai is a native variety of red rice, found in costal Konkan region. This rice has the ability to provide quick energy, regulate and improve bowel movements. Regular consumption helps in stabilising blood sugar level and also slows down the ageing process. It is also a natural source of “Vitamin B1” which is essential for the human body. That is why this variety is considered as the best variety.

Description

वालई लाल तांदूळ (Walai Red Rice)

हा तांदूळ वालय (मूळ उच्चार : वालई) नावाने कोकणात आढळतो. लाल तांदूळ किंवा पोह्यांसाठी ही सर्वोत्तम जात. हा तांदूळ उंच वाढतो आणि ह्याच्या तृणांकुरामधे सत्व पटकन उतरते. ह्यामुळे ह्याच्या लोंब्या जड होतात व मोडून पडतात. ह्यामुळे ह्याचे खूप उत्पन्न फुकट जाते. त्यामुळे कोकणात देखील अत्यंत मर्यादीत प्रमाणात, अपवादानेच ह्याची शेती आढळते. पण हे भाताचे मूळ वाण असून ह्यामधे अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळतात. असे असतानाही कमी उत्पन्न आणि नुकसानीमुळे "वालई" हा उत्तम दर्जाचा तांदूळ संकरीत वाणांच्या शर्यतीत मागे पडत आहे, नाहीसा होत आहे...

तांदूळश्रेष्ठ वालई : ह्या तांदळामध्ये जलद ऊर्जा प्रदान करण्याची, आतड्यांच्या हालचालींचे नियमन आणि सुधारणा करण्याची क्षमता आहे. ह्याच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते आणि वार्धक्याची प्रक्रिया देखील मंदावते. तसेच मानवी शरीराला अत्यावश्यक असे "व्हिटॅमिन बी १" चा हा नैसर्गिक स्रोत आहे. म्हणूनच ह्या वाणाला सर्वश्रेष्ठ वाण समजतात.

वालई तांदूळ हा लाल तांदूळ जातीचा आहे. हे मूळ दक्षीण भारतीय किनाऱ्यालगतच्या परंपरागत जातींपैकी एक आहे. ह्यामधे विवीध जीवनसत्वे आणि भरपूर खनिजे असतात जे स्नायूंना बळकट करतात, मधुमेहाला नियंत्रणात ठेवतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ह्या तांदळाच्या ब्रानमध्ये असलेले समृद्ध मायक्रोफायबर पचन सुधारते, बद्धकोष्ठता बरे करते आणि आतड्यात असलेले विषारी पदार्थ साफ करते.

वालई तांदूळाच्या ब्रानमधे एक अद्भूत गुणधर्म आढळतो. तो म्हणजे हा तांदूळ पचनसंस्थेच्या मार्गाने जात असताना जठर, यकृत, आतड्यामधील टॉक्सीन्स शोषून घेतो व मलावाटे बाहेर टाकतो. पचनसंस्थेच्या शुद्धीकरणाची ही नैसर्गिक प्रक्रीया आहे. केवळ भात खाऊन तुम्ही पंचकर्म करू शकता असा थोडक्यात परीणाम आहे.

डावीकडे असलेला तांदूळ हा नेहमीचा पांढरा (polished) असून मधला उकडा (boiled) तर उजवीकडील वालई लाल तांदूळ आहे.
डावीकडे असलेला तांदूळ हा नेहमीचा पांढरा (polished) असून मधला उकडा (boiled) तर उजवीकडील वालई लाल तांदूळ आहे.

हा तांदूळ दक्षीणेकडे "कुडावझाई", "कुडा", "वालाई", "वाझाई" अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. अत्यंत गुणकारी आणि दुर्मिळ होत चाललेला हा तांदूळ आपण आषाढी व्हेंचर्सच्या माध्यमातून आणत आहोत. तसेच लाल पोहे ह्या वालई तांदळाचेच आहेत. त्यामुळे तांदळात जी सत्वे मिळतात ती सारी ह्या पोह्यांमधे उपलब्ध होतात. आणि लवकरच लाल तांदळाचे पीठ आणणार आहोत ज्याच्या पौष्ठीक भाकऱ्या बनवता येऊ शकतील.

विशेष सूचना : हा तांदूळ धान्यातील फक्त वरील तूस काढून बनवला जातो. आतील ब्रान आहे तसे ठेवले जाते. हे अत्यंत पौष्टीक असल्याने ह्याला सहज टोका लागतो. पण आपण कुठलेही किटकनाशक, बोरीक पावडर इ. वापरत नाही. त्यामुळे तांदूळ निट निवडून घ्यावा.

Additional information

Weight 1 kg

6 reviews for Walai Red Rice

  1. Vaibhav Vasantrao Mahadik (verified owner)

    Third class service. There is no service available throughout Maharashtra.. hopeless response…

  2. Yashwant Suresh Chindarkar

    Trying for best …

  3. Arvind Wable

    इडली, डोसा, उतप्पा छान लागतो.

  4. Ramakant Kasture

    ह्या तांदळाचा भात खाल्ल्यानंतर पोट भरते आणि लवकर भूक लागत नाही. आधी थोडा भिजवून शिजवला तर मऊ लागतो. इडली, डोसा करून बघितला. खुप छान चव लागते.

  5. Vinod Kawale (verified owner)

    मला आयबीएस (Irritable bowel syndrome (IBS)
    Also called: IBS, spastic colon) असल्यामुळे आतड्याची हालचाल मंदावली आहे. तसेच पचनशक्ती देखील मंदावली आहे. त्यासाठी नियमितपणे मी मेडिकल मधील मायक्रोफायबर व औषध घेत आहे.
    खरंतर माझ्या पोटाला व शरीरालाच वालयसारख्या नैसर्गिक अन्नाची गरज आहे. पण सुरवातीचे तीनचार दिवस आवडीने खाल्लेला वालयचा भात नंतर आवडेना.
    मग मी वालयची इडली ट्राय केली. त्याची चव छान लागली आता मी नियमितपणे वालय खाईल.
    तसेच वलयचा डोसा व उतप्पा पण छान लागतो. मला वाटते मधुमेहासारख्या आजारासाठी व पोटाच्या तक्रारी साठी तसेच आरोग्यासाठी नियमितपणे वालय खायला हवा.
    भात खायचा असेल तर कोलम + वालय मिक्स करून घ्यायचा. मग खायला बरे पडते.

  6. Ajay Bhalchandra Datar, E 302, Parksyde Residencies, Indiranagar, Near Guru Govind Singh College, Nashik 422010

    Coconut oil was best quality.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *