-10%
(2 customer reviews)

लाकडॉंग हळद Lakdong Turmeric

Original price was: ₹250.Current price is: ₹225.

100gm

Lakadong turmeric is a premium variety of turmeric from hilly regions of Meghalaya, highly valued for its exceptional curcumin content (7-12%), which is significantly higher than regular turmeric (2-3%).

Description

लाकडोंग हळद हे भारतात आढळणाऱ्या "पिवळ्या" हळदीचे सर्वोत्तम वाण असून ही मुख्यत्वे मेघालयमधे आदिवासी क्षेत्रात आढळते. लाकडॉंग हळदीमधे कुर्कुमिनचे प्रमाण ७% ते १२% पर्यंत असते जे सामान्य हळदीमधे २% पेक्षाही कमी असते. त्यामुळे ही सर्वात गुणकारी आणि औषधी हळद म्हणून प्रसिद्ध आहे.

मुळात ४ प्रकारच्या हळदी आहेत.. :

  1. पिवळी हळद : ही जनरली आपण जेवणात देखील वापरतो. शिचाय कुठे कापले, जखम झाली वगैरे, शिवाय फेसपॅक बनवायला, जनरली दुधातून घेण्यासाठी वगैरे देखील वापरतो. ह्यात ३ मुख्य प्रकार - स्थानिक वाणे जसे की सेलम, दुसरे म्हणजे दक्षीणेकडील सर्वात प्रसिद्ध अलप्पी हळद आणि मेघालय सारख्या ठिकाणी आदीवासी शेतकरी करतात ती लाकडॉंग.
  2. काळी हळद : ही सर्वाधिक औषधी हळद आहे. तिचा वासच कफ सिरपसारखा किंवा टॉनिक सारखा आहे. कुर्कुमिन सोबत अनेक औषधी घटक ह्यात आहेत. आपल्याकडे आषाढीमधे डायबिटीसवर ह्याचे २०-२५ दिवसातच मस्त परीणाम मिळाले आहेत. हीला नरकाचूर असे देखील म्हणतात.
  3. आंबे हळद : हे खरे तर "आले" आहे, हळद नाही. ह्याला mango ginger असे म्हणतात. पण आपल्याकडे आंबेहळद म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे कुठल्याही प्रकारची सूज असेल तर ह्याचे जबरदस्त आणि तात्काळ परीणाम आहेत. आषाढीमधे प्रथमच आपण ही पोटात घेण्यासाठी उपलब्ध केली आहे.
  4. कस्तुरी हळद : पांढरी शुभ्र अशी ही हळद छान सुगंधी वाण आहे. थोडा माती सारखा आणि थोडा कापरासारखा असा वेगळाच वास हिला येतो. खूप छान वाटते. स्किनकेअर साठी एक नंबर आहे..
लाकडॉंग हळद : वर सांगीतल्याप्रमाणे हळदीचे मुख्य ४ प्रकार. पिवळी, काळी, आंबे आणि कस्तुरी. ह्यातली पिवळी हळद ही आपल्याला सर्वात परीचीत असून आपण नित्य ती वापरतो. जेवणात, खरचटले - जखम झाली वगैरे इ. ठिकाणी. ही जी पिवळी हळद आहे ही जगभरात सर्वात जास्त होणारी कॉमन हळद आहे. ह्याच्या स्थानिक व्हरायटी ज्या आहेत, सेलम सारख्या त्यामधे फक्त २% पर्यंत कुर्कुमिन असते. प्रोसेस करताना ती उकडली, उन्हात सुकवली की हे आणखी कमी होते शिवाय मृतहोते. तरी त्याचा ॲंटीसेप्टीक परीणाम आपल्याला इतका मिळतो म्हणजे पहा कुर्कुमिन किती पॉवरफुल आहे..
अलप्पी सारख्या हळदीचा रंग आणि वास इतका तीव्र आणि आल्हाददायक आहे की नुस्त्या वासानेच फ्रेश वाटते. ह्यात देखील कुर्कुमिनचे प्रमाण २% इतकेच आहे. पण ज्या अलप्पी आणि आसपासच्या प्रदेशात ही पिकते तिकडच्या जमिन-पाण्याच्या गुणधर्मामुळे हिची चव-वास एकूणच अनुभव खूप तजेलदार असतो.
ह्या दोन्ही हळदी मुख्यत्वे जेवणात वापरायला. किंवा मसाले, लोणची वगैरे करायला..
लाकडॉंग ही भारतातील सर्वात जास्त कुर्कुमिन असलेली हळद. हिच्यामधे ९ ते १२% पर्यंत कुर्कुमिन आढळते. प्रोसेस केल्यानंतरदेखील ५-६% कुर्कुमिन प्रत्यक्षात पावडर मधे मिळते. आणि शिवाय नैसर्गिक पद्धतीने शेती केलेली असल्याने ह्या कुर्कुमिनचा दर्जा अजून छान असतो. शिवाय आपण ही उकडत नाही, उन्हात सुकवत नाही. त्यामुळे त्याचे जैविक गुणधर्म (बायोॲक्टिव) टिकून राहतात…
ही तुम्ही जेवणात वापरली तरी चालेल. पण खूप कमी प्रमाणात वापरायला हवी. ही मुख्यत्वे औषध म्हणून डिटॉक्स एजंट म्हणून वापरा. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एकदा आणि संध्याकाळी ऑफीसमधून आला किवा दैनंदीन कामातून मोकळे झाला की ह्या एक कप दूधात पाव चमचा लाकडॉंग हळद घालून घ्या. गोड पाहिजे असल्यास मध घालून घ्या. साखर वापरू नका.
सकाळी ही हळद घेतल्यास रात्रभराच्या पचनादी प्रक्रीयेनंतर शरीर डिटॉक्स व्हायला सुरूवात होते, शरीरात नविन उत्साह संचारतो, फ्रेश स्टार्ट मिळते. शरीराला मिळणारा पहिला आहार हा अत्यंत पौष्टीक असल्याने पचनसंस्था सुखावते. शिवाय दिवसभरातील विवीध आव्हाने, स्ट्रेस इ. साठी आपण रेडी होतो. संध्याकाळी ही घेतल्याने दिवसभरातील थकवा क्षणार्धात दूर होतो (प्रत्यक्ष अनुभवून पहा). दिवसभर प्रदुषण आणि भेसळ ह्यातून जे टॉक्सिन आपल्या शरीरात गेलेले असतात त्याचा निचरा करायचे काम चालू होते आणि फ्रेश वाटते. लाकडॉंग इतरही अनेक फायदे देते जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढणे, लिव्हरवरील ताण कमी करणे, वार्धक्याची प्रक्रिया लांबवणे, स्नायुदुखी कमी करणे, हाडांची ताकद वाढवणे इ. लाकडॉंग ही हळद दररोज सेवनात घ्या. साधारण महिन्याभरात तुम्हाला एकूणच फायदे जाणवायला लागतील..

आम्ही मेघालयातील वनक्षेत्रातील लकडोंग हळदीची मुळे थेट शेतकऱ्यांकडून मिळवतो. ही मुळे काळजीपूर्वक स्वच्छ केली जातात. मुळांवरची साल आम्ही काढत नाही कारण त्यातही औषधी गुणधर्म आहेत. नंतर ही मुळे पातळ कापांसारखी कापतात. ते काप आम्ही स्वत:विकसीत केलेल्या  हीट एक्सचेंज ड्रायरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानात निर्जलीकृत करतो. आम्ही हळद उकळत नाही किंवा वाळवत नाही. यामुळे हळदीमध्ये जैविकदृष्ट्या सक्रिय औषधी घटक जसेच्या तसे टिकवून ठेवण्यास मदत होते. आम्ही खात्री देतो की तुम्ही यापूर्वी इतके सुगंधी आणि प्रभावी हळद कधीही पाहिली नसेल!

आरोग्यदायक फायदे: लाकडॉंग हळद ही मुख्यत्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी लोकप्रिय आहे. ही कफ-पित्त-वात ह्याचा समतोल राखते, पचनास मदत करते, सूज कमी करते आणि यकृतामधील विषद्रव्यांचा निचरा करते. हिचे शक्तिशाली दाह-विरोधी गुणधर्म संधिवात, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे यासारख्या परिस्थितींमधे अत्यंत गुणकारी आहेत. कर्क्यूमिनचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव असतात आणि ते संज्ञानात्मक कार्यात मदत करू शकतात.

शरीराद्वारे कर्क्यूमिनचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी, नेहमी लकाडोंग हळद चिमूटभर काळी मिरी (पाइपरिन) किंवा तूप किंवा व्हर्जिन नारळ तेल यासारख्या प्रेरकांसोबत घ्यावी.

Additional information

Weight 0.100 kg

2 reviews for लाकडॉंग हळद Lakdong Turmeric

  1. Shubhangi Apte

    Good

  2. Prashant Rane

    मी ही हळद मागवली आणि मला आलेला अनुभव इथे लिहित आहे, मला साधारण दोन आठवडे खोकला येत होता, औषधे घेऊन कमी झाला होता पण पूर्ण बंद होतच नव्हता. खोकून खोकून छाती पोट दुखायचे. तेवढ्यात आपली लाकडोंग हळद आली. हळद ऑर्डर केली आणि मी विनय सरांना मेसेज करून लगेच कुरिअर करायची विनंती केली त्यांनी पण माझी परिस्थिती लक्षात घेऊन मला हळद पाठवली.
    आणि फक्त 2 दिवस मी हळद दुधातून घेतली आणि जो खोकला जातच नव्हता तो पूर्णपणे थांबला…
    धन्यवाद विनय सर आणि टीम आषाढी….

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *