-10%

Coconut Oil

Original price was: ₹750.Current price is: ₹675.

1 Litre

“Honest Oil” is 100% natural, chemical free, wood pressed oil; which is carefully purified, disinfected & activated to make it healthy and reliable. So you can trust it for whole family, including the little ones.

Description

आरोग्याच्या चिंतेमुळे, आजकाल लोक मोठ्या प्रमाणात तेलमुक्त आहार स्वीकारतात. पण तेल हा आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आहे. तेल हे अनेक उपयिक्त फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत. तेल आपल्याला ऊर्जा देते, पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये रक्तावाटे शोषण्यास मदत करते. नैसर्गीक तेल विशेषतः रोगप्रतिकारक आणि अंतःस्रावी प्रणालींना समर्थन देतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत, निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक आहेत.

खाद्यतेलाचे दोन मुख्य प्रकार आहेत: रिफाईंड तेल आणि घाण्याचे तेल..
ही गोष्ट आहे तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाची...

रिफाइंड ऑइल : वनस्पतींमधून अधिकाधिक प्रमाणात पिळवटून तेल काढण्यासाठी उच्च तापमान, दाब आणि रासायनिक विद्रावके वापरतात. यामुळे तेल एक प्रकारे सडते, धूसर होते आणि त्यांचे अनेक नैसर्गिक गुणधर्म आणि चांगुलपणा गमावतात. रिफाइंड तेल हे अशा प्रकारे सोल्वंट एक्स्ट्रॅक्ट करून काढलेले तेल, पामतेल, खनिज तेल आणि अगदी खराब झालेले तेल यांसारख्या सर्व प्रकारच्या स्वस्त तेलांना अतिउच्च तापमानात गरम करून बनवलेले रासायनिक मिश्रण आहे. गंधमुक्त आणि रंगहीन करण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. हेग्झेन सारखे घातक पदार्थ वापरतात. हायड्रोजन इंजेक्शन वापरून शेल्फलाईफ वाढवतात. हे करत असताना सर्व तेलामधील सर्व मौल्यवान आणि नैसर्गिक घटक काढून टाकले जातात. त्याऐवजी, ट्रान्स फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शेवटी त्यात राईसब्रान, शेंगदाणा किंवा इतर वनस्पती तेलांसारखी चव देण्यासाठी कृत्रिम चव आणि रंगद्रव्ये मिसळली जातात. ह्यामुळे मुळात तुम्ही जे सूर्यफुल तेल म्हणून घेता ते मुळात नारळाचे तेल नाहीच. ते खोबरेल तेलाची चव असलेले एक तेलासारखे रसायन आहे.

त्या सर्व प्रक्रियांमुळे जे “तेलासारखे रसायन” बनते ते शरीरातील चांगले एचडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन, ट्रायग्लिसरायड्स आणि हानिकारक LDL कोलेस्टेरॉलचे स्तर वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. शिवाय घशाची खवखव किंवा इंफेक्शन, वजन वाढणे, श्वास/दम लागणे, हृदयाच्या समस्या, रक्तदाब, बद्धकोष्ठता, चिंता, मधुमेह अशा सर्व प्रकारच्या वाईट मार्गांनी ते तुमच्या आरोग्याशी गडबड करू शकते! शिवाय ह्यातील ट्रान्स फॅट्समुळे कर्करोग, मधुमेह आणि रोगप्रतिकारक प्रणाली समस्या देखील होऊ शकतात हे अनेक प्रयोगात सिद्ध झालेले आहे. ह्यात पोषण अत्यंत कमी पण आरोग्याला धोके जास्त आहेत. खरे तर रिफाइंड तेल हे स्लो पॉयझन मानले जाते.

मग पर्याय राहतो घाण्याचे तेल!

हे तेल ताज्या तेलबिया ठेचून पारंपारिक पद्धतीने बनवले जाते. कुठलेही रसायन नाही की प्रक्रीया नाही! छान वाटतंय ना?
बरं, पण हे अर्धसत्य आहे. हे तेल अतिशय घाणेरडे आणि अशुद्धतेने भरलेले आहे. आपण तेलात तो अविद्राव्य गाळ प्रत्यक्षात तरंगताना पाहू शकतो, तो नीट फिल्टरही केलेला नाही. शिवाय घाणा, उपकरणे आणि ते हाताळणारे लोक किती स्वच्छ आहेत याबद्दल नेहमीच शंका असते.

घाण्याच्या तेलावर जेव्हा आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अपारंपारीक फिल्टर वापरून पाहिले तेव्हा आम्हाला मिळाले हे -

ही दुधाची अटवलेली घट्ट साय नाही. हे आहे आपल्या "घाण्याच्या शुद्ध तेलातील घाण". साधारण 4–5% ह्या impurities आणि contamination आपण रोज खातोय.. का? अहो घाण्याचे तेल म्हणजे 100% नैसर्गिक, काही त्रास होऊच शकत नाही अशी आपली (गैर)समजूत ना?

बरे घाणावाल्याला विचारले की फिल्टर का करत नाही तर तो म्हणतो की, "आम्ही नैसर्गिक तेल विकतो" .. अरे पण आपण नैसर्गिक म्हणून केळं सालीसकट खातो का? माकडापासून प्रगत होत आपण माणूस झालो ना? काय घ्यायचे आणि काय टाळायचे इतके तर आपल्याला कळतेच ना!

आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की घाण्याच्या तेलाचे इतके प्रॉब्लेम तर नक्की खायचे तरी काय? पण काळजी करू नका. आषाढीमधे आम्ही प्रॉब्लेम्सवर काम करत नाही, चर्चा करत बसत नाही. आषाढी मधे आम्ही जबाबदारी घेतो, अभ्यास करतो, प्रयोग करतो आणि प्रॉब्लेमवर उपाय काढतो! पर्याय उपलब्ध करतो.

पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याची योग्य सांगड घालत आम्ही, आषाढी व्हेंचर्स, सादर करत आहोत "Honest Oil". 100% नैसर्गिक, पण काळजीपूर्वक शुद्ध केलेलं, कुठलेही केमिकल न वापरता, उष्णतेचा वापर न करता, समुद्री मिठाने निर्जंतुक केलेलं आणि चांदीने प्रभावित केलेले सुरक्षित, विश्वासार्ह व्हर्जिन प्रतिचे खाद्यतेल. त्यामुळे तुम्ही लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी त्यावर विश्वास ठेवू शकता.तेव्हा आता काळजी सोडा आणि बिनधास्त ऑनेस्ट तेलाने आपल्या स्वयंपाकाचा आनंद घ्या

Additional information

Weight 1 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Coconut Oil”

Your email address will not be published. Required fields are marked *