“गावरान (Gawran)” हा आषाढी व्हेंचर्सचा प्रमुख उपक्रम असून अधिकृत ब्रँड देखील आहे. ग्रामीण भागामधे लोकांचे जीवन आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी असते कारण त्यांचा आहार व जीवनपद्धती. शहरी धकाधकीच्या जीवनात आपण ग्रामीण जीवनपद्धती तर अवलंबू शकत नाही. पण चांगला, पोषक आणि नैसर्गिक आहार घेऊन शारिरीक झीज नक्की कमी शकतो. हेच उद्दीष्ट ठेवून “गावरान” प्रोजेक्टच्या माध्यमातून गावखेड्यात बनणारे नैसर्गिक, पारंपारिक आणि सात्विक पदार्थ आपण शहरी भागात उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत. नैसर्गिक फळांचे रस व त्यापासून बनवलेली सरबते, मूळ वाणाचे लाल तांदूळ व पोहे, लाकडी घाण्याचे तेल अशा विविध प्रकारची उत्तमोत्तम उत्पादन इथे उपलब्ध होतील.