माझा सप्टेंबरमधे नायजेरीया दौरा होता तेव्हाची गोष्ट.. आईची शुगर खूप वाढली होती. ३००-३६० रेंज होती. डॉक्टरनी सर्व बेकरी पदार्थ, भात वगैरे स्ट्रिक्टली बंद करायला सांगीतले. दिवसाला एक गोळी चालू केली. तिचे पाय खूप दुखायचे. सारख्या पोटऱ्या ठणकत असत. थोडे चालले तरी थकायला व्हायचे. तोल जायचा... माझी आई आता रिटायर्ड शासकीय अधिकारी असून घरीच असते. व्यायाम वगैरे काही नाही. पण लाईफस्टाईल डिसऑर्डर देखील नाही. कधी काही अरबट चरबट खाणे नाही की काही व्यसने नाही. चहा देखील मर्यादीत. पण प्रदुषण ते भेसळ ह्याचे जे परीणाम व्हायचे ते होतात...

तेव्हा माझ्याकडे स्टॉकमधे रॉ हळदी होत्या. म्हणजे सुकवलेली हळकुंड. तिला मी काळ्या हळदीची हळकुंड दिली. ही हळकुंड आम्ही मेघालयमधून मागवली होती. मला थोडी हळकुंड नाजयेरीयामधील राजांसाठी न्यायची होती. त्यातील थोडी आईला दिली आणि ब्लेंडरमधे पावडर बनवून वापरायला सांगीतली. आमची अम्मा कमालीची आळशी. तिने काय केले, सकाळच्या चहात हळकुंडाचे तुकडे उकळवून प्यायला सुरूवात केली. ४० दिवसात तिची शुगर ७६-१३० रेंजमधे आली. डॉक्टरने गोळी अर्धी केली. भात खायची परवानगी दिली. पाय आता दुखत नाही अजिबात. शॉपींगला जाते, फेरफटका देखील मारते. सारे व्यवस्थीत आहे. आता ती हळकुंड संपून दिड महिना झाला. ती फक्त चिमुटभर नॉर्मल हळद रात्री झोपताना जिभेखाली ठेवते. पण डायबिटीज पूर्णपणे कंट्रोलमधे आहे..

असाच अनुभव आषाढीमधे डायबिटीज असलेल्या अजून २ लोकांना आला आहे.

काळी हळद (नरकाचूर) हे हळदीचे एक अत्यंत औषधी वाण आहे जे प्रामुख्याने फार्मा कंपन्या विविध प्रकारच्या औषधांसाठी वापरतात. मधुमेहावरील त्याचे परिणाम खूप आशादायक आहेत. मेघालयातील डोंगराळ प्रदेशात आढळणाऱ्या हळदीचे हे एक प्रीमियम आणि दुर्मिळ वाण आहे.

मुळात ४ प्रकारच्या हळदी आहेत:

  1. पिवळी हळद : ही जनरली आपण जेवणात देखील वापरतो. शिवाय कुठे कापले, जखम झाली वगैरे, शिवाय फेसपॅक बनवायला, जनरली दुधातून घेण्यासाठी वगैरे देखील वापरतो. ह्यात ३ मुख्य प्रकार - स्थानिक वाणे जसे की सेलम, दुसरे म्हणजे दक्षीणेकडील सर्वात प्रसिद्ध अलप्पी हळद आणि मेघालय सारख्या ठिकाणी आदीवासी शेतकरी करतात ती लाकडॉंग.
  2. काळी हळद : ही सर्वाधिक औषधी हळद आहे. तिचा वासच कफ सिरपसारखा किंवा टॉनिक सारखा आहे. कुर्कुमिन सोबत अनेक औषधी घटक ह्यात आहेत. आपल्याकडे आषाढीमधे डायबिटीसवर ह्याचे २०-२५ दिवसातच मस्त परीणाम मिळाले आहेत. हीला नरकाचूर असे देखील म्हणतात.
  3. आंबे हळद : हे खरे तर "आले" आहे, हळद नाही. ह्याला mango ginger असे म्हणतात. पण आपल्याकडे आंबेहळद म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे कुठल्याही प्रकारची सूज असेल तर ह्याचे जबरदस्त आणि तात्काळ परीणाम आहेत. आषाढीमधे प्रथमच आपण ही पोटात घेण्यासाठी उपलब्ध केली आहे.
  4. कस्तुरी हळद : पांढरी शुभ्र अशी ही हळद छान सुगंधी वाण आहे. थोडा माती सारखा आणि थोडा कापरासारखा असा वेगळाच वास हिला येतो. खूप छान वाटते. स्किनकेअर साठी एक नंबर आहे..

नरकाचूर काळी हळद: ही जगातली सर्वात दुर्मिळ आणि सर्वात गुणाकारी हळद. हिच्यात कुर्कुमिनचे प्रमाण कमी असले तरी हिचे मेडिकल कंपोजिशन इतके जबरदस्त आहे की अनेक व्याधींवर ही रामबाण इलाज आहे..

... "पण" ही हळद “अतिऔषधी” आहे हे लक्षात घ्या. तेव्हा ही गरज पडेल तेव्हाच घ्या. उदा. खूपच थकून आला असाल किवा एखाद्या इव्हेंटचा प्रचंड ताण आहे, अंग खूप दुखते आहे, अतिमद्य सेवनामुळे वगैरे लिव्हरला सूज आहे किंवा जुनाट खोकला-सर्दी आहे किंवा रक्ताचे विकार आहेत तरच.

"नेहमी आहारात घ्यायची ही हळद नाही."

 


 

काळ्या हळदीचा डायबिटीजवर इतका चांगला रिझल्ट आपल्याला "ॲक्सिडंटली" कळला. हा तुम्हाला कुठेही ऑनलाईन वाचायला मिळत नाही. AI कडे नाही. कुठल्याही आयुर्वेदात, शास्रात ह्याचा काही उल्लेख नाही. मी ह्यावर अधिक काम करायचे ठरवले. आषाढीमधे आम्ही अशा प्रकारचे विषय घेतो, त्यावर सोशल एक्सपरिमेंट करतो आणि त्यातून काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो..

काळी हळद, तिचे फायदे, शास्त्रामधे असलेले उल्लेख असा बराच अभ्यास केल्यावर आम्ही ही आषाढीमधे लॉन्च करायचे ठरवले. आम्ही मेघालयातील वनक्षेत्रातील काळ्या हळदीची मुळे थेट शेतकऱ्यांकडून मिळवतो. हे कंद काळजीपूर्वक स्वच्छ केली जातात. वरची साल आम्ही 'काढत नाही' कारण त्यातही औषधी गुणधर्म आहेत. नंतर ही मुळे पातळ कापांसारखी कापतात. ते काप आम्ही स्वत:विकसीत केलेल्या हीट एक्सचेंज ड्रायरमध्ये ५०-५५ अंश सेल्सिअस तापमानात निर्जलीकृत करतो. आम्ही हळद उकळत नाही किंवा कडक सूर्यप्रकाशात वाळवत नाही. यामुळे हळदीमध्ये जैविकदृष्ट्या सक्रिय औषधी घटक जसेच्या तसे टिकवून ठेवण्यास मदत होते.

डायबिटीज साठी आम्ही "काळ्या हळदीवर" एक सोशल एक्सपरिमेंट करायचे ठरवले. आपल्याला काळ्या हळदीचा एका चमत्कारीक वापराबद्दल कळले. ते प्रत्यक्ष पडताळून पहायचे. जर हा सोशल एक्सपरिमेंट यशस्वी झाला तर आपण एका प्रभावी आणि सर्वांसाठी उपयुक्त अशा “सोशल इनोवेशन” ला जन्म देणार आहोत. अनेकांच्या जीवनात एक ठळक बदल घडवून आणायला जबाबदार असणार आहोत..

काळ्या हळदीचा सोशल एक्सपरीमेंट

हा सोपा आणि छोटा प्रयोग करून तुम्ही आषाढीच्या उद्योगवारीत सहभागी होऊ शकता आणि आमच्या सोशल एंटरप्रेनरशीपचा भाग होऊ शकता.. पण हा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर काही शिस्त आपणा सर्वाना पाळावी लागेल. मुळात आधी ठरवा तुम्हाला हे करायचे आहे का? आणि ह्यासाठी असणारे सारे नियम तुम्ही पाळणार का? टाईमपास म्हणून ह्यात सहभागी होऊ नका. नुसते प्रेक्षक म्हणून तर अजिबात नको. प्रयोग यशस्वी होवो की फेल होवो, आम्ही ओपनली फेसबुकवर, वेबसाईटवर कळवूच. तेव्हा जरूर टाळ्या वाजवा! पण प्रयोगात लुडबूड करू नका. ह्या सोशल एक्सपरिमेंट साठी मी एक स्वतंत्र ग्रुप बनवणार आहे. तिथे मर्यादीत लोकांनाच प्रवेश असणार आहे..

ह्या प्रयोगात सामील होण्यासाठी एकतर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परीचयात कुणीतरी डायबेटीक असणे आवश्यक आहे. जर कुणी डायबेटीक नसेल तर ह्यामधे अजिबात सामील होऊ नका. सामान्यपणे डिटॉक्ससाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, सांधेदुखी वगैरे गोष्टींसाठी लाकडॉंग आणि आंबेहळदच पुरेशी आहे. काळ्या हळदीची गरज नाही हे मी परत स्पष्ट सांगतो आहे.

किमान एक काळ्या हळदीची बॉटल ऑर्डर करा. मी तुमचा नंबर काळ्या हळदीच्या विशेष ग्रुपमधे ॲड करेन. तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ग्रुप कधीही एक्झीट करू शकता. ज्या सर्वांनी काळी हळद ऑर्डर केली त्यांनी HBA1C आणि शुगरचा रिपोर्ट काढायचा आहे. आणि तो रेकॉर्डला ठेवायचा आहे. ह्या शिवाय तुम्हाला काय प्रकारचा त्रास होतो ते देखील रेकॉर्ड करायचे आहे. म्हणजे पाय दुखतात का, तोल जातो, झौप येते, चक्कत येते, थकवा येतो, जखम बरी होत नाहीये इ. सारी लक्षणे रेकॉर्ड करायची आहेत. ग्रुपवर मांडायची आहेत.

मग रोज सकाळी उपाशी पोटी काळी हळद पाव चमचा गरम दुधातून किंवा गरम पाण्यातून घ्यायची आहे. अनेकांना डायबिटीजमुळे किंवा आवडत नसल्याने दूध घ्यायचे नसेल तर हरकत नाही. पाण्यात घेतलेली चालते. पण ते चांगले गरम असायला हवे. ही हळद खूप कडवट आहे. त्यामुळे त्या पाण्यात अर्धा-एक चमचा मध घालाल तर चालेल. साखर, गुळ वापरायचा नाही. डायरेक्ट हळद घेऊ नका किंवा मधात घालून घेऊ नका. गरम कंडक्टर "अनिवार्य" आहे. रोज निरीक्षण करा तुम्हाला काय वाटते. काही वेळेस पहिल्याच दिवशी पोट दुखू शकते, सारखै टॉयलेटला जायला लागू शकते, डोके दुखू शकते. जर दुख असह्य असेल, त्रास होत असेल तर त्यानंतर काळी हळद घेऊ नका. २ दिवसांचा ब्रेक घ्या. प्रमाण थोडे कमी करून परत ट्राय करा… त्रास चालूच राहिला तर प्रयोग थांबवा...

... जर त्रास झाला नाही तर हा प्रयोग आपल्याला किमान २० दिवस करायचा आहे. २० दिवसांनी आपल्याला परत HBA1C, शुगरचे रिपोर्ट काढायचे आहेत आणि काय परीणाम मिळाला ते पहायचे आहे. जर साखर ८० पेक्षा कमी आली असेल किंवा HBA1C 6.0 पेक्षा कमी आला तर ब्रेक घ्यायचा आहे. ह्या ब्रेक दरम्यान बाकी दिनचर्या तशीच ठेवायची आहे. गोळी अर्धी घ्यायची की पूर्ण बंद हे डॉक्टरला ठरवूदे. परत १५ दिवसांनी शुगर चेक करा. जर शुगर फार बदलत नसेल तर अजून १५ दिवस ब्रेक चालू ठेवा. परत शुगर शूट झाली तरच काळी हळद घ्या. मधल्या काळात जनरल सपोर्ट साठी तुम्ही दुधातून लाकडॉंग हळद घेऊ शकता. जर शुगर वाढली तर परत २० दिवस प्रयोग करा… परीणाम मिळाले की थांबा… परीणाम मिळत आहेत तर त्याचा स्पिड वाढावायला प्रमाण बदलू नका. सोबत व्यायाम किंवा काही पथ्य पाळणार असाल व त्याचा काही फायदा होत असेल तर मोकळेपणाने सांगा. सर्वांनाचा फायदा होईल

हे पॅरासिटामल सारखे SOS करायचे आहे. आजार असेल तरच वापरायचे. फक्त कसे आहे की काळी हळद हा नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे त्याचे परीणाम ॲलोपथी गोळ्यांसारखे फक्त आजारापुरते नाही. ती खोलवर काम करणार. त्यामुळे जर टाईप २ डायबिटीजवर लॉन्ग़टर्म परीणाम मिळाला तर तुमची गोळी कायमची जाऊ शकते… हे होते की नाही हाच तर खरा सोशल एक्सपरीमेंट आहे..

ह्या प्रयोगात सामील होणाऱ्या प्रत्येकाने आपापला अनुभव खरेपणाने शेअर करणे अनिवार्य आहे. कदाचीत रिझल्ट मिळणार नाही. कदाचीत कुणलाच काही फायदा होणर नाही. पण जे घडेल ते आपल्याला खरेपणाने सर्वांसमोर आणायचे आहे. त्यामुळे कुणी काही लपवायचे नाही, काही सांगायला लाजायचे नाही…

सर्वात महत्वाचे: मी आधीचा सांगीतल्या प्रमाणे मी डॉक्टर नाही. आषाढीमधे कुणीच डॉक्टर नाही. ह्या ग्रुपला कुणी डॉक्टर मॉनिटर करणार नाही. ग्रुपवर काही डॉक्टर असतील देखील पण त्यांनी कुणालाही वैद्यकीय सल्ला द्यायचा नाहीये. हा ग्रुप फक्त काळी हळद आणि त्यावरील प्रयोगांसाठी आहे. थोडी रिस्क आहे. म्हणून कुणालाही "ह्यात सामिल व्हा" असा आग्रह नाही. कुठल्याही साईड इफेक्ट किंवा अप्रिय परीणामांना मी आणि आषाढी जबाबदार नाही. जर तुम्ही ह्यात सहभागी आहात तर तुमची ही रिस्क घ्यायची तयारी आहे. ह्याचा विचार करूनच काय ते ठरवा. शिवाय प्रेग्नंट महिला, हार्ट पेशंट किंवा बायपास झालेले पेशंट ह्यांनी हे करूच नका. किबा तुमच्या डॉक्टरला विचारूनच त्याच्या परवानगीने काय ते ठरवा.

आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हा सोशल एक्सपरिमेंट यशस्वी व्हावा आणि भविष्यात अनेक डायबेटीक लोकांना ह्याचा अनंतकाळ फायदा मिळावा हेच आषाढी वारीचे खरे यश असणार आहे. आपण मनापासून नेटाने प्रयत्न करूया..

नरकाचूर काळी हळद ऑर्डर करण्यासाठी इकडे क्लिक करा..


टाईप १ डायबिटीज हा कधी बरा होत नाही. कारण तो केवळ डायबिटीज नाही तर तो ऑटोइम्युन स्वरूपाचा आजार आहे. ऑटोइम्युन आजारांवर काम व्हायला हवे तर मेंदूपर्यंत संवेदना पोचवेल असे काही सोबत असायला हवे. आषाढीचे अक्षत व्हिसीओ हे नारळाच्या दुधाचे तेल असून अनेक ऑटोइम्युन कंडीशनवर अक्षतचे खूप सुपरीणाम मिळालेले आहेत. तर ज्या टाईप १ डायबेटीक लोकांना एक सोशल एक्सपरिमेंट करायची तयारी आहे त्यांनी पाव चमचा काळी हळद, एक चिमुट काळ्या मिरीची पावडर आणि २ चमचे अक्षत व्हिसीओ असे कॉम्बिनेशन दररोज रात्री झोपताना तोंडात चांगले घोळवून घ्या. खूप कडवट असणार आहे. वाटल्यास ह्यात अर्धा चमचा मध घाला. पण हे किमान २० दिवस करून पहा. जर पहिल्या २-३ दिवसात खूप त्रास झाला तर बंद करा. पण जनरली त्रास होणार नाही. २० दिवसांनी परीणाम नक्की सांगा!

अत्यंत महत्वाचे : तुम्हाला डायबिटीज नाही तर काळी हळद अजिबात घेऊ नका. मला कुठलेतरी काहितरी तुमच्या गळ्यात मारून धंदा करायचा नाही. नॉर्मल व्यक्तीला रोज दुधातून लाकडॉंग हळद घालून गोल्डन लाट्टे घेणे पुरेसे आहे. काळी हळद अतिऔषधी आहे. अकारण घेऊ नका.
महत्वाचे अस्विकरण: मी स्वत: डॉक्टर नाही आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देण्यासाठी प्रमाणीत मेडिकल प्रॅक्टिशनर नाही. आषाढीच्या बोर्डवर कुणीच डॉक्टर नाही. आषाढी ही औषध बनवणारी कंपनी नाही. आषाढीमधै उपलब्ध केलेल्या हळदी, व्हिसीओ, लाल तांदूळ आणि सर्वच पदार्थ हे "खाद्यपदार्थ" म्हणून उपलब्ध केलेले आहेत. ह्यांचे आरोग्यदायी फायदे असले तरी ह्यातील कुठलेच औषध नाही. ह्यातील कुठलेच उत्पादन कुठल्याही औषधाची रिप्लेसमेंट नाही. मी माझे वैयक्तीक अनुभव शेअर करत आहे. मला जे आरोग्यदायक फायदे मिळाले ते सर्वांना मिळतीलच असे नाही. त्यामुळे ही उत्पादने घ्यायची का, वापरायची का हे प्रत्येकाने आपापल्या विवेकाने ठरवायचे आहे. कुठल्याही परीणामास मी व/वा आषाढी जबाबदार नाही. प्रमाणीत डॉक्टरने दिलेला वैद्यकीय सल्लाच अंतीम आहे. आम्ही देखील मेडीकल कंडीशनमधे सरळ वैद्यकीय सल्ला घेतो.