४ प्रकारच्या हळदी आहेत..
- पिवळी हळद : ही जनरली आपण जेवणात देखील वापरतो. शिचाय कुठे कापले, जखम झाली वगैरे, शिवाय फेसपॅक बनवायला, जनरली दुधातून घेण्यासाठी वगैरे देखील वापरतो. ह्यात ३ मुख्य प्रकार – स्थानिक वाणे जसे की सेलम, दुसरे म्हणजे दक्षीणेकडील सर्वात प्रसिद्ध अलप्पी हळद आणि मेघालय सारख्या ठिकाणी आदीवासी शेतकरी करतात ती लाकडॉंग.
- काळी हळद : ही सर्वाधिक मेडिसिनल हळद आहे. तिचा वासच कफ सिरपसारखा किंवा टॉनिक सारखा आहे. कुर्कुमिन सोबत अनेक औषधी घटक ह्यात आहेत. आपल्याकडे डायबिटीसवर ह्याचे २०-२५ दिवसातच मस्त परीणाम मिळाले आहेत. हीला नरकाचूर असे देखील म्हणतात.
- आंबे हळद : हे खरे तर आले आहे. ह्याला mango ginger असे म्हणतात. पण आपल्याकडे आंबेहळद म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे कुठल्याही प्रकारची सूज असेल तर ह्याचे जबरदस्त आणि तात्काळ परीणाम आहेत. आषाढीमधे प्रथमच आपण ही पोटात घेण्यासाठी उपलब्ध केली आहे.
- कस्तुरी हळद : पांढरी शुभ्र अशी ही हळद छान सुगंधी वाण आहे. थोडा माती सारखा आणि थोडा कापरासारखा असा वेगळाच वास हिला येतो. खूप छान वाटते. स्किनकेअर साठी एक नंबर आहे..
आषाढीकडे आता ह्या चारही हळदी आहेत. १ टन हळदीचे कंद जेव्हा आपण मागवतो तेव्हा ती प्रोसेस केल्यावर फक्त १६० किलो हळद राहते. ती नुस्ती ठेवून दिली तर तिला कोंब फुटतात किंवा कुजायला लागते. मग ती फेकून द्यावी लागते. कारण अशी हळद आपण सेवनासाठी वापरणे योग्य नाही. आषाढीमधे आपण दर्जाशी कुठलीच तडजोड करत नाही. मागच्या फेरीत ८५० किलो हळदीचे कंद आम्ही फेकून दिले कारण आमचा ड्रायर वेळेत रेडी झाला नाही..

लाकडॉंग हळद : वर सांगीतल्याप्रमाणे हळदीचे मुख्य ४ प्रकार. पिवळी, काळी, आंबे आणि कस्तुरी. ह्यातली पिवळी हळद ही आपल्याला सर्वात परीचीत असून आपण नित्य ती वापरतो. जेवणात, खरचटले – जखम झाली वगैरे इ. ठिकाणी. ही जी पिवळी हळद आहे ही जगभरात सर्वात जास्त होणारी कॉमन हळद आहे. ह्याच्या स्थानिक व्हरायटी ज्या आहेत, सेलम सारख्या त्यामधे फक्त २% पर्यंत कुर्कुमिन असते. प्रोसेस करताना ती उकडली, उन्हात सुकवली की हे आणखी कमी होते शिवाय मृतहोते. तरी त्याचा ॲंटीसेप्टीक परीणाम आपल्याला इतका मिळतो म्हणजे पहा कुर्कुमिन किती पॉवरफुल आहे..
अलप्पी सारख्या हळदीचा रंग आणि वास इतका तीव्र आणि आल्हाददायक आहे की नुस्त्या वासानेच फ्रेश वाटते. ह्यात देखील कुर्कुमिनचे प्रमाण २% इतकेच आहे. पण ज्या अलप्पी आणि आसपासच्या प्रदेशात ही पिकते तिकडच्या जमिन-पाण्याच्या गुणधर्मामुळे हिची चव-वास एकूणच अनुभव खूप तजेलदार असतो.
ह्या दोन्ही हळदी मुख्यत्वे जेवणात वापरायला. किंवा मसाले, लोणची वगैरे करायला..
लाकडॉंग ही भारतातील सर्वात जास्त कुर्कुमिन असलेली हळद. हिच्यामधे ९ ते १२% पर्यंत कुर्कुमिन आढळते. प्रोसेस केल्यानंतरदेखील ५-६% कुर्कुमिन प्रत्यक्षात पावडर मधे मिळते. आणि शिवाय नैसर्गिक पद्धतीने शेती केलेली असल्याने ह्या कुर्कुमिनचा दर्जा अजून छान असतो. शिवाय आपण ही उकडत नाही, उन्हात सुकवत नाही. त्यामुळे त्याचे जैविक गुणधर्म (बायोॲक्टिव) टिकून राहतात…
ही तुम्ही जेवणात वापरली तरी चालेल. पण खूप कमी प्रमाणात वापरायला हवी. ही मुख्यत्वे औषध म्हणून डिटॉक्स एजंट म्हणून वापरा. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एकदा आणि संध्याकाळी ऑफीसमधून आला किवा दैनंदीन कामातून मोकळे झाला की ह्या एक कप दूधात पाव चमचा लाकडॉंग हळद घालून घ्या. गोड पाहिजे असल्यास मध घालून घ्या. साखर वापरू नका.
सकाळी ही हळद घेतल्यास रात्रभराच्या पचनादी प्रक्रीयेनंतर शरीर डिटॉक्स व्हायला सुरूवात होते, शरीरात नविन उत्साह संचारतो, फ्रेश स्टार्ट मिळते. शरीराला मिळणारा पहिला आहार हा अत्यंत पौष्टीक असल्याने पचनसंस्था सुखावते. शिवाय दिवसभरातील विवीध आव्हाने, स्ट्रेस इ. साठी आपण रेडी होतो. संध्याकाळी ही घेतल्याने दिवसभरातील थकवा क्षणार्धात दूर होतो (प्रत्यक्ष अनुभवून पहा). दिवसभर प्रदुषण आणि भेसळ ह्यातून जे टॉक्सिन आपल्या शरीरात गेलेले असतात त्याचा निचरा करायचे काम चालू होते आणि फ्रेश वाटते. लाकडॉंग इतरही अनेक फायदे देते जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढणे, लिव्हरवरील ताण कमी करणे, वार्धक्याची प्रक्रिया लांबवणे, स्नायुदुखी कमी करणे, हाडांची ताकद वाढवणे इ. लाकडॉंग ही हळद दररोज सेवनात घ्या. साधारण महिन्याभरात तुम्हाला एकूणच फायदे जाणवायला लागतील..

नरकाचूर काळी हळद: ही जगातली सर्वात दुर्मिळ आणि सर्वात गुणाकारी हळद. हिच्यात कुर्कुमिनचे प्रमाण कमी असले तरी हिचे मेडिकल कंपोजिशन इतके जबरदस्त आहे की अनेक व्याधींवर ही रामबाण इलाज आहे. पण ही हळद “अतिऔषधी” आहे हे लक्षात घ्या. तेव्हा ही गरज पडेल तेव्हाच घ्या. उदा. खूपच थकून आला असाल किवा एखाद्या इव्हेंटचा प्रचंड ताण आहे, अंग खूप दुखते आहे, अतिमद्य सेवनामुळे वगैरे लिव्हरला सूज आहे किंवा जुनाट खोकला-सर्दी आहे किंवा रक्ताचे विकार आहेत तर..
आमच्याकडे ज्यांनी काळी हळद वापरून पाहिली अशा अनेकांना डायबिटीजवर खूप छान परीणाम २० दिवसातच मिळाले आहेत. (हा मेडिकल सल्ला नाही. ही हळद घेतल्याने डायबिटीज जातो किंवा गोळी बंद करायला मिळते असा दावा नाही). इतरही अनेक फायदे जे पिवळ्या हळदीचे मिळतात ते हिचे तिव्रतेने मिळतात.. पण खूप उग्र आहे, एकदम कडवट आहे. हीची एक बॉटल नेहमी घरी असावी. पण वापर करताना थोड्या प्रमाणात करा. सतत वापरू नका. २०-२२ दिवसांनंतर ब्रेक घ्या..
अधिक माहितीसाठी काळी हळद आणि डायबिटीजवरील हा लेख पहा..
काळी हळद ही वातावरण शुद्ध करणारी आणि एकूणच सुबत्ता आणणारी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. काही लोक ह्यामुळे जादूटोणा होतो, मंत्रतंत्र होते, धनवर्षा होते असे कायपण सांगतात. अनेक इंफ्लुएंसर ही हळद मंत्रून दिल्याचा दावा करतात. वाट्टेल ते सांगतात. ह्यात काही अर्थ नाही. पण घरात वास्तू यंत्र किंवा पिरॅमिड लावल्याने जसा घराच्या सकारात्मक एनर्जिमधे फरक जाणवतो तसा अनुभव तुम्हाला काळ्या हळदीची कंद घरात ठेवल्याने येऊ शकतो. किंवा एखाद्या कोपऱ्यात हिचे झाड लावल्याने देखील येऊ शकतो. अशा “जादूटोणा आणि बुवाबाजी विरहीत” केवळ वास्तूशी निगडीत वस्तू म्हणून कुणाला काळ्या हळदीचे कंद किंवा रोपे हवी असल्यास ती उपलब्ध करू शकतो. हा विषय प्रत्येकाने विवेकाने घ्यायचा आहे. कुठेही कुठल्याही प्रकारे जादूटोणा, करणीबाधा, बुवाबाजी, मंत्रतंत्र असल्या फालतू फसव्या गोष्टींची समर्थन नाही!

आंबे हळद: सर्व प्रकारच्या सूज आणि दुखीवर रामबाण इलाज. आधीच सांगीतल्या प्रमाणे ही खरी तर हळद नाही तर आले आहे. पण आपल्याकडे आंबेहळद म्हणून प्रसिद्ध आहे. हिच्या कंदाला खरोखर आंबा किंवा कैरीसारखा मोहक सुगंध येतो. खूप छान वाटते. हिच्या मेडिसोनल प्रॉपर्टीमधेच “antioxidant, anti-inflammatory, and antimicrobial, antipyretic” हे सांगीतले जाते. ही पारंपारीक रित्या सुज आली असता फक्त लेप करून लावण्यासाठी वापरली जात असे. पण आषाढीमधे अनेक प्रयोगांती आणि विवीध टेस्ट केल्यानंतर ही आपण एडिबल म्हणजे खाण्याच्या स्वरूपात उपलब्ध केली. ही हळद देखील हायली मेडीसिनल आहे. कुठल्याही प्रकारची कितीही जुनी हाडदुखी, सांधेदुखी, थंडीत बळावणारी हाडदुखी, कंबरदुखी, मुकामार, जुना मुकामार, जुनाट सांधैदुखी, वात-आमवात अशा सर्वांवर ४ दिवसात रिझल्ट खात्रीने. गरम दुधातून पाव ते अर्धा चमचा सकाळी उपाशी पोटी घ्या.
कस्तुरी हळद: ही मुख्यत्वे सौदर्यप्रसाधनात वापरतात. त्वचेला खूप फायदा होतो. त्वचेचा एकूणच टोन सुधारणे, जुने डाग-व्रण कमी होणे, त्वचेमधील मॉईस्चर मेंटेन होणे, रूखरूख कमी होणे, बॅक्टेरिअल किंवा फंगल इंफेक्शन असेल तर त्यावर कट्टर उपाय आहे…
कसे वापराल??
हळद कशी घ्यावी हे भारतात विचारणे म्हणजे खरेच गंमत वाटते. प्रत्येक घरी सहज उपलब्ध असलेली आणि सर्रास वापरली जाणारी गोष्ट म्हणजे हळद. मला ह्या अलप्पी, लाकडॉंगचा नाद हल्ली गेल्या वर्षी लागला पण मी माझा लहानपणापासून हळदीचा कायमच वेगवेगळ्या प्रकारे वापर करत आलेलो आहे. मला अजूनही पक्के आठवते की कॉलेजमधे कबड्डी खेळायचो तेव्हा देखील मेडीकल पॅकमधे कायमच डेटॉल आणि हळद असायचीच. नंतरही कधी काही कापले, खरचटले की सोफ्रामायसीन किंवा ड्रेझ पूर्वी थोडी हळद घालायचीच. मुलाला लहानपणापासून अनेक छोट्या मोठ्या आजारपणात हळदीचे दुध दिलेले होते. मला कोरोना झाला तेव्हा मी हळदीचे आणि तुळशीचे ड्रॉप्स घ्यायचो… तरी आता प्रोफेशनली काय पद्धत फॉलो करावी हे सांगतो…
कुठलीही हळद सेवन करताना ती गरम पदार्थातून घेणे अनिवार्य आहे. थंड किंवा कोमट पाण्यात, दुधात हळदीचा फायदा मिळणार नाही. काही लोकांना जिभेखाली हळद ठेवून झोपणे वगैरे काही उद्योग करायला आवडते. पण फायदा होणार नाही. हळद हे एक हर्ब असल्याने काहीतरी फायदा हा होणारच. पण ज्या प्रमाणात फायदा व्हायला हवा तितका होणार नाही. हळदीचा कंडक्टर हा गरमच असायला हवा. आणि त्यामधे हळद घातल्यावर एक मिनीटभर का होईना त्याचे औषधी घटक ॲक्टिवेट व्हायला वेळ दिला पाहिजे. मग ते प्यायला हवे.
हळद घालून दूध, पाणी उकळवू नका. ती अर्क काढून घ्यायची वस्तू नाही. हे जनरली आल्या बाबत करतात. हळदीबाबत नाही. दूध किंवा पाणी चांगले गरम करा आणि ते पेल्यात घेऊन मग त्यात हळद घालून ढवळा. एक मिनीटभर थांबा आणि मग प्यायला सुरूवात करा. ढवळून प्या नाहीतर बरीच हळद खाली राहून जाते.
डॉ. अनिस ह्यांचे जे संभाषण मी शेअर केले त्यात तुम्ही ऐकले असेलच की कुर्कुमिन सहजपणे रक्तात शोषले जात नाही. पण ते संभाषण निट ऐका आणि समजून घ्या. आपण सर्व गोष्टी अर्धवट ऐकतो आणि निट लक्षात घेत नाही. कुर्कुमिन ते शोषले जावे ह्यासाठी मुळात ते गरम कंडक्टर सोबत असणे आणि कुठल्यातरी “फॅट” सोबत असणे अनिवार्य आहे. हे त्यांनी कुर्कुमिन बाबत सांगीतले हे आधी लक्षात घ्या. कुर्कुमिन म्हणजे हळद नाही. जनरली ज्या हळदी आपण वापरतो त्यात केवळ २% कुर्कुमिन आहे. लाकडॉंगमधे ६ ते १२ % कुर्कुमिन आहे. मग उरलेला ९०% काय आहे?? ह्यामधे काही प्रमाणात नैसर्गिक फॅट आहे तर मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि फायबर आहे. हे १००% नैसर्गिक कंपोजिशन आहे. ही नैसर्गिक कंपोजिशन “हळदीमधील कुर्कुमिनची” बायोअवॅलेबिलीटी म्हणजे जैवउपलब्धता नैसर्गिक रित्या राखते. “कुर्कुमिन टॅबलेटस” किंवा “आयसोलेटेड कुर्कुमिन” चे रक्तात शोषले जाणे अशक्य आहे. कारण मुळात हे कृत्रीम आहे. त्यामुळे ते लिव्हरच्या फिल्टरेशन प्रोसेसमधे बाहेर फेकले जाते. म्हणून सर्व कुर्कुमिन टॅबलेटमधे ५% पर्यंत पेपरीन (काळ्या मिरीमधील घटका) असतेच.. हे हळदीला लागू पडत नाही. हळदीमधेच ४-५% नैसर्गिक फॅट आहे जे कुर्कुमिनसाठीचा प्रिमाईस तयार करतात. म्हणून हळद आजवर इतक्या प्रकारचे प्रभाव दाखवत आलेली आहे. म्हणून जर ऑनलाईन इंफ्लुएंसर्सचे ऐकून कुणाला वाटत असेल की आपण जी हळद घेतो ती फुकट जाते, शरीराला फायदाच नाही वगैरे तो बावळट विचार डोक्यातून काढून टाका. हळद म्हणजे कुर्कुमिन नाही. ते निसर्गाने तयार केलेले अत्यंत उत्तम दर्जाचे औषधी परीमाण आहे जे जबरदस्त रिझल्ट देणारच. आपण ते नियमित घ्यायला हवे..
काळ्या मिरीची भानगड काय? काळी मिरी ही मॅजिकलच आहे. काळ्या मिरीमधील प्रभावी घटक “पेपरीन” ह्या पदार्थाने अनेक वर्षे परदेशस्थ लोकांना, वैज्ञानिकांना आणि अभ्यासकांना प्रेमात पाडले आहे. “काळे मिरी ज्या कुणासोबत जाईल त्याची ताकद वाढवते असे म्हणतात”. पण हे वाक्य भाषांतरीत वाक्य आहे. मुळात सायन्स काय सांगते? पेपरीन जेव्हा केव्हा पचनसंस्थेमधे जाते, आतड्यामधे, तेव्हा तिथून रक्तात शोषले जाण्यासाठी पेशींमधे जे “पाईप जंक्शन” असतात ज्यातून कंपाऊंड एका पेशीतून दुसऱ्या पेशीत जातात त्या पाईप जंक्शनचा आकार पेपरीन वाढवते. चटकदार किंवा मसालेदार काही खाल्ले की आपल्याला जसे एकदम झटका बसतो तसे हे आहे. सेल्स थोड्या एक्साईट होतात आणि त्यातून कुर्कुमिन काय इतर देखील काहीही रक्तात चांगल्या प्रकारे शोषले जाऊ शकते. त्यामुळे काळी मिरी हळदीची किंवा कुर्कुमिनची ताकद वाढवत नाही. ती त्याच्यासाठी रस्ता सुकर करते. जे देखील चांगलेच आहे. त्याबद्दल वाद नाही. पण काळीमिरी नाही तर हळदीचा काही उपयोग नाही हे डोक्यातून काढून टाका. काळे मिरी असेल तर अधिक प्रभाव मिळेल. ह्यात देखील अधिक प्रभाव म्हणजे काय? लगेच कॅन्सर बरा होईल का? किंवा अचानक तुम्ही तरूण व्हाल का? असे काही होत नाही. हळद किंवा औषध हे आपण घेतच असतो अगदी कमी प्रमाणात. आणि ते तितकेच घेणे अपेक्षीत आहे. औषधाचे काम जेवणासारखे नाही. हळद कितीही गुणकारी असेल तरी रोज आपण भातासारखी खाऊ शकतो का? ती प्रमाणात घ्यायची आहे आणि त्या सोबत घ्यायचे काळे मिरी देखील अत्यंत प्रमाणात घ्यायचे आहे. एक कप गरम दुधासोबत कुठलीही हळद “पाव चमचा” इतकीच घ्यायची आहे. तुम्ही तिन हळदी एका वेळेस घेत असाल तरी प्रत्येकी पाव चमचा इतकीच घ्यायची आहे. आणि तिन्ही हळदी प्रत्येकी पाव चमचा घेत असाल तरी काळी मिरी एक चिमुटच घालायची आहे. लिटरली चिमटीने आपण मिठ घालतो तितकेच तिचे प्रमाण आहे. तुम्ही तिन हळदी घेताय म्हणून तिन चिमटी काळी मिरी घेऊ नका. काळी मिरी एक चिमुटच…
आषाढीमधून लाकडॉंग, नरकाचूर आणि आंबे ह्या ३ हळदी पोटात घेण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत ज्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र रोल आहेत. थोडक्यात लाकडॉंग ही सर्व प्रकारच्या संसर्गासाठी व डिटॉक्स साठी; काळी हळद ही रक्ताचे विकार, डायबिटीज, श्वसनाचे आजार इ. साठी; आंबे हळद ही सर्व प्रकारची सूज, मुका मार, सूज इ. साठी आहेत. ह्यातील लाकडॉंग हळद दैनंदीन वापरासाठी, रोज दुधात घालून घेण्यासाठी वापरा आणि अनेक प्रकारच्या व्याधींना दूर ठेवा. काळी हळद मुख्यत्वे डायबिटीज साठी तर आंबेहळद स्नायुदुखी, सूज वगैरे साठी. काळी नरकचूर किंवा आंबेहळद घेत असाल तर त्यासोबत लाकडॉंग घ्यायची गरज नाही. नरकाचूर आणि आंबेहळद एकाच वेळेस घेऊ शकता.
फायनल कट एक कप दूध (पाणी नको) चांगले गरम करा. जितका गरम चहा आपण पितो तितके. ह्यामधे तुम्हाला हवी ती हळद पाव चमचा घाला. नरकाचूर आणि आंबेहळद एकत्र घेत असाल तर दोन्ही प्रत्येकी पाव चमचा घाला. अतिरेक करू नका. औषध डबल घेतल्याने त्याचा प्रभाव वाढत नाही. ह्यात एक चिमूट काळी मिरीची पावडर घाला. वाटल्यास अर्धा चमचा मध घाला. चांगले ढवळा. मिनीटभर थांबा. म्हणजे ते सारे चांगले मिक्स होऊदे आणि सारे घटक ॲक्टिवेट होऊदे. आणि हे गरम असतानाच प्यायचे आहे. हे शक्यतो सकाळी उपाशी पोटी घ्याल तर सर्वात जास्त फायदा मिळतो.
लाकडॉंग हळद सकाळ संध्याकाळ गरम दुधातून घेऊ शकता. आयुष्यभर घेऊ शकता. लहान मुलांना देखील आठवड्यात किमान दोन वेळा तरी द्या. कुठल्याही प्रकारच्या संसर्गजन्य आजारपणात कुठलेही औषध देण्यापूर्वी एकदा लाकडॉंग देऊन पहा.
काळी हळद घ्यायला सुरूात करण्यापूर्वी फास्टिंग शुगर टेस्ट करा. ही सकाळी उपाशी पोटी एकदाच घ्यायची आहे. २० दिवस वापरून फरक पहा. फरक वाटत असेल तर कंटीन्यू करा. एरवी नका घेऊ. खूप थकवा असेल किंवा खूपच टॉक्सीफिकेशन असेल तरच वापरा.
आंबेहळद जर स्नायुदुखी, अंगदुखी, मुकामार, अंतर्गत सूज असे काही असेल तरच वापरायची. परीणाम मिळाला की थांबा!
कामापुरता काळी हळद आणि आंबे हळद वापरून एरवी तुम्ही लाकडॉंग नित्य आहारात घेऊ शकता..
