मागील काही दिवसांपासून अक्षत बाबतीत काही प्रयोग स्वतः वर आणि काही सन्माननीय ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायावरून तुमच्यापर्यंत पोचवावेसे वाटतात.

अक्षत मध्ये सामील होण्यासाठी माझ्याकडे एक कारण आधीपासूनच होते. माझी बहीण मागील ३० वर्षा पासून MULTIPLE SCLEROSIS या आजाराच्या Advance Stage मध्ये आहे. हा आजार भारतासाठी दुर्मिळातील दुर्मिळ (one in Million). हा आजार Auto-immune प्रकारात मोडतो. म्हणजे अशाप्रकारच्या आजाराला कोणताही परजीवी जबाबदार नाही. आणि त्यामुळेच या प्रकारच्या आजाराला ऍलोपथी मध्ये थेट औषध उपलब्ध नाही. जे काय आहे ते फक्त immune suppressor म्हणजे सरळ सरळ स्टेरॉड्स. या बाबतीत अजून थोडा शोध इंटरनेट वर घेतला असता एक रिसर्च पेपर हाती लागला. आणि हाच रिसर्च पेपर माझे अक्षत शी नाते जुळण्याला कारण आहे. हा या एका स्वीडिश संशोधक / संशोधिका ने सादर केलेला होता. त्यात सापडलेल्या माहिती आधारे संशोधक / संशोधिका च्या इ-मेल संपर्क करून अधिक माहिती मिळवली. त्यातून एक गोष्ट समजली की vco चे मेंदू आणि मज्जातंतू शी निगडित बरेच प्रयोग पश्चिमी (शीत कटिबंधीय) देशात चालू आहेत आणि असे आजार जर वेळीच लक्षात आले तर VCO च्या नियमित वापराने पुढे होणारे नुकसान कमी करणे  / टाळता येणे शक्य आहे.

याला अजून आधार देणारा अजून एक दावा / संदर्भ मला डॉ बी. एम. हेगडे च्या एका भाषणातुन सापडला (इथे जोडत आहे) ज्यात ते  व्ही सी ओ मधील मोनो-लॉरिक ऍसिड चा उल्लेख करून ते मानवी लाळेत घोळवून त्याचे तोंडातच पचन झाल्यामुळे कशाप्रकारे थेट कीटोन बनून रक्तात सामावतात, हे सांगत आहेत. हेच कीटोन मज्जातंतू च्या संबधीत आजारात म्हह्त्वाची भूमिका बजावतात. 

अक्षत मज्जातंतूशी संबधीत आजारावर ( Alzheimer’s, parkinsons, MS आणि तत्सम) वर, तसेच पोटाशी संबंधित आजारांवर तितकेच परिणाम कारक आहे. या दोन्ही बाबतीत अक्षत कसे वापराता येईल  आणि ते कशा प्रकारे प्राशन करावे ( डोस ) याचा स्वतः वर प्रयोग केला. माझ्या बाबतीत तरी  त्यातून दोन गोष्टी नक्की झाल्या.एक अक्षत तोंडात घोळवून, तोंडातल्या लाळेमध्येच पचवून प्राशन केल्यास त्याचा मेंदूशी संबंधित आजारात परिणाम जास्त दिसून आला (माझ्या झोपेचा गाढ पणा वाढला).  दुसरा प्रकार जर अक्षत थेट घशात ओढून (किमान लाळ मिसळून) प्राशन केल्यास सकाळी पोट अधिक व्यवस्थित साफ झाले. म्हणजे अक्षतने आतड्यांवर परिणाम केला होता.असे आणि थोडेफार वेगवेगळे प्रयोग हि स्वतःवर चालू आहेतच. त्यात खरचटणे, दात दुखी हे तर हमखास बरे होणारे प्रकार अनुभवले आहेत.

कालच विनयबरोबर बोलताना या सर्व गोष्टींचा उल्लेख केल्यावर त्यांनी या बाबत काही तरी लिहा असा सल्ला दिल्यावर हे माझे “अक्षतचे  प्रयोग” सामायिक करावेसे वाटले. हे आणि असे अनेक विविध प्रयोग, केवळ मीच नव्हे, तर अक्षत टीम चा प्रत्येक वारकरी अक्षतबाबत करून पाहतो आहे, मग ते साधे लेबल असो कि जाहिरात किंवा अगदी व्हाट्सअप स्टेटस सुद्धा. आणि त्यामुळेच अक्षत एक परिपूर्ण प्रॉडक्ट बनत आहे. आज अक्षत वर्षभरानंतर ज्या टप्प्यावर आलेले आहे त्यात अक्षत टीम सोबत आषाढीतल्या प्रत्येक वारकऱ्याच्या आशीर्वादाचाही महत्त्वाचा सहभाग आहे.

Your valuable comment please..