This Article In in “Marathi” Language
२५ ऑक्टोबर रोजी कोरावरच मांडलेल्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने एका सोशल एंटरप्राईजच्या दिशेने आमची वारी निघाली आणि २ महिन्यात आम्ही “आषाढी व्हेंचर्स प्रायवेट लिमीटेड” ला जन्म दिला. .. किंवा तिने आम्हाला पालकत्व दिले म्हणा..
पाहता पाहता १ महिन्यात ३३ जणांनी शेअरहोल्डींग घेत आषाढीच्या DNA वर विश्वास दर्शवला व आषाढीच्या शेअरहोल्डरची पहिली फेरी आम्ही यथास्थित पूर्ण केली. आता दुसरी फेरी चालू झाली आहे आणि केवळ ६७ लोकांसाठी राखीव असलेल्या ह्या फेरीत ८ जणांनी नोदणी केलीसुद्धा.. 1st Come 1st Served Basis वर असलेली ही फेरी केवळ २० मार्च पर्यंत चालू आहे. तेव्हा त्वरा करा आणि आषाढीच्या “मुक्त उद्यमशिलतेच्या” अनोख्या वारीत सामील व्हा..
मला माहित आहे की ह्याला चमत्कार म्हणत नाही.. येतोय मी तिकडे..
तर हल्लीच १५ दिवसांपूर्वी आम्ही “ओल्या खोबऱ्याचे तेल” (VCO) हा महत्वाकांक्षी प्रकल्प घोषीत केला ज्यासाठी १००,०००/- प्रत्येकी अशी गुंतवणूक आणि ३-४ वर्षात स्वत:च्या स्वतंत्र कारखान्याचे टार्गेट ठेवले. केवळ १५ दिवसांच्या स्पॅनमधे १४ लोकांनी गुंतवणूक आणि इंटरेस्टची खात्री दिली आणि VCO प्रोजेक्ट कार्यान्वित झाला देखील.. एकमेकांशी काही ओळखपाळख नसलेल्या १४ “मराठी” लोकांनी परस्पर विश्वासाने इतकी मोठी गुंतवणूक आणि सहभागाची खात्री देणे हा प्रसंग विरळाच म्हणावा लागेल. ३-४ वर्षात जेव्हा केव्हा हे कारखान्याचे स्वप्न साकारेल तेव्हा हा अशा प्रकारचा जगातला पहिलाच प्रयोग असेल..
अक्षत प्रोजेक्टबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा..