मराठी लोक शक्यतो नोकरी करताना दिसतात. व्यवसायात दिसत नाहीत. काहीजण प्रयत्न करतात पण पुरेशा भांडवलाचा अभाव, मार्केटींग कमी पडते, छोट्यामोठ्या अडचणी, परिवारांतर्गत विरोध अशा विवीध अडचणींमुळे अर्धवट सोडतात. शिवाय एकाहून अधिक मराठी व्यावसाईकांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारल्याची आणि यशस्वी केल्याची उदाहरणे तर विरळच. त्यामुळे मराठी माणसांकडे उद्योजकतेचा आणि संघभावनेचा आभाव आहे असे प्रकटपणे म्हटले जाते. सहकार क्षेत्रातील मराठीजनांच्या कंपन्या ह्या स्थानिक राजकीय नेत्यांनी उभारलेले उद्योग आहेत. जरी ते “सहकार” मॉडेल वर आधारीत असले तरी प्रत्यक्ष लोकांच्या ऍक्टीव/व्यायसाईल सहभागाची शक्यता खूपच तोकडी आहे..
ह्याचा दुसरा दृष्य परीणाम दिसतो तो मराठी भाषीकांचा व मराठी अस्मितेच्या सत्शक्तिच्या – चांगुलपणाच्या सामुहीक प्रभावावर. आज मराठी समाज पूर्णपणे विवीध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेला दिसतो नाहीतर गुंडगिरीसमोर, भांडवलशाही समोर पिचलेला दिसतो. राजकीय पुढारी, शासन व्यवस्था, प्रशासकीय अधिकारी आणि गुंड हे सारेच मराठी जनांच्या “विखूरलेल्या अस्तित्वाचा” आलटून पालटून फायदा घेताना दिसतात..
श्री दिनकर गांगल एक गोष्ट सांगत. पूर्वी गावात माळकरी/वारकरी लोकांची ५-६च घरे असायची. पण त्यांच्या शिलाचा, चांगुलपणाचा प्रभाव इतका होता की दारूडे/जुगारी लोक गुत्त्यावरून दारू पिऊन येताना ती घरे चुकवून लपून छपून जात असत. लोक दारू पित, चोऱ्या करत, फसवा-फसवी असायची, अराजक होते, गुन्हे घडत .. पण ह्याला प्रतिष्ठा नव्हती. कुणाकडे केवळ बळ किंवा पैसा आहे म्हणून त्याला वाटेल ते करायची “सोय” नव्हती. वारकरी, शिक्षक अशा प्रकारचे लोक गरीब होते, साधे होते पण त्यांच्या सदभावनेचा प्रभाव होता. त्यांच्या “विचारांना” किंमत होती. मान होता. आणि हा पैशाने किंवा बळाने विकला जात नसे! .. आता ही घडी विस्कटली.. आता अराजकतेला राजमान्यता आहे. समाजात अनाचाराला गौरव आहे. कायदा/नियम तर केवळ कागदी घोडे आहेत..
अशा वेळेस गरज आहे सत्शक्तिंच्या संघटनाची. समविचारी लोकांनी एकत्र यायची. पण हे सारे समविचारी लोक एका गावात नाही, एका ठिकाणी नाहीत. किंबहुना कोण कुठे आहेत ते माहीत नाही. सारेच राज्यभर, देशभर आणि जगभर विखूरलेले आहेत. शिवाय ह्यांना एका धाग्यात जोडू शकेल असा कार्यक्रम बनवणे हे देखील एक मोठे आव्हानच आहे..
कोरा मराठीच्या मंचावर “Quora सारख्या सामाजिक मंचाचा वापर करून स्टार्टअप शक्य आहे का?” ह्या प्रश्नाच्या उत्तरात “सोशल स्टार्टअपच्या” अनुषंगाने ही कल्पना मांडली गेली. सदर उत्तरावर अनेक सकारात्मक प्रतिसाद मिळाले आणि ही कल्पना आकारास येत गेली. “सोशल स्टार्टअप” ही आषाढी व्हेंचर्सच्या प्रवर्तकांनी जन्माला घातलेली एक अभिनव संकल्पना आहे. हे सोशल वर्क नाही की ही सामाजिक संस्था नाही. इथे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो. मुळात सोशल एंटरप्रेनरशीप म्हणजे नक्की काय हे तुम्ही विकीपिडीया वर वाचूच शकता. थोडक्यात समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला वेळ आणि रिसोर्सेस शेअर करून काहीतरी अधिकाधिका लोकांपर्यंत पोहोचेल असे समावेशक करून दाखवायचे असा हा कंसेप्ट असतो…
मुळात पूर्ण व्यावसाईक संकल्पना म्हटली की केवळ पैसे कमवणे हाच उद्देश असतो. जे आपण सारे आपापल्या नोकरी धंद्यामधे करतच असतो. होते काय की, पैशाच्या मागे नकळतपणे पळत असताना जगायचे राहून जाते. हा अनुभव थोड्याफार फरकाने सर्वांनाच येतो. आषाढीमधे आज उच्चपदस्थ अधिकारी व गृहीणी दोन्ही वर्गातील लोक आहेत. पण “जगायचे राहून जाते” हे कॉमन आहे. .. पण म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नाही. आपण सारे जगतोय की! आणि आनंदात जगतोय. आपापल्या पातळीवर काही ना काही करून आपापली स्वप्ने कमी-जास्त प्रमाणात साकारतोय आणि पुढची पिढी देखील घडवतोय.. पण तरी एक हुरहुर आहे पहा.. एक काहीतरी मिसींग आहे… सुख? समाधान? धमाल? एंगेजमेंट? .. नाही हो.. ह्या ओव्हररेटेड शब्दांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही.. एकच गोष्ट मिसींग आहे.. पॅशन! सॉरी ह्याला समर्कप मराठी शब्द नाही मिळाला.. पण हे मिसींग आहे.. आपण नोकरी, धंदा व्यवसाय जे पण काही करतोय आणि “पैसा” एकमेव उद्दीष्ट ह्यात पॅशन हरवून बसलोय… आणि आपल्याला पॅशन जपायचे स्वातंत्र्य नाहीये..
हे आम्हाला आषाढी व्हेंचर्स मधे करायचे आहे. मुळात निर्मिती सारखा आनंद नाही! काहीतरी बनवता यायला हवे आणि ते अनेक लोकांपर्यंत पोचवता यायला हवे. अहो साधे पापड करून विकायचे ह्यामधे लिज्जत पापड सारखी हजारो कोटी रूपयांची सोशल एंटरप्रेनरशीप आहेच की. तेव्हा तुम्ही नक्की काय करता ह्याला फार महत्व नाही. ते किती जणांपर्यंत प्रभावीपणे पोचवता ह्यातील पॅशन, कनेक्शन्स आणि हा साराच अनुभव धमाल आहे.. खूप सजीव आहे..
आमच्या आषाढीमधे एक सुनिता तळवलकर ताई आहेत. त्यांनी सुरूवातीलाच सांगीतले होते की मी काही शेअर्स घेणार नाही. मला फक्त समजून घ्यायचे आहे. मुळात आषाढीमधे प्रवेशाचे नियमच नाही. कुणालाच कसली आडकाठी नाही. हवे तेव्हा या, हवे तेव्हा जा, तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करा. प्रत्यक्ष सहभागी व्हायचे तरच सभासदत्व घ्या… ताई येत गेल्या, त्यांना आवडले.. आम्ही स्क्रॅच हा विषय घेऊन लहान मुलांच्या सर्वांगिण बौद्धीक विकासावर काम करतो. त्यात त्यांनी सुचवले की हा असाच एक कार्यक्रम आपण वृद्धांसाठी करू शकतो का? एक वेगळी दिशा मिळाली.. लगेच काही झाले नाही. असे काही लगेच होत देखील नाही.. पण एक व्यक्ती एक फ्रेश विचार घेऊन आली.. यथावकाश त्याला स्वरूपही मिळेल.. दरम्यान आमच्याकडे “पॉवरसेव्हर” वर काम चालू झाले. आणि सुनिता ताईंनी इंटरेस्ट घेतला. हे प्रॉडक्टचा आम्ही घडवत आहोत.. आता सुनितताई शेअर्स देखील घेत आहेत.. आणि पॉवरसेव्हरमधे देखील ऍक्टीव्ह आहेत.. काय झाले असेल बरे??
पॉवर सेव्हरवर मी ८-१० वर्षांपूर्वी खूप काम केले आहे. भारतभर विकलेय, परदेशी देखील. पण आता परिस्थिती बदलली. तेव्हा आम्ही बनवलेला पॉवरसेव्हर आता रिझल्ट देत नाही. पण खरे तर आता त्याची गरज सर्वात जास्त आहे. आम्ही माझा जुना पॉवरसेव्हर टेस्टींग साठी आमच्या सभादांना दिला. सगळीकडे फेल गेला.. इथे खरी धमाल चालू झाली. तंत्रज्ञान तर बरोबर. थिअरी परफेक्ट. मग रिझल्ट तर यायला हवे. काय होतेय नक्की? आता आमच्या पॉवरसेव्हर ग्रुप अक्षरश: पेटलाय. त्यात श्रीरंग विभांडिक प्रशांत कारंडेंसारखे सारखे फिल्ड एक्सपर्ट आहेत, शैलेश हिंगे सारखे मॅनेजमेंट तज्ञ आहेत Alka Darade सारख्या गृहिणी आहेत.. आणि आम्ही सारे मिळून आमची पॅशन फॉलो करतोय. प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी काय न कशी हे तज्ञ पाहून घेतील.. पण अजूनही खूप करण्यासारखे आहे.. आणि ते काय हे जो तो शोधतोय, करतोय.. खूप व्हायब्रंट आहे हे सारे…
स्टार्टअप ही “केवळ” पैसे कमवायची संधी नाही. हा तुम्ही तुमचा घेतलेला शोध आहे. काय आहे तुमच्यात ते पडताळण्याची एक संधी. तुमची पॅशन फॉलो करायची एक संधी. अशा प्रकारची संधी आणि ते साकारायची यंत्रणा करायला खर्च येतोच. पण हा डोनेशन्स मधून येऊन उपयोगी नाही. हा आपणच उभा करायचा. म्हणून हे कंपनीचे स्वरूप आणि शेअरहोल्डींग. “आषाढी व्हेंचर्स” चे ३ वर्षात म्हणजे १००० दिवसात १००० सभासद आणि १ कोटी रुपयाचे कॅपिटल उभे करायचे टारगेट आहे. ह्यातून आम्हाला “गावरान” नावाच्या एका “रुरल ऍमेझॉन” ला जन्म द्यायचाय..
अशा वेड्या पॅशन्स चा पाठलाग करून आयुष्य अनोख्या अनुभवांनी सजवायचे असेल तर आजच आमच्या बरोबर सामील व्हा.. आषाढी हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असला तरी समविचारी लोक पटापट एकमेकांना कनेक्ट करून प्रोजेक्टस चालू करत आहेत. असे होतच राहणार. एकदा प्रोजेक्ट चालू झाला की मग प्रवेश मर्यादीत असतो.. अशाने समविचारी लोकांसोबत काम करायची एखादी उत्तम संधी फुकट जाऊ शकते.. तरी लवकरात लवकर आमच्या व्हाट्सऍप ग्रुप्सवर सामील व्हा
मला भाग घ्यायचा आहे आणि सर्व जाणून घ्यायचे आहे.
How can I participate
I am keen to know more about the poject.