आषाढी व्हेंचर्सच्या सभासदांसाठी चिंबळी पुणे येथे “शेतावर” एक दुसरे स्नेहसंमेलन आयोजीत केले आहे. आषाढीचे नियोजीत विषय आणि व्हिसीओ या चालू झालेल्या पहिल्या प्रोजेक्टवर चर्चा रंगणार आहे. शिवाय तिसर्या फेरीच्या शेअरहोल्डींग दृष्ट्याही पुढील प्लॅनिंग असणार. म्हणून ह्याचे विशेष महत्व आहे. तुम्ही सर्वजण देखील कोरोनाच्या कृपेने वर्षभर घरी आहात. तर ही संधी घेऊन ह्या संमेलनानिमीत्ताने घराबाहेर पडा आणि नविन ओळखी बनवा, नविन विषयात सहभागी व्हा!
स्नेहसंमेलन सर्वांसाठी खुले आहे. तुम्ही शेअरहोल्डींग घेतलेलेच असले पाहीजे असे नाही. तुम्हाला आषाढीबद्दल अधिक माहिती हवी असेल, आम्हा सर्वांची ओळख करून घ्यायची असेल तरी तुम्ही ह्यात सहभागी होऊ शकता. शनिवारी मुक्कामाला फक्त पुरुषांची सोय आहे. महिलानी व ज्यांना सहकुटूंब सहभागी व्हायचे आहे त्यांनी रविवारी सकाळी येऊ शकता.
कार्यक्रमाचे स्वरूप :
- शनिवार दि. 26 जून :
- संध्याकाळी ६ ते जास्तीत जास्त 8 पर्यंत निवासी सभासदांचे एकत्रीकरण.
- सर्वांनी पुण्याच्या लोकेशन वर एकत्र यायचे आहे. आधी अंदाज द्याल तर प्रायवेट गाड्या करून एकत्र येणे शक्य आहे.
- रात्री चर्चा आणि जेवण (निवास – रहाण्याची/झोपण्याची कॉमन व्यवस्था आहे)
- रविवार दि. 27 जून :
- निवासी सदस्यांनी 8 वाजेपर्यंत आवरायचे आहे. रविवारी येणाऱ्या लोकांनी 9-9:30 पर्यंत पोचायचे आहे.
- 9:30-10:00 च्या दरम्यान नाष्ता.
- एक व गरजेनुसार एकाहून जास्त गटात चर्चा चालू होतील.
- दुपारचे जेवण 1:30 च्या दरम्यान
ह्या नंतर आपापल्या सोयी नुसार 7 पर्यंत परतीच्या प्रवासाला निघू शकता.
पेमेंट करण्यासाठी सुसंगतपणा यावा म्हणून पॅकेजचे खालील प्रमाणे भाग केले आहेत –
- शनीवारी मुक्कामासाठी व्हेजिटेरीयन पॅकेज – 700
त्यात चहा,जेवण (व्हेज बिर्याणी) मुक्कामाची सोय,अंघोळीसाठी गरम पाणी. - दुसर्या दिससासाठी प्रत्येकी वेगळे पॅकेज ठेवले आहे
- व्हेजसाठी 200 रु – त्यात चहा ,नास्ता(पोहे),व्हेज जेवण.
- नाॅनव्हेजसाठी 400 रु – त्यात चहा ,नास्ता(पोहे), नाॅनव्हेज जेवण.
आपापल्या सोयीनुसार शनीवार (मुक्काम) + रविवार किंवा फक्त रविवार असे पॅकेज निवडा व गुगल पे , भिम पे नंबर 9158850404 वर पेमेंट करा व त्याचे स्क्रिनशाॅट त्याच नंबरवर श्री विनोद कावळे ह्यांना पाठवा त्यानुसार सोय करता येईल..
स्नेहसंमेलनाचे लोकेशन
Swagat Agri Tourism, Chimbali
098502 40130
https://maps.app.goo.gl/CbDKDxku9KSXPVxz7
स्वागत ऍग्री टुरिझम
चिंबळी-पद्मावती रोड, चिंबळी, तालुका राजगुरूनगर, जिल्हा पुणे.
पुणे नाशिक रोडने मोशी जवळ
हे प्रोफेशनल रिसॉर्ट किंवा हॉटेल नाही. व्यवस्था गावठी स्वरूपाची असणार आहे ह्याची आधीच नोंद घ्या..
तुमचे प्रॉडक्ट कुरीअर केले आहे. लवकरच तुम्हाला मिळेल. आठवडाभर सिंधुदूर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी असल्याने थोडा प्रॉब्लेम होता..