आषाढी व्हेंचर्सचे पहिले निवासी स्नेहसंमेलन, ते देखील कोरोनाच्या सावटामधे, म्हणून थोडे धाडसीच म्हणा! पण विनोद कावळेंचे उत्तम नियोजन आणि जुन्या नव्या सभासदांचा उदंड प्रतिसाद ह्यामुळे खूप मजा आली. कालच्या संमेलनावर शेअरहोल्डींग कँपेनचेही प्रेशर होते. एकूण २२ जणांनी कागदपत्रे आणि चेक्स दिले असून पहिली फेरी पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष शेअरहोल्डींगची प्रक्रीया चालू झाली आहे.
कालच्या मिटींगमधे झालेल्या/ठरलेल्या काही महत्वाच्या गोष्टी थोडक्यात –
- आषाढी व्हेंचर्सची साईट अपग्रेड करणे आणि त्यावर “आयडीयांचा डेटाबेस” बनवणे. कोरावर जसे आपण प्रश्नोत्तरांचा डेटाबेस पाहतो आणि कुणीही प्रश्न विचारू शकेल, उत्तर देऊ शकेल तसेच हे आयडीयांचे असणार आहे. कुणीही रजिस्टर होऊन आपली आयडीया शेअर करू शकेल आणि त्यावर इतर जण प्रतिसाद देऊ शकतील. उत्तम आयडीयांचे आषाढी व्हेंचर्सची स्वतंत्र टीम देखील काम करेल.
- शेअरहोल्डींग चे ड्राईव्ह २ (मार्च महिना) : जसे आपण २५ फेब्रुवारी ही तारीख घेऊन पहिले शेअरहोल्डींग ड्राईव्ह केले तसेच दुसरे ड्राईव आता चालू होते आहे. मुख्य जबाबदारी पहिल्या फेरीतील सभासदांची आहे. प्रत्येक विद्यमान सभासदाने किमान ३ सकारात्मक सभासदांना जोडायचे आहे. अशाने आपण मार्च महिन्यात ७५ नविन सभासदांना जोडू शकलो तर ९० च्या मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू आणि आषाढीला पब्लिक लिमीटेड कंपनी बनवणे आणि गावरान चे लॉन्च हे दोन्ही शक्य होईल..
- पॉवर सेव्हर ह्या महिनाअखेर पर्यंत काहीतरी निर्णायक स्वरूपात येणे आवश्यक आहे. शिवाय वेस्ट मॅनेजमेंट ह्या प्रोजेक्टवर काम सुरू होणे आवश्यक आहे. अजून कुठले नविन प्रॉडक्ड आणता येईल का?
- आषाढीच्या पुस्तकाचा विषय मागे पडला आहे.
- आषाढीचे पुढील स्नेहसंमेलन कधी आणि कुठे..