मला नाभी आणि माकडहाड या ठिकाणी तेल लावायचे असते रात्री झोपताना हे ठाऊकच नव्हते.मात्र एका आयुर्वेद तज्ञाने ते नीट समजावुन सांगितले व तिथुन गेले दीड एक वर्षभर मी अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल नावाचे तेल नित्यनेमाने घालतो आणि माकडहाड व वाढीबरोबरच पाठीच्या कण्यालाही लावतो. त्याचबरोबर मी वीसेक मिली अक्षत रोज झोपताना पितो . मला याचा सुंदर फायदा झालेला वाटतो .गेल्य दीड वर्षात कोरोना काळ असुनही मला कसलाही आजार झालेला नाही व त्यामागे अक्षत तेल व लाल वालई तांदुळ हाच एक आहाराला बदल मी माझ्या जीवनात केलेला आहे.
आयुर्वेद तज्ञांनी जे सांगितलेले ते असे की झाडाला मुळाकडुन जमिनीतली पोषणद्रव्ये अगदी फांद्या पाने फुले फळे यांच्या पर्यंत शेंड्यापर्यत पोहचवली जातात.तसेच माकडहाड कणा व नाभी यातुन त्वचेवाटे शरीरात या तेलातले लाॅरीक ऍसिड हे पोहचते व ते न्यूरो सिस्टिमलाही पोषक ठरते .नाभीतूनच नाळेवाटे पोटातील बाळाला आईच्या शरीरातील पोषणद्रव्यै गर्भारपणात पोहचतात तसेच हे आहे.