ही मोटीव्हेशनल स्वरूपाची ऍक्टीव्हिटी नाही. कंसल्टींग नाही. ऍडवायजरी फोरम नाही. हे समविचारी लोकांना एकत्र येऊन काहीतरी वेगळे प्रत्यक्ष करायचे आहे.. ते देखील आता.. लवकरात लवकर.. अशा कर्मप्रधान लोकांचा समूह बांधायची आणि त्यातून एक प्रत्यक्ष स्टार्टअप घडवायची ही व्यवस्था आहे..
आपल्याला प्रत्यक्ष एक सोशल स्टार्टअप उभारायचा असून त्यात सोशल कॅपीटल, सोशल एफर्ट, सोशल बेनीफीट हे तिन विषय साध्य करायचे आहेत. आणि हे तिनही सोशल असल्याने ते कुणी एकटा करू शकणार नाही. हा आपण प्रत्येकाने करायचा विषय आहे. आपला प्रत्येकाचा ह्यात समान सहभाग असणार आहे.. आणि ह्याच्या यशापयशासाठी आपण सारे समान जबाबदार आणि भागीदार असणार आहोत.. हा अशा प्रकारचा पहीलाच प्रयोग आहे जो तुम्ही मी आपण सारे एकत्र येऊन घडवतोय.. तेव्हा आपण जे काही करणार ते “मॉडेल” म्हणून जगात प्रसिद्ध होणार आहे.. आपण केलेल्या चुका देखील अभ्यासाचा विषय असेल..
कपया लक्षात घ्या की ही कुठल्याही “Get Rich Quick” प्रकारची स्किम किंवा नेटवर्क मार्केटींगचा भाग नाही.. इथे मी कुठल्याही “नेटवर्क मार्केटींग” कनसेप्टचे समर्थन करत नाही. कुठल्याही पटकन श्रीमंत स्किम मधे माझा विश्वास नाही. आपल्याला समविचारी लोकांना एकत्र येऊन एक सोशल स्टार्टअप बनवता येतो का अशा प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत. आणि हे १००% लिगल काम आहे. इथे तुम्ही पैसे भराल (अजून ठरले नाही!) तर तुम्हाला त्याचे ऑफीशिअल शेअर्स मिळतील व तितक्या भागा पुरते तुम्ही कंपनीचे मालक असाल.. आणि कुणालाही कुठल्याही स्वरूपात कमीशन मिळणार नाही. .. ही आपली सर्वांची कंपनी असेल आणि सर्वांची ह्यात समान जबाबदारी असेल. भविष्यात ही कंपनी यशस्वी झाली तर आपण सारे ह्याला जबाबदार असू आणि फेल गेली तर त्याची जबाबदारी देखील आपलीच असेल..
आपण जो करतोय तो एक Social Experiment आहे.. म्हणजे सामाजीक प्रयोग! विवीध विभागातील लोकांनी एकत्र येऊन काहीतरी विधायक करायचे असे साधे सोपे ह्याचे स्वरूप आहे… आणि कुठलाही प्रयोग, आयडीया छोटी किंवा सोपी असली म्हणून फालतू नसते.. आपण कशा प्रकारे तिला प्रसारीत करतो, इंप्लिमेंट करतो ह्यावर बरेच अवलंबून आहे.. छोटे उदाहरण झुकरबर्गच्या फेसबुकचे.. सोपा विषय की तुम्ही काहीही करत असाल तरी एखादा फोटो काढा आणि शेअर करा.. पाहता पाहता ती जगातील सर्वात मोठी आणि प्रभावी कंपनी झाली.. आयडीया जितकी सोपी, साधी, सरळ तितकी ती प्रभावी होत जाते.. तिचा व्याप वाढत जातो..
समुहाने एकत्र येऊन.. ज्याला जे जमेल तसा सहभाग करून.. काहीतरी व्यवसाय करायचा आणि त्यातून सर्वांचा त्यांनी केलेल्या कामाच्या/व्यवाच्या प्रमाणात फायदा करून घ्यायचा ह्याला म्हणतात सोशल इंटरप्रेनरशीप ..
चांगली संकल्पना आहे. मला आपल्याशी संपर्क करायचा आहे.माझा फोन नंबर 8390439977 आहे.
धन्यवाद. रामदास पासलकर पुणे.
धन्यवाद पासलकर साहेब। मी आपल्याला संपर्क करतो