“व्हाईट हॅट ज्युनिअर ॲप’वरून कोडिंग शिकल्यावर खरंच ॲप बनवता येतं का?” ह्या प्रश्नाच्या उत्तरामुळे कोरावत एक चांगली चर्चा आकारास येत होती. हे उत्तर सामनाने देखील प्रसिद्ध केले…
दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी रा. ८:३० झालेल्या तिसऱ्या झूम मिटींगचा मुख्य मुद्दा होता : मुलांचे “अनुभवविश्व समृद्ध व्हावे” ह्यासाठी काय करता येईल. विवीध चांगले मुद्दे चर्चेत येत गेले आणि थोडा आयटी विषयाकडे कललेला प्रोजेक्ट असताना देखील “गावरान” पेक्षा जास्त भाव खाऊन “रेघोट्या”च सर्वांच्या पसंतीस उतरत आहे असे दिसले..
- कोरावर चालू असलेल्या प्रश्नोत्तरांमधे दोन उत्तरे महत्वाची आहेत –
- जसे मुलांना इंग्रजी ही ‘जगाची ज्ञानभाषा’ म्हणून आपण लहानपणापसूनच शिकवतो तसेच लहान वयातच मुलांना लॉजीक व कोडींगची ओळख झाली तर ते अंगवळणी पडते व भविष्यात कठीण जात नाही. संगणक प्रणालीच्या वापराने मुले लहान वयापासूनच सर्जनशीलतेने विचार करायला, पद्धतशीरपणे तर्क करायला आणि एकमेकांच्या सहकार्याने गटांमधे काम करायला शिकू शकतात. ह्या २१व्या शतकातील सर्वात आवश्यक क्षमता आहेत. जेव्हा मुले कोडींग करतात, तेव्हा ते समस्या सोडवायला, छोट्या मोठ्या प्रकल्पांचे प्लॅन व डिझाइन बनवायला आणि स्वत:च्या कल्पना मांडायला व साकारायला शिकतात.
- २१व्या शतकातील पिढीसाठी ह्या आवश्यक स्किल्स आहेत.. ह्यामधे उल्लेखलेले कोडींग म्हणजे कुठलीतरी लँगवेज घेऊन त्यात प्रत्यक्ष कोड लिहीणे हे नसून, मुख्यत्वे मुलांनी इमॅजिन करायला शिकणे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हे आहे. MIT चा Scratch हा प्रकल्प https://scratch.mit.edu/मुख्यत्वे मुलांमधे अशा प्रकारच्या “Problem Solving Ability” चा विकास कसा साधता येईल ह्यावर भर देतो आणि त्यातून खरेच चमत्कृतीपूर्ण रिझल्ट दिसत आहेत..
- लहान मुलांना कोडींग च्या जाळ्यात ओढून “कोडींग सिखो दुनीया बदलो” ही व्हाईटहॅट ज्युनिअर ने केलेली “विकृती” असून आपण कुठेही त्याचे आणि त्यांना अपेक्षीत कोडींगचे समर्थन करत नाही.. पण स्क्रॅचमधे वर्णन केलेले कोडींगला भाषेचे बंधन नाही. मुलांना “इमॅजिन करताना” येणाऱ्या अडचणींसाठी, प्रयोगांसाठी असलेली भाषा म्हणजे स्क्रॅच. आणि हा मूळ MIT चा कंसेप्ट आपण फॉलो करू तर अनेक चांगले फायदे आपल्याला मुलांपर्यंत .. पर्यायाने पुढील पिढी पर्यंत नक्की आणता येतील..
असाच विषय कोड.ऑर्ग (https://code.org/) नावाची संस्था देखील करते.. त्यावरील पोस्टर मी माझा लेखात दिली आहेतच. त्यातील जनरल मोटर्सची सिएओ मॅरी बेरा आणि स्टिफन करीचे कोट्स खूपच महत्वाचे आहेत.. ते मुद्दाम परत परत वाचा..
- त्याच लेखमध्ये मी माझा मुलाचा आणि शाळेत शिकवताना अनुभव मांडलाय। त्यात देखील हेच मुद्दे मला अधोरेखित करायचे आहेत…
हे आहे स्क्रॅच आणि कोडिंग आणि आपल्या रेघोट्या प्रकल्पाचे उगमस्थान आणि WHY..
आता आपल्या कालच्या चर्चेतील दुसरा विषय म्हणजे मुलांसाठी केवळ कोडिंग/scratch इतपतच करावे का? की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, जसे की केवळ तर्कबुद्धी नाही तर इतरही विषयात असलेले ज्ञान/फॉर्म्युला अप्लाय करून उत्तर काढणे, विविध permutation, combinations बनवणे, narrow down करणे, संवाद साधणे, समन्वय साधने, लिडरशीप, वक्तृत्व.. आणि अजूनही बरेच काही आहे.. हे सारेच केवळ कोडिंग मूळे नक्कीच होणार नाही। शिवाय प्रत्येक मुलाची आवड देखील वेगळी। तर सर्व प्रकारच्या गोष्टींना एक्सपोजर मिळू शकेल असा “ऍक्टिव्हिटी बेस्ड” knowledgebase मराठी भाषेत आपण बनवू शकलो तर अनेक मराठी पालक व मुलांना ह्यात सहभागी होता येईल आणि कदाचित दूर एखाद्या खेड्यात वाढणारा मुलगा देखील कलाम किंवा स्टीव्ह जॉब्स बनू शकेल…
ह्या विषयाचे दोन फायदे.. पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे हा केवळ आयटी चा विषय नाही। सर्वच स्तरातील लोक, नॉनआयटी वाले देखील ह्यात भरीव सहभाग देऊ शकतात। कंटेंट डेव्हलप करण्यापासून ते वितरित करण्या पर्यंत..
दुसरा म्हणजे आपण ऑडिअन्स वाढवतो। केवळ कोडिंग मध्ये इंटरेस्टड मुले असे विचार न करता, आपण सर्वच मुलांना ह्यात सामील करू घेऊ शकतो..
📍दरम्यान चर्चा चालू आहे की, काय आधी करावे?? कोडिंग आधी, ऍक्टिव्हिटी (DIY) आधी? काय महत्वाचे?? ही चर्चा आवश्यकच आणि व्हायलाच हवी। पण मला वाटते की दोन्ही आवश्यक आहे.. आणि दोन्ही एक वेळेस व्हावे.. होणे आवश्यक आहे..
मग हे चालू असताना मी एक तिसरा विषय मांडला.. घुसडलाच म्हणा ना ..
जेव्हा कोरावर आपला स्टार्टअप विषय चालू झाला तेव्हापासून, त्या आधी पासून मी एका विषयावर काम करतोय। तो म्हणजे सापशिडी.कॉम.. हे फक्त त्या कन्सेप्ट ला दिलेले नाव आहे। सापशिडी माहीत नाही असा मुलगा नाही म्हणून हे नाव.. थोडक्यात सांगायचे तर “लहान मुलांसाठी मराठीतून कोरा” + थोडे फेसबुक + थोडे ऍक्टिव्हिटी व नॉलेजबेस।
- मुलांना आपापसात प्रश्नोत्तरे करायला दिली तर त्यांची सोशल डेव्हलपमेंट चांगली होईल असे मला वाटते..
- त्या बरोबरच, माझे प्रोफाइल, माझा आचिव्हमेंट, माझी टाईमलाईन ह्यातून मुलांमध्ये असलेले सर्वच प्रकारचे कलागुण प्रकट करायला आणि जगभरातील समविचारी मित्रांशी जोडायला हे नेटवर्क उपयुक्त ठरेल..
- हे एक प्रकारचे कॅप्सूल आहे। मुले एकदा ह्या कॅप्सूल मध्ये रमली, की त्यातून त्यांना ऍक्टिव्हिटी मध्ये सामील करणे, त्यांच्यातील शोधक, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार जागा करणे .. त्यांना त्यांच्याच वयाची इतर मुले काही करताना दिसली की त्यांनीही त्यात ऍक्टिव्ह पार्टीसिपेट करणे हे सारे अधिक परिणामकारक होईल असे वाटते…
तर हे होते सापशिडी…
“आता सर्वांसाठी.. हा प्रश्न नाही, हा विषय आहे.. तुम्हाला आणि आपण सर्वांनी मिळून करावे म्हणून काय आवडेल – गावरान की रेघोट्या की ऍक्टिव्हिटी की रेघोट्या + ऍक्टिव्हिटी की सापशिडी??” हे सोशल डिबेट आणि बरेच इतरही इंटरेस्टींग सातत्याने आषाढीच्या ऑफीस मिटींगमधे चालूच आहे. सोशल डिबेट खूप आवश्यक आहे। ह्यातून विचार पक्का होतो। शंका निरसन होते। निर्णय होत नाही, घडत जातो.. तुम्हाला देखील ह्यात सामील व्हायला आवडेल का? तर आजच भेट टेलीग्राम ग्रुपवर सामील व्हा आणि सोशल मीडियावरील सर्वात व्हायब्रंट आणि आश्वासक सोशल स्टार्टपचे भागीदार बना..